चीनमधील घसरलेल्या लोकसंख्येमुळे चीनमध्ये अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. लोकसंख्येशी संबंधित अनेक समस्यांचा सामना चीनला करावा लागत आहे. चीनमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे आणि जन्मदर घटत आहे. आता चीनसमोर आणखी एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनमधील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसून सुमारे ३.५ कोटी पुरुष सिंगल आहेत. त्यांना ‘लेफ्टओव्हर मेन’ म्हणून संबोधले जात आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या लिंग असमतोलामुळे चीनमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय विवाह हा एकमेव मार्ग असल्याचे काही तज्ज्ञांचे सांगणे आहे. मात्र, त्यावरूनही आता वाद निर्माण झाला आहे. चीनमधील एकूण परिस्थिती काय? चीनमधील मुलांना मुली का मिळत नाहीत? यावरील उपाय काय? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

चीन सध्या लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाचा सामना करत आहे. ‘लेफ्टओव्हर मेन’ म्हणून ओळखले जाणारे ३.५ कोटी पुरुषांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने चीनमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातील बहुतांश पुरुषांचे वय ३० ते ४० दरम्यान आहे. स्वतःसाठी जोडीदार शोधण्यासाठी हे पुरुष धडपड करत आहेत. चीनमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या मते, झियामेन विद्यापीठातील अर्थशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डिंग चांगफा यांनी या समस्येवर उपाय सुचवला आहे; ज्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यांनी या पुरुषांना आंतरराष्ट्रीय विवाह करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून अनेकांनी अशा पद्धतीच्या परिणामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

हेही वाचा : भारताचा सर्वांत मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश ठरला आर्मेनिया; भारताला याचा किती फायदा?

चीनमधील लिंग असमतोल

२०२० मध्ये झालेल्या लोकसंख्या गणनेनुसार, चीनमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अंदाजे ३४.९ दशलक्ष अधिक आहे. चीनमध्ये जन्मदर कमी झाला आहे आणि वृद्धांची संख्या वाढली आहे. चीनमधील धोरण या परिस्थितीस कारणीभूत असल्याचे चीनचे सांगणे आहे. चीनमध्ये अनेक दशकांपासून ‘एक कुटुंब एक मूल’ धोरण आहे. सेंट्रल चायना नॉर्मल युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट फॉर चायना रुरल स्टडीजच्या या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या अहवालात ग्रामीण तरुण पुरुषांना गेल्या दशकात जोडीदार शोधण्यात येणाऱ्या वाढत्या अडचणींचा तपशील देण्यात आला आहे. ‘फॉक्सकॉन’मधील कामगारांपैकी एक असणार्‍या लिऊ यांनी २०१७ मध्ये त्यांचा अनुभव ‘द गार्डियन’ला सांगितला होता.

२०२० मध्ये झालेल्या लोकसंख्या गणनेनुसार, चीनमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अंदाजे ३४.९ दशलक्ष अधिक आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

आपल्या पालकांना आधार देण्यासाठी म्हणून अधिक पैसे कमावण्याच्या आशेने तो शेन्झेनला गेला. परंतु, नोकरी मिळत नसल्यामुळे त्याला असुरक्षित, कमी-कुशल नोकरीचा स्वीकार करावा लागला. त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे डेटिंगचा विचार करणे त्याच्यासाठी शक्य नव्हते. “माझ्याकडे आत्मविश्वास वाटण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. जेव्हा एखाद्या पुरुषाकडे पैसा असतो तेव्हा त्याच्यात एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि तो मुलीला मागणीही घालू शकतो,” असे त्याने सांगितले. संस्थेच्या अहवालात पारंपरिक विवाह व्यवस्थेबद्दलचा आदर कमी होणे आणि वधूच्या उच्च अपेक्षादेखील या परिस्थितीस कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. हे समस्येचे प्रमुख योगदान म्हणून ओळखले जाते.

पर्ल रिव्हर डेल्टामधील आणखी एक कारखाना कामगार जिन याने ‘द गार्डियन’ला आपला अनुभव सांगितला. तो म्हणाला, “माझ्या चुलत भावाने एका मुलीला भेटण्यासाठी आणले, आम्ही भेटलो, तेव्हा काही मिनिटांतच मुलीने स्पष्ट केले की मुलाकडे एक अपार्टमेंट असणे आणि कार असणे आवश्यक असल्याचे सांगितले. मी तिच्या या गरजा पूर्ण करू शकत नव्हतो.” अशी परिस्थिती जिनसारख्या पुरुषांवर प्रचंड दबाव निर्माण करते.

आंतरराष्ट्रीय विवाह यावरील उपाय आहे का?

झियामेन विद्यापीठातील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहयोगी प्राध्यापक डिंग चांगफा यांनी आंतरराष्ट्रीय विवाहांना प्रोत्साहन देण्याची आणि अधिक परदेशी वधू चीनमध्ये आणण्याचा सल्ला दिला. डिंग यांनी सुचवले की चिनी पुरुष, विशेषत: ग्रामीण भागातील, संभाव्य जोडीदारासाठी रशिया, कंबोडिया, व्हिएतनाम आणि पाकिस्तान या देशांचाही विचार करू शकतात. “ग्रामीण चीनमध्ये अंदाजे ३४.९ दशलक्ष ‘अविवाहित पुरुष आहेत, ज्यांना वधूच्या विविध अपेक्षा पूर्ण करण्याचे ओझे वाढले आहे. या समस्येचे निराकरण म्हणजे परदेशातील महिलांशी विवाह करून त्यांना आपल्या देशात आणले जाऊ शकते,” असे ते म्हणाले. परंतु, या सल्ल्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. अनेक महिलांनी चिंता व्यक्त केली की परदेशी वधू ही संकल्पना मानवी तस्करीशी संबंधित आहे. इतरांनी भाषेतील अडथळ्यांच्या संभाव्यतेवर प्रकाश टाकला; ज्यामुळे कौटुंबिक संघर्ष आणि सांस्कृतिक गैरसमज होऊ शकतात. असे असले तरीही चीनमध्ये आंतरराष्ट्रीय विवाहांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

हेही वाचा : शत्रूच्या ड्रोन्सचा नायनाट करायला ‘वज्र गन’ सज्ज; काय आहे याचं महत्त्व व वैशिष्ट्य?

सोशल मीडिया ॲपवर जोडीदाराचा शोध

चीनमध्ये चायनीज सोशल मीडिया ॲप ‘डुयिन’वर सहभागींचे प्रमाण वाढले आहे. या प्लॅटफॉर्मवर परदेशात वधू शोधणाऱ्या चिनी पुरुषांसाठी पर्याय म्हणून आंतरराष्ट्रीय विवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रभावकांची वाढ होत आहे. डुयिनवर १.८ दशलक्षाहून अधिक फोलोवर्स असलेले जिंगॉन्ग्झी म्हणाले, “दक्षिण-पूर्व आशियाने प्राचीन काळापासून चीनशी घनिष्ठ संबंध राखले आहेत आणि सांस्कृतिकदृष्ट्या आमच्यात अनेक समानता आहेत. उदाहरणार्थ, व्हिएतनाम अजूनही चंद्र नववर्ष साजरे करतो. परिणामी, दक्षिण-पूर्व आशियातील महिला जेव्हा चीनमध्ये येतात, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक बदलाचा सामना करावा लागत नाही. त्याशिवाय या देशांमध्ये स्थानिक उत्पन्नही खूप कमी आहे.” ते पुढे म्हणाले, “अनेक दक्षिण-पूर्व आशियाई देश आमच्याशी संबंध मजबूत करण्यासाठी मँडरीनचा सक्रियपणे प्रचार करत आहेत; ज्यामुळे दळणवळणातील अडथळे दूर होतील. याव्यतिरिक्त काही मॅचमेकिंग प्लॅटफॉर्म आता विशेषतः चिनी पुरुषांना रशियन महिलांशी जोडतात, कारण रशियामध्ये महिलांची संख्या जास्त आहे.