वेळोवेळी सोशल मीडियावर कोणता न कोणता मीम चर्चेत येत असतो. आताही एक मीम सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या मीमचे नाव आहे ‘चिल गाय मीम.’ अलीकडच्या आठवड्यात, सोशल मीडियावर ‘चिल गाय’ची प्रतिमा सर्वत्र गाजली आहे. मोठमोठे ब्रँड्स आणि सेलिब्रिटींनीही याचा स्वीकार केला आहे. चिल गाय मीम म्हणजे स्वेटर, जीन्स आणि लाल स्नीकर्समध्ये एक मानवासारखा दिसणारा श्वान आहे, ज्याचा हात त्याच्या खिशात आहे. या मीम फेसला इलूस्ट्रेटर फिलिप बँक्स यांनी गेल्यावर्षी ४ ऑक्टोबरला तयार केले होते. त्यानंतरच हा मीम प्रचंड फेमस झाला. इन्स्टाग्रामवर चिल गाय मीमला अनेकदा अमेरिकन गायक-गीतकार जिया मार्गारेटच्या पियानो गाण्यातील हिनोकी वुडसह जोडले गेले आहे. काय आहे चिल गाय मीम? याची इतकी चर्चा का? जाणून घेऊ
चिल गाय मीम काय आहे?
चिल गाय मीमची ओळख मैत्रीपूर्ण श्वान अशी आहे, जो जीवनातील प्रत्येक परिस्थिती आणि गोंधळात शांत व एकत्रित राहण्याची लोकांची इच्छा प्रतिबिंबित करतो. त्याची निश्चिंत अभिव्यक्ती किंवा त्याचे मूळ स्वरूप निश्चिंत जगण्याची लोकांची इच्छा प्रतिबिंबित करते. परिस्थिती कशीही असली तरी चिल गायला त्याची पर्वा नाही. हा मीम अनेक पोस्टसह शेअर करण्यात आला होता, ज्यापैकी काही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या मीमचा समावेश असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही एक प्रतिमा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. अनेक विनोदी ब्रॅंडसकडूनही या मीमचा वापर करण्यात आला आहे.
हेही वाचा : युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात वाढतोय ‘डार्क टुरिझम’; पर्यटकांना आकर्षित करणारा हा प्रकार नेमका काय आहे?
इन्स्टाग्रामच्या काही पोस्टमध्ये त्याला जबाबदारीच्या स्वरुपातही पोस्ट करण्यात आले आहे. मानसिक आरोग्याबद्दल जीवन बदलणारे सल्ले असणाऱ्या पोस्टमध्येही त्याचा वापर केला गेला आहे. तो अंतहीन आशावाद आणि त्याच वेळी विश्वासाच्या तीव्र अभावासाठी एक पात्र आहे. अनेक मीममध्ये श्वानाला स्त्री वेशभूषादेखील परिधान करण्यात आली आहे. तसेच त्याच्या बोलण्याचे ॲनिमेशनही समोर आले आहे. या सर्वात त्या मीमचा वापर लोक मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे.
इंटरनेटवर मीमचा उद्रेक
या नोव्हेंबरमध्ये चिल गाय मीम मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर ‘चिलगाय’ नावाचे क्रिप्टोकरन्सी टोकनदेखील जारी करण्यात आले आहे. क्रिप्टो ट्रॅकर वेबसाइट ‘CoinMarketCap’ नुसार, नोव्हेंबर १५ पासून त्याचे मूल्य ५०० दशलक्ष यूएस डॉलर्सपर्यंत वाढले होते. मात्र, आता २६ नोव्हेंबरपर्यंत त्याचे मूल्य ४४० दशलक्षपर्यंत घसरले आहे. वेबसाइटने असेही नोंदवले आहे की, ‘चिलगाय’ ने डोगेकॉइन (DOGE) आणि शिबा इनू (SHIB) सारख्या इतर ‘मीम कॉइन्स’ला मागे टाकले. फिलिप बँक्सने एक विधान जारी करून स्पष्ट केले की, त्यांनी त्यांच्या चित्रावर कॉपीराइट प्राप्त केला आहे आणि ते अनधिकृत व्यापार आणि बीटकॉइन्सविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहेत.
हेही वाचा : हिंदू धर्मगुरूंच्या अटकेनंतर बांगलादेश ‘ISCKON’वर बंदी घालणार का? ‘इस्कॉन’ला लक्ष्य करण्याचे कारण काय?
इन्स्टाग्रामवर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी मीम प्रतिमा वापरून सर्व क्रिप्टोसंबंधित क्रियाकलापांचा निषेध केला आहे. क्रिप्टो मार्केट्समध्ये मीम कॉईनचे नेहमीचे अस्थिर स्वरूप पाहता हे लवकरच मीम कॉईनसाठी वेगळे वळण आणू शकते. परंतु, फिलिप बँक्स यांनी सांगितले की, ब्रँड्स प्रतिमेचा वापर करून क्रेडिटसह त्याचा वापर करणे योग्य आहे. फिलिप बँक्स यांनी आदिदाससारख्या ब्रँडलादेखील टॅग केले आहे की, त्यांनी त्यांच्या मीम प्रतिमेचा वापर केल्यास त्यांना योग्यरित्या श्रेय द्यावे. बँक्स सध्या चिल गाय मीमची खेळणी तयार करण्यासाठी आणि स्प्राईट लंडनसारख्या ब्रँड्सबरोबर भागीदारी करून पात्रावर आधारित रील्स तयार करण्यासाठी निधी जमा करत आहेत. ते चिल गाय मीममध्ये अधिक बदल करण्याच्याही प्रयत्नात आहेत.