चीन दक्षिण-पश्चिम मियानयांग शहरात लेझर-इग्नेटेड फ्यूजन संशोधन केंद्र मोठ्या प्रमाणात बांधत असल्याची माहिती समोर आल्याने जगाची चिंता वाढली आहे. ‘रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या सुविधेचा वापर अण्वस्त्रांचे डिझाइन विकसित करण्यासाठी आणि ऊर्जा निर्मितीसाठी केला जाऊ शकतो. ही आण्विक फ्यूजन सुविधा बांधण्याबाबत चीनने आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. चीनने भविष्यात फ्यूजन-आधारित आण्विक अणुभट्टी तयार करण्याच्या प्रवासात एक मोठे पाऊल पुढे टाकले. चीन ‘कृत्रिम सूर्या’वर प्रयोग करत आहे. या कृत्रिम सूर्याने आता नवा विश्वविक्रम तयार केला आहे. या प्रकल्पात जवळपास १८ मिनिटांपर्यंत १० कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा उत्सर्जित करण्यात आली असून भविष्यातील अमर्याद स्वच्छ ऊर्जानिर्मितीचा चीनचा दावा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अण्वस्त्रांसाठी चीनचे संशोधन केंद्र

चीन उत्तर कॅलिफोर्नियामध्ये यूएस नॅशनल इग्निशन फॅसिलिटी (एनआयएफ) प्रमाणेच फ्यूजन संशोधन केंद्र बांधत आहे. अमेरिकेतील स्वतंत्र संशोधन संस्था सीएनए कॉर्पोरेशनचे संशोधक डेकर इव्हेलेथ यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले की, उपग्रहावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये त्याचे चार हात दिसत आहेत. तज्ज्ञ अण्वस्त्रांच्या विकासासाठी हे महत्त्वाचे मानत आहे. त्यात एक लेसर बे आहे, जिथे हायड्रोजन एकत्र आणून ऊर्जा निर्माण केली जाईल. या सुविधेचा लेआउट ३.५ अब्ज डॉलर्स यूएस एनआयएफसारखा आहे.

चीन उत्तर कॅलिफोर्नियामध्ये यूएस नॅशनल इग्निशन फॅसिलिटी (एनआयएफ) प्रमाणेच फ्यूजन संशोधन केंद्र बांधत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : ट्रम्प यांचा दिवाळखोर पाकिस्तानला दणका; थांबवली आर्थिक मदत, याचा परिणाम काय?

‘इव्हेलेथ’ यांच्या मते, चायनीज केंद्रातील हे क्षेत्र ‘एनआयएफ’मधील प्रयोगापेक्षा ५० टक्के मोठे आहे, जो सध्या सर्वात मोठा आहे. यूएस शस्त्र नियंत्रण दूत मार्शल बिलिंगस्ले यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये चीनच्या अण्वस्त्र समर्थन सुविधांच्या वाढीची उपग्रह प्रतिमा उघड केली. जमीन साफ असलेले भूखंड दर्शविणारे मियांयांगची छायाचित्रेदेखील होती. ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, हे प्लॉट फ्यूजन संशोधन केंद्राचे ठिकाण आहे, ज्याला लेझर फ्यूजन मेजर उपकरण प्रयोगशाळा म्हणतात.

जगासाठी या संशोधन केंद्राचा अर्थ काय?

चीन हायड्रोजन वापरून फ्यूजन ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा स्त्रोत कसा निर्माण होऊ शकतो याचा अभ्यास संशोधक करू शकते. चीनच्या नवीन फ्यूजन संशोधन केंद्राचा अमेरिकेला धोका नाही. चीनने ४५ अण्वस्त्रांची चाचणी केली आहे, तर अमेरिकेने १,०५४ अण्वस्त्रांची चाचणी केली आहे. अणु चाचणी बंदी करारांतर्गत आण्विक स्फोटांवर बंदी असताना, सबक्रिटिकल स्फोटक चाचण्या आणि लेझर फ्यूजन संशोधनाला परवानगी आहे. सबक्रिटिकल आणि लेझर फ्यूजन प्रयोगांसाठी चीनकडे मोठा डेटा सेट नाही.

“मला वाटत नाही की याने फार मोठा फरक पडेल आणि म्हणून चीन त्यांच्या अण्वस्त्र सुविधांच्या बाबतीत आपल्यापेक्षा पुढे आहे याबद्दल मला काळजी वाटत नाही,”असे एक प्रमुख यूएस अण्वस्त्र संशोधन सुविधा लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरीचे माजी संचालक सीगफ्राइड हेकर यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले. परंतु, चिंतेचे कारणही आहे. चीन अण्वस्त्रांचे डिझाइन सुधारण्यासाठी फ्यूजन संशोधन सुविधा वापरू शकतो. हेन्री एल स्टिमसन येथील अणु धोरण विश्लेषक विल्यम अल्बर्क म्हणाले, “एनआयएफ प्रकारची सुविधा असलेला कोणताही देश त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतो आणि विद्यमान शस्त्रास्त्रांच्या डिझाइनमध्ये सुधारणा करू शकतो आणि भविष्यातील बॉम्ब डिझाइनची चाचणी न करता डिझाइन सुलभ करू शकतो.”

हेही वाचा : कुख्यात कैद्यांच्या तुरुंगात ट्रम्प बेकायदा स्थलांतरितांना पाठवणार; काय आहे ग्वांटानामो बे?

चीन हायड्रोजन वापरून फ्यूजन ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा स्त्रोत कसा निर्माण होऊ शकतो याचा अभ्यास संशोधक करू शकते. (छायाचित्र-रॉयटर्स)

भारतासाठी ही चिंतेची बाब आहे का?

भारताच्या तुलनेत चीनने आपली आण्विक क्षमता अधिक वेगाने वाढवली आहे. जानेवारी २०२३ मध्ये चीनचे शस्त्रागार ४१० अण्वस्त्रांवरून जानेवारी २०२४ पर्यंत अंदाजे ५०० पर्यंत वाढले. दुसरीकडे, भारताच्या शस्त्रास्त्रांची संख्या १७२ असण्याचा अंदाज आहे. ही नवीन आण्विक संलयन सुविधा बांधून,चीन आवश्यक अण्वस्त्रांच्या डिझाइनमध्ये सुधारणा करू शकतो. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, या संशोधन केंद्रामुळे गुप्तपणे शस्त्रागार मजबूत करण्यात चीनला मदत होईल. अणुऊर्जा निर्मितीच्या बाबतीतही चीन भारताच्या पुढे आहे. चीनकडे ५५ अणुऊर्जा अणुभट्ट्या आहेत, तर भारताकडे अशा केवळ २३ अणुभट्ट्या आहेत.

चीनचा शिदाओवान चौथ्या पिढीचा अणुऊर्जा प्रकल्प डिसेंबर २०२३ पासून कार्यरत होत आहे, जो जगातील पहिला प्रकल्प आहे. तिसऱ्या पिढीच्या अणुभट्ट्यांचे व्यावसायिकीकरण करणारा चीन हा पहिला देश आहे. चीनची दरवर्षी सहा ते आठ नवीन अणुभट्ट्या विकसित करण्याची योजना आहे. चीनने नुकतीच न्यूक्लियर फ्यूजन अणुभट्टी बांधण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मोठी झेप घेतली आहे. न्यूक्लियर फ्यूजन ही अशी प्रक्रिया आहे, जी सूर्य आणि इतर ताऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करते.

हेही वाचा : इन्फ्लुएंसर्स सेबीच्या रडारवर? इन्स्टा-युट्यूबवर झटपट श्रीमंतीच्या टिप्स देणं महागात पडण्याची चिन्हं

६० वर्षांहून अधिक काळ शास्त्रज्ञ पृथ्वीवर स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यासाठी न्यूक्लिअर फ्यूजन वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनमधील प्रायोगिक आण्विक फ्यूजन अणुभट्टीने अलीकडेच १,०६६ सेकंदांसाठी १० कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा उत्सर्जित करण्यात आली आणि स्वतःचा जागतिक विक्रम मोडला आहे. एप्रिल २०२३ मध्ये चीनने ४०३ सेकंदांसाठी ऊर्जा उत्सर्जित करण्याचा विक्रम केला होता. ही एक मोठी कामगिरी आहे, यामुळे अणुनिर्मितीमध्ये चीनचे एक पाऊल पुढे पडले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China is making huge fusion research facility for nuclear impact on india rac