अमेरिका आणि जपानसारख्या देशांशी स्पर्धा करत चीन तंत्रज्ञानाच्या जगात आघाडीवर आहे. चीन नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत आहे. नुकतेच चीनने विकसित केलेल्या एका मशीनने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे. ही मशीन आहे ‘माइंड रीडिंग मशीन.’ यापूर्वीही अनेकदा माइंड रीडिंग मशीनवर काम करण्यात आले आहे, परंतु या मशीनच्या अचूक डीकोडिंगमुळे ही मशीन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काय आहे ‘माइंड रीडिंग मशीन’? पूर्वी विकसित करण्यात आलेल्या मशीन आणि या मशीनमध्ये अंतर काय? याचा फायदा होणार की तोटा? त्याविषयी जाणून घेऊ.

‘माइंड रीडिंग मशीन’काय आहे?

चिनी स्टार्टअप कंपनी ‘NeuroAccess’ने गुरुवारी दोन यशस्वी चाचण्या जाहीर केल्या. कंपनीने विकसित केलेल्या ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) उपकरणाने मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णाचे विचार रिअल-टाइममध्ये डीकोड केले. त्याच वेळी, एका वेगळ्या चाचणीमध्ये या उपकरणाने रीअल-टाइममध्ये चिनी भाषाही डीकोड केली. शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीआय तंत्रज्ञानामुळे रुग्णांना त्यांच्या मनाने सॉफ्टवेअर नियंत्रित करणे, वस्तू हाताळणे, एआय मॉडेल्सशी संवाद साधणे आणि भाषणाचा वापर करून डिजिटल अवतार नियंत्रित करणे शक्य झाले आहे.

Loksatta explained Why insist on the post of Guardian Minister of a specific district
विश्लेषण : पालकमंत्रीपदासाठी एवढा अट्टहास का ?
Milind Bokil receives Social Awareness Award from Marwadi Foundation prabodhankar Thackeray
घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म…
Why is there such politics of Maratha vs Vanjari in Beed district
मराठा विरुद्ध वंजारी… भाजप असो वा राष्ट्रवादी, बीडचे राजकारण जातींभोवती!
trump hotel attack tesla truck
ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर स्फोट घडवून आणणारा संशयित ‘PTSD’ने ग्रस्त; काय आहे हा आजार?
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

हेही वाचा : ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर स्फोट घडवून आणणारा संशयित ‘PTSD’ने ग्रस्त; काय आहे हा आजार?

ऑगस्ट २०२४ मध्ये फुदान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या हुआशान हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन्सनी बीसीआय उपकरण २१ वर्षीय एपिलेप्सी (मिरगी) असलेल्या महिला रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले. शांघाय येथील NeuroAccess कंपनीद्वारे डिझाइन केलेले हे उपकरण, रुग्णाच्या मेंदूच्या मोटर क्षेत्रामध्ये जागा व्यापणाऱ्या जखमांवर उपचार करण्यासाठी प्रत्यारोपित केले गेले. NeuroAccess च्या मते, टीमने रुग्णाच्या मेंदूच्या सिग्नलच्या उच्च-गामा बँडमधून इलेक्ट्रोकॉर्टिकोग्राम (ECoG) वैशिष्ट्ये काढली. त्यानंतर त्यांनी रिअल टाइममध्ये ही वैशिष्ट्ये डीकोड करण्यासाठी न्यूरल नेटवर्क मॉडेलला तयार केले. या प्रक्रियेने ६० मिलिसेकंदांपेक्षा कमी प्रणालीची विलंबता प्राप्त केली आणि शस्त्रक्रियेच्या काही मिनिटांत मेंदूच्या कार्यक्षेत्रांचे अचूक मॅपिंगही केले.

भाषेवरील वैद्यकीय चाचण्या

भाषा ही मानवी सभ्यतेतील सर्वात मोठी प्रगती मानली जाते. मेंदूच्या सिग्नलवरून भाषा समजून घेणे ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) तंत्रज्ञानाचा होत असलेला विकास दर्शवते. डिसेंबर २०२४ मध्ये एका सहयोगी संघाने चिनी भाषणाचे संश्लेषण करण्यासाठी बीसीआयची देशातील पहिली क्लिनिकल चाचणी घेतली. संशोधकांनी २५६-चॅनेल ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) एपिलेप्सीने ग्रस्त असलेल्या महिला रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले, तिला भाषेचे सिग्नल देणाऱ्या मेंदूच्या भागात ट्यूमरदेखील होता. महिला रुग्ण बरी झाली आणि उपकरणाने पाच दिवसात ७१ टक्के स्पीच डीकोडिंगची अचूकता गाठली. १४२ सामान्य चिनी अक्षरांचा संच वापरून ही अचूकता प्राप्त केली गेली.

२०२३ मध्ये कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांचा माइंड रीडिंग मशीन विषयक एक अभ्यास प्रकाशित झाला होता. (छायाचित्र-पिपल डेली चायना/एक्स)

कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांद्वारेही माइंड रीडिंग मशीनचा शोध

२०२३ मध्ये कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांचा माइंड रीडिंग मशीन विषयक एक अभ्यास प्रकाशित झाला होता, ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. न्यूयॉर्क पोस्टच्या मते, कॅलिफोर्नियातील संशोधक ७९ टक्के अचूकतेसह सहभागींचे विचार शब्दांमध्ये डीकोड करण्यास सक्षम होते. हे उपकरण कॅलटेकच्या टी अँड सी चेन ब्रेन-मशीन इंटरफेस सेंटरने विकसित केले आणि याचा भाषणात अडथळा असणाऱ्या लोकांना आणि त्यासंबंधित विकार असणाऱ्या रुग्णांना मदत होईल, असा दावा करण्यात आला होता. हे ‘स्पीच डीकोडर’ मेंदू-मशीन इंटरफेस म्हणून काम करतात आणि भाषणादरम्यान मेंदूची क्रिया कॅप्चर करतात आणि त्याला भाषेत अनुवादित करतात.

हा अभ्यास नेचर ह्युमन बिहेविअरमध्ये प्रकाशित झाला. अभ्यासासाठी संशोधकांच्या टीमने दोन सहभागींच्या मेंदूच्या विशिष्ट भागात लहान उपकरणांचे प्रत्यारोपण केले. “उपकरणे मेंदूतील सिग्नल वाचतात, अनुवादित करतात आणि रिअल टाइममध्ये मजकुरात रूपांतरित केले जाते”, असे या अभ्यासात म्हटले आहे. सहभागींना ‘चमचा’, ‘पायथन’यांसारख्या शब्दांचा विचार करण्यास सांगितले. या विचारांचे रिअल टाइममध्ये भाषांतर केले गेले. “आम्ही अंतर्गत भाषणाशी संबंधित न्यूरल हालचाली कॅप्चर केल्या,” असे टीमने या अभ्यासात लिहिले. शब्द शांतपणे वाचणे आणि शब्दाने चित्रित केलेल्या वस्तू व्हिज्युअलाइझ करणे यासह विविध अंतर्गत बाबी डीकोड करण्यात उपकरण सक्षम असल्याचेही या अभ्यासात नमूद करण्यात आले.

कॅल्टेक टीमने मेंदूच्या सुपरमार्जिनल गायरस भागाचा अभ्यास केला. हा भाग भाषा समजण्यासाठी आणि प्रक्रियेसाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. हे तंत्रज्ञान इतर मेंदू-मशीन-इंटरफेस उपकरणे जसे की एलोन मस्कच्या न्यूरालिंकच्या तत्त्वानुसार कार्य करते. २०२३ मध्ये, ऑस्टिनमधील टेक्सास विद्यापीठाने एखाद्या व्यक्तीच्या मेंदूच्या क्रियाकलापांचे अचूक विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या डीकोडरचा वापर केला होता, जो यशस्वी ठरला होता.

हे मशीन कसे कार्य करते?

मशीनचे कार्य तीन भागांमध्ये विभागलेले आहे:

  • इलेक्ट्रोड्स मेंदूमध्ये प्रत्यारोपित केले जातात.
  • संगणक इलेक्ट्रिकल सिग्नल्सचे भाषांतर करतो.
  • डोक्यातील विचार पडद्यावर शब्दांच्या रूपात दिसतात.

हेही वाचा : अफगाणिस्तानच्या ‘चिकन नेक’वर पाकिस्तानचा ताबा? काय आहे वाखान कॉरिडॉर?

या उपकरणाचे फायदे काय?

  • अर्धांगवायू (पॅरलाईज) झालेल्या लोकांना आवाज आणि हालचाल करणे शक्य होऊ शकते.
  • कोमामध्ये असणाऱ्या रुग्णाशी संवाद साधता येऊ शकतो.
  • पोलिस आणि लष्करी कारणांसाठीदेखील याचा वापर केला जाऊ शकतो.

Story img Loader