चीन आपल्या नवनवीन संशोधनासाठी नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात चीन स्वतःला सिद्ध करण्याच्या तयारीत आहे. चीन जगातील सर्वांत मोठे कृत्रिम बेट विमानतळ बांधणार आहे. आपल्या या आगळ्या वेगळ्या कृतीद्वारे चीन आणखी एक अभियांत्रिकी चमत्कार साध्य करण्याच्या तयारीत आहे. अनेकांचे असेही म्हणणे आहे की, हे कृत्रिम बेट जगातील आठवे आश्चर्य ठरेल. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या माहितीप्रमाणे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ईशान्येकडील लिओनिंग प्रांतातील एक गजबजलेले बंदर शहर डॅलियनला येथे तयार करण्यात येणार आहे. हे विमानतळ समुद्राच्या मध्यभागी संपूर्ण द्वीपावर तयार करण्यात येणार आहे.

डॅलियन जिंझोवान आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील इतर विमानतळांच्या तुलनेत पूर्णपणे वेगळे असणार आहे. खरे तर, हे तिसरे कृत्रिम पद्धतीने तयार होणारे बेटावरील विमानतळ असेल. परंतु, त्याच्या रचनेपासून आकारापर्यंत ते वेगळे असणार आहे. मोठ्या प्रवासी संख्येच्या दृष्टीने या विमानतळाची रचना केली जाईल. पण, हा मेगा प्रोजेक्ट नेमका कसा प्रत्यक्षात येईल? या विमानतळाचे वैशिष्ट्य काय असेल? ते जाणून घेऊ…

kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आला तर..”, रहिवाश्यांचा संताप, वैयक्तिक वाद विकोपाला!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Virat Kohli and Anushka Sharma Will Leave India and Shift To London Soon Says His Childhood Coach Rajkumar Sharma
Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती
Assembly elections vidhan sabha Kunbi Maratha Number of Maratha MLA
विधानसभेत मराठा वर्चस्वाला शह; ओबीसींना बळ
Kalyan Crime News
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Lok Sabha Speaker issues strict ban on demonstrations at Parliament House gates
Congress-BJP MPs Scuffle : काँग्रेस-भाजपा खासदारांच्या धक्काबुक्कीनंतर लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय; आता संसदेच्या गेटवर…
Sanjay Raut on Kalyan Ajmera Society Dispute
Kalyan Society Dispute: “कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे”, ठाकरे गटाची मागणी!

हेही वाचा : भाजपाच्या पूर्वसुरींनी खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जाळला होता का? जयराम रमेश यांनी भाजपावर काय आरोप केले?

h

समुद्रात तयार होणारे कृत्रिम बेट विमानतळ

डॅलियन जिंझोवान आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चीनच्या मुख्य भूभागावरील पहिले कृत्रिम-बेट विमानतळ असेल. चीनचे प्रादेशिक शेजारी देश जपान आणि दक्षिण कोरियाजवळ धोरणात्मकदृष्ट्या स्थित असलेले डॅलियन हे बंदर शहर तेल रिफायनरीज, शिपिंग, लॉजिस्टिक्स व किनारी पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे. लिओनिंग प्रांतीय सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, कृत्रिम बेट विमानतळ २०.९ चौरस किलोमीटर इतक्या प्रभावी क्षेत्राने व्यापलेले असेल आणि त्याचा आकार जगभरातील इतर समान प्रकल्पांना मागे टाकेल.

डॅलियन जिंझोवान आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चीनच्या मुख्य भूभागावरील पहिले कृत्रिम-बेट विमानतळ असेल. (छायाचित्र-एक्स/@Marksmendaily)

जगात कृत्रिम बेटावर तयार करण्यात आलेली आणखी दोन विमानतळे आहेत; ज्यात हाँगकाँग व कानसाई या विमानतळांचा समावेश आहे. नव्याने तयार होणारे डॅलियन जिंझोवान हे विमानतळ हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळ (१२.४८ चौरस किलोमीटर) व कानसाई विमानतळ (१०.५ चौरस किलोमीटर) या दोन्ही प्रसिद्ध कृत्रिम बेट विमानतळांपेक्षा लक्षणीयरीत्या मोठे असेल, अशी माहिती एव्हिएशन कन्सल्टन्सी संस्थापक ली हॅनमिंग यांनी चिनी वृत्त आउटलेटला सांगितले. कृत्रिम बेट तयार करण्यासाठी लाखो क्यूबिक मीटर वाळू आणि खडकांचा वापर करण्यात येणार आहे. या बांधकामात जमीन सुधारण्याचे प्रगत तंत्र समाविष्ट करण्यात येणार आहे. एकदा जमिनीचे काम पूर्ण झाल्यावर, त्यात चार धावपट्ट्या आणि ९,००,००० चौरस मीटर म्हणजेच अंदाजे ९.६९ दशलक्ष चौरस फूट पसरलेले एक अवाढव्य टर्मिनल असेल.

नवीन विमानतळ जुन्या डॅलियन झोशुइझी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागी तयार होणार आहे, जे मूलतः जपानी ताब्यादरम्यान सुमारे एक शतकापूर्वी बांधले गेले होते. ली यांनी सांगितले की, विद्यमान विमानतळ वैमानिकांसाठी नेव्हिगेट करणे कठीण आहे. कारण- ते जवळच्या पर्वतांनी अवरोधित असलेल्या खोऱ्यात आहे आणि त्याचे स्थान अशा ठिकाणी आहे, जिथे योग्य हवामान नसल्यास उड्डाणे स्थगित करावी लागतात. तसेच सध्याच्या विमानतळाला वाढत्या प्रवासी वाहतुकीचा सामना करावा लागत आहे. अनेक विस्तार करूनही डॅलियन झोशुइझी आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याच्या कमाल क्षमतेपर्यंत पोहोचले आहे. सिन्हुआच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी विमानतळावर ६,५८,००० आंतरराष्ट्रीय प्रवाशांची नोंद करण्यात आली.

प्रकल्प कधी पूर्ण होईल?

नवीन टर्मिनल मात्र समस्येचे निराकरण करील. विमानतळ तयार झाल्यानंतर सुरुवातीला दरवर्षी ४३ दशलक्ष प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असेल, जे आताच्या विमानतळाच्या तुलनेत दुप्पट आहे. विमानतळाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर, ८० दशलक्ष प्रवाशांना हातळण्याची आणि दरवर्षी एक दशलक्ष टन मालावर प्रक्रिया करण्याची क्षमता त्यामध्ये असेल. त्यामुळे या क्षेत्रातील हवाई प्रवासाची वाढती मागणी पूर्ण होईल. एकंदरीत एक प्रमुख आर्थिक व वाहतूक केंद्र म्हणून डॅलियनची स्थिती मजबूत होईल. कॅनडा-आधारित जागतिक उद्योग संस्था, एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलच्या मते, ४.३ अब्ज डॉलर्सचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०३५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

लिओनिंग प्रांतीय सरकारने अहवाल दिला की, ऑगस्टपर्यंत ७७,००० चौरस मीटर पुनर्वसन क्षेत्रावर खोल पाया तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील जमीन पुनर्संचयित करणे आणि टर्मिनल फाउंडेशनचे काम वेगाने होत असून, प्रगतिपथावर आहे. या नवीन प्रकल्पामुळे चीनचा आक्रमक पायाभूत सुविधांचा विस्तार कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सीएपीए सेंटर फॉर एव्हिएशनच्या मार्केट इंटेलिजन्सनुसार, जुलैपर्यंत देशभरात एकत्रितपणे २२ नवीन विमानतळांचे १९.६ अब्ज डॉलर्स किमतीचे बांधकाम सुरू होते.

हेही वाचा : भारत-चीन संघर्ष मिटणार? कैलास मानसरोवर यात्रा अन् सीमा व्यापार पुन्हा सुरू; ‘या’ सहा मुद्द्यांवर झाले एकमत

बांधकाम सुरू असलेले विमानतळ हे डॅलियनचे बंदर शहर म्हणून काम करील. कारण- या जागेमुळे चीनचा नजीकच्या देशांशी म्हणजेच दक्षिण कोरिया आणि जपानशी चीनचा व्यापार वाढेल. सहा दशलक्षांहून अधिक लोकसंख्या असलेले डॅलियन शहर बोहाई सामुद्रधुनीच्या उत्तरेकडील एका द्वीपकल्पावर वसलेले आहे. या विमानतळाचा चीनच्या अर्थव्यवस्थेवरदेखील मोठा परिणाम होणार आहे. चीनमध्ये आधीच जगातील सर्वांत व्यग्र विमानतळ (बीजिंग कॅपिटल आंतरराष्ट्रीय विमानतळ) आहे. या नवीन विमानतळाच्या बांधकामामुळे चीन जागतिक हवाई वाहतुकीचे केंद्र होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकेल. या विमानतळामुळे ग्वांगडोंग, हाँगकाँग, मकाऊ ग्रेटर बे एरियाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल.

Story img Loader