संदीप नलावडे

अमेरिका आणि चीन या जगातील बलाढ्य देशांतील वाद वाढत आहेत. अमेरिकेवर लक्ष ठेवण्यासाठी लॅटिन अमेरिकी देश असलेल्या क्युबामध्ये चीनने गुप्तचर तळ उभारला असून २०१९ पासून चीनकडून या तळामार्फत हेरगिरी सुरू आहे. गुप्तचर तळ बांधण्याच्या बदल्यात चीनने क्युबाला अनेक अब्ज डॉलर दिले आहेत. अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तपत्राने ही माहिती दिली असून जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अगदी समीप चीन हेरगिरी करत असल्याचे सिद्ध झाले आहे. चीनच्या या नव्या हेरगिरीविषयी…

Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
China is aggressive again after Taiwans war drills What are chances of war
तैवानच्या युद्धसरावाने चीन पुन्हा आक्रमक? युद्धाची शक्यता किती?
Donald Trump
Donald Trump : ‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा! सर्व आरोपातून झाली बिनशर्त सुटका
Donald Trump
Donald Trump : आम्हीच अमेरिकेतली काही राज्ये विकत घेतो! कॅनडाच्या नेत्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनाच दिली ऑफर
Image of a person holding a kite string or a bike with a caution sign
Chinese Manjha : चिनी मांजाने घेतला निष्पाप तरुणाचा जीव, कामावरून परतत असताना झाला घात
India redflags Chinas 2 new counties
चीनने गिळंकृत केला लडाखचा एक प्रदेश, काय आहे प्रकरण?
Attempt to spread poison in the name of caste PM Modi criticizes opponents
जातीच्या नावावर विष पसरवण्याचा प्रयत्न; पंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर टीका

‘क्युबातील गुप्तचर तळातून चीन कशा प्रकारे हेरगिरी करणार?

चीन आणि क्युबा या दोन्ही देशांमध्ये डाव्या विचारसरणीचे सरकार आहे. अमेरिकेतील फ्लोरिडापासून १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या क्युबामधील बेटावर इलेक्ट्रॉनिक इव्ह्स्ड्रॉपिंग (गोपनीय संभाषण चोरून ऐकणे) सुविधा उभारण्यासाठी चीनने क्युबाबरोबर गुप्त करार केला आहे. अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या आघाडीच्या वृत्तपत्राने याबाबत बातमी दिली आहे. चीन २०१९ पासून क्युबामध्ये गुप्तचर तळ चालवत आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या क्युबाला या करारातून अब्जावधी डॉलर चीनकडून मिळाले असल्याचेही वृत्त आहे. या गुप्तचर तळातून चीनला अमेरिकेच्या आग्नेय प्रदेशाची माहिती मिळू शकते. अमेरिकेच्या या भागात लष्कराचे अनेक तळ आहेत. अमेरिकेसाठी लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या भागाची माहिती मिळविण्याचा चीनचा प्रयत्न आहे. या गुप्तचर तळाच्या माध्यमातून चीनला अमेरिकेच्या जहाजांच्या वाहतुकीचा मागोवा घेता येणार आहे. अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडचे मुख्यालयही फ्लोरिडा येथील टँपा येथे आहे. उत्तर कॅरोलिनामध्ये अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ आहे. क्युबापासून या लष्करी तळाचे अंतर सुमारे १५०० किलोमीटर आहे. ज्यावर लक्ष ठेवणे चीनला सोपे जाऊ शकते.

हे पण वाचा चीनमधून अखेरच्या भारतीय पत्रकाराची हकालपट्टी

चीनच्या गुप्तचर तळाबाबत अमेरिकेचे म्हणणे काय?

क्युबामध्ये गुप्तचर तळ उभारण्याच्या वृत्तपत्रातील बातमीचे अमेरिकी प्रशासनाने खंडन केले आहे. व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रवक्ते जॉन कर्बी यांनी याचा इन्कार केला असून आघाडीच्या वृत्तपत्राचा वृत्त अहवाल अचूक नसल्याचे सांगितले. बायडेन प्रशासन पहिल्या दिवसापासूनच चीनच्या हेरगिरीवर लक्ष ठेवून आहे. आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी याकडे दुर्लक्ष अजिबात करणार नसून चीनच्या क्युबामधील कारवायांवर आमचे लक्ष असेल, असे कर्बी म्हणाले. अमेरिकेच्या गुप्तचर विभागानेही क्युबातील चिनी हेरगिरी ही बाब असत्य असल्याचे सांगितले असून अशा प्रकारचे फसवे वृत्त पसरविण्यात चीन पटाईत असल्याचे म्हटले आहे. मात्र बायडेन प्रशासनातील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर चीनच्या क्युबामधील हेरगिरीच्या वृत्ताचा स्वीकार केला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर समुदायाला क्युबातून चीनच्या हेरगिरीबद्दल आणि काही काळासाठी जगभरातील गुप्तचर संकलन कारवाया सुरू करण्याच्या मोठ्या प्रयत्नांची माहिती आहे. चीनच्या वाढत्या हेरगिरीच्या प्रयत्नांना आळा घालण्याचे प्रयत्न बायडेन प्रशासनाकडून केले जात असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

हे पण वाचा-Lionel Messi: चीनने स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला तब्बल अर्धा तास ठेवले ताटकळत, नेमके काय आहे कारण? जाणून घ्या

चीन आणि क्युबा यांची भूमिका काय?

अमेरिकी वृत्तपत्राने क्युबामधील चीनच्या गुप्तहेर तळाबाबत माहिती दिल्यानंतर चीननेही याचे खंडन केले आहे. या वृत्तावरून चीनने अमेरिकेला लक्ष्य केले आहे. अमेरिका अशा प्रकारचे वृत्त पेरून अफवा पसरवत आहे आणि जगभरात आमची बदनामी करत असल्याचे चीनने म्हटले आहे. क्युबाच्या सरकारनेही अमेरिकी प्रशासनावर जोरदार टीका केली. क्युबाचे उपपरराष्ट्रमंत्री कार्लोस फर्नांडिस डी कोसिओ यांनी हा वृत्त अहवाल पूर्णपणे खोटा असल्याचे सांगून फेटाळून लावला. लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियनमध्ये कोणत्याही परदेशी सैन्याची उपस्थिती क्युबा नाकारत असल्याचे ते म्हणाले. या वृत्त अहवालातील निष्कर्ष निंदनीय आहे. कोणतेही वृत्तपत्रीय निकष न पाळता, जे प्रसिद्ध करतात त्यास समर्थन देण्यासाठी कोणताही डाटा किंवा पुरावे न देता अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध करण्यात येत असून आमची बदनामी करण्यासाठी विशिष्ट माध्यमांद्वारे अमेरिका प्रचार करत असल्याचा आरोप कोसिओ यांनी केला. क्युबावर आर्थिक निर्बंध लावण्यासाठी असे आरोप करण्यात असल्याचेही क्युबा सरकारने म्हटले आहे.

क्युबा आणि अमेरिकचे संबंध कसे आहेत?

१९५९ मध्ये क्युबन क्रांतीनंतर क्युबा आणि अमेरिका या देशांतील संबंध बिघडले. फिडेल कॅस्ट्रो यांनी प्रदीर्घ संघर्षानंतर क्युबामध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन केले. अमेरिका व क्युबा यांचे संबंध बिघडायला तेव्हापासून सुरुवात झाली. त्यानंतर शीतयुद्धात क्युबाने रशियाला साथ दिली. क्युबामध्ये रशियाचे अनेक लष्करी तळ होते. रशियाने अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी आण्विक क्षेपणास्त्रे तैनात केली होती. १९६१ मध्ये अमेरिकेने क्युबाशी राजनैतिक संबंध तोडले आणि या देशावर आक्रमण करण्यासाठी क्युबाच्या निर्वासितांचा आणि केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांचा वापर केला. १९६२ मध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यात क्युबामधील बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या तैनातीवरून वाद निर्माण झाले. उभय देशांमध्ये क्युबामधून आण्विक युद्ध होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. क्युबा आणि व्हेनेझुएला हे देश वैचारिकदृष्ट्या अमेरिकेच्या भांडवलशाही धोरणाच्या विरोधात मानले जातात. हे दोन्ही देश आर्थिक अस्थिरतेच्या काळातून जात असले तरी त्यांचा अमेरिकाविरोध तीव्र आहे.

क्युबा आणि चीन यांच्यातील संबंध कसे आहेत?

क्युबा आणि चीन या दोन्ही देशांमध्ये कम्युनिस्ट विचारसरणीची सरकारे आहेत. अमेरिकेला धडा शिकविण्यासाठी क्युबाने यापूर्वी कम्युनिस्ट असलेल्या रशियाला मदत केली आणि केवळ अमेरिकाविरोध म्हणून चीनशी संबंध सुधरविण्याचा क्युबाचा प्रयत्न आहे. उभय देशांमधील संबंध व्यापारी आणि गुंतवणुकीवरच आधारित नसून एकमेकांना लष्करी मदतही केली जात आहे. दक्षिण अमेरिकेत व्हेनेझुएलानंतर चीन हा क्युबाचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. चीन आणि क्युबा यांना एकमेकांच्या सार्वभौम अंतर्गत बाबींचा आदर आहे. चीनने क्युबासोबत रेल्वे नेटवर्क आणि इतर उपक्रम सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे. अमेरिकेच्या अगदी जवळच हे राष्ट्र असल्याने आपल्या फायद्यासाठी चीनने क्युबाशी आंतरराष्ट्रीय संबंध वाढविले आहेत.

अमेरिका-चीन संबंध आणखी बिघडणार?

क्युबामध्ये चीनने गुप्तहेर तळ उभारण्याच्या वृत्तानंतर अमेरिका नेमकी काय भूमिका घेतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गतवर्षी अमेरिकेच्या हद्दीत आलेला चीनचा गुप्तचर फुगा फोडल्यानंतर दोन्ही देशांमधील वाद वाढत आहे. त्यातच नुकत्याच तैवान प्रश्नावरून दोघांमधील वादाची दरी आणखी खोल झाली आहे. क्युबामध्ये गुप्तहेर तळ उभारल्यानंतर या दोन्ही राष्ट्रांतील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि चीन यांच्या तणाव आणखी वाढला आहे. गेल्या वर्षी अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या तत्कालीन सभापती नॅन्सी पलोसी यांनी लोकशाही पद्धतीने शासित असलेल्या तैवानला भेट दिल्यानंतर उभय देशांतील संबंधला तडा गेला. तैवान हा आमच्या देशाचा भाग असल्याचा दाव करत अमेरिकेने या प्रश्नी हस्तक्षेप न करण्याचा इशारा चीनने दिला आहे. अमेरिकेचे सचिव अँटनी ब्लिंकन पुढील आठवड्यात चीनला जाण्याची योजना आखली आहे. मात्र द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी अशी बैठक आवश्यक असली तरी उभय देशांतील संबंध त्यामुळे सुधारतील असे वाटत नाही.

sandeep.nalawade@expressindia.com

Story img Loader