Historical Context of Surat Raid Shiv Jayanti 2025: मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यापासून गेले काही दिवस मराठा इतिहास, शिवाजी महाराज आणि त्या अनुषंगाने येणारे वेगवेगळे विषय चर्चेत आहेत. आता त्याच पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज आणि सूरत मोहिमेचा मुद्दा वादाचा विषय ठरला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर या वादाला तोंड फुटले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटले असा इतिहास शिकवला. महाराजांनी सूरत लुटलेच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने छत्रपती शिवरायांनी सूरत लुटले असा इतिहास सांगितला. याची माफी काँग्रेस मागणार का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. एकुणातच शिवाजी महाराजांनी सुरत लुटले असा संदर्भ देण्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. त्याच पार्श्वभूमीवर महाराजांनी सुरतेवर केलेल्या हल्ल्याच्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे काय सांगतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा