अमेरिकेतील युटामध्ये (Utah) एक विचित्र प्रकार समोर आला आहे. ‘सायबर किडनॅपिंग’च्या मदतीने आरोपींनी एका दाम्पत्याकडून तब्बल ८० हजार डॉलर्सची खंडणी मागितली आहे. तुमच्या मुलाचे आम्ही अपहरण केले असून पैसे देण्याची मागणी खंडणीखोरांनी केली. दरम्यान, या प्रकरणाची जगभरात चर्चा होत असून सायबर किडनॅपिंग म्हणजे काय? अशा प्रकारचा गुन्हा कसा केला जातो? सायबर किडनॅपिंगपासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी? असे विचारले जात आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…

अमेरिकेत नेमकं काय घडलं?

अमेरिकेतील युटा (Utah) येथे सायबर किडनॅपिंगची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार मुळच्या चीनच्या एका १७ वर्षीय काई झुआंग नावाच्या विद्यार्थ्यासोबत हा प्रकार घडला. २८ डिसेंबर रोजी तो बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर चीनमध्ये असलेल्या त्याच्या पालकांनी खंडणी म्हणून खंडणीखोरांना तब्बल ८० हजार डॉलर्स दिले आहेत.

Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
The little boy was studying in the light of the street lamps
याला म्हणतात चांगले कर्म! रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करत होता चिमुकला, इन्फ्लुअन्सर तरुणाने केले असं काही… VIDEO एकदा पाहाच
loksatta kutuhal artificial intelligence for scientific data analysis
कुतूहल – शास्त्रीय संशोधन : विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Loksatta kutuhal Artificial Intelligence ISRO and DRDO
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता : इस्राो आणि डीआरडीओ

मुलगा एका टेंटमध्ये आढळला

झुआंग या विद्यार्थ्याच्या पालकांनी त्याच्या युटामधील रिव्हरडेल या भागातील शाळेला आमच्या मुलाचे अपहरण झाल्याचे सांगितले. त्यानंतर शाळा प्रशासनाने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा मुलगा बिरघम शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर एका टेंटमध्ये आढळला. त्याने स्वत:च स्वत:ला विलग केले होते, असे प्रथमदर्शनी वाटत होते. नंतर सखोल चौकशीनंतर हा प्रकार ‘सायबर किडनॅपिंग’ होते, असे पोलिसांना समजले.

सायबर किडनॅपिंग म्हणजे काय?

आजकाल खंडणी मागण्यासाठी सायबर किडनॅपिंगची मदत घेतली जात आहे. अशा प्रकारच्या किडनॅपिंगमध्ये एखाद्या व्यक्तीला स्वत:ला लपून बसण्याची जबरदस्ती केली जाते. त्यानंतर लपून बसलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना आम्ही संबंधित व्यक्तीचे अपहरण केल्याचे सांगितले जाते. तसेच तुमची व्यक्ती सुखरुप परत हवी असेल तर पैसे द्यावेत, अशी खंडणी मागितली जाते. संबंधित व्यक्तीचे अपहरण झाल्याचे सांगण्यासाठी पीडित व्यक्तीला स्वत:चे बांधल्याचे किंवा कैद केल्याचे फोटो पाठवण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर हेच पीडित व्यक्तीचे हात-पाय बांधलेले फोटो त्याच्या नातेवाईकांना पाठवले जातात. त्यानंतर नातेवाईकांकडून खंडणीच्या रुपात पैसे घेतले जातात.

१७ वर्षीय मुलासोबत नेमके काय घडले?

प्रत्यक्षात खंडणीखोरांनी कोणाचेही अपहरण केलेले नसते. मात्र, तंत्रज्ञानाच्या मदतीने पीडित व्यक्तीचे खरंच अपहरण झालेले आहे, असे चित्र निर्माण केले जाते आणि पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांकडून खंडणी मागितली जाते. युटा येथील प्रकरणातही १७ वर्षीय मुलाला कैद केल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. त्यासाठी पीडित मुलाचे हात-पाय बांधलेले फोटो त्याच्या पालकांना पाठवण्यात आले. पोलिसांच्या अंदाजानुसार २० डिसेंबर २०२३ पासून या मुलाच्या फोन कॉल्सचा डेटा तसेच बँकेच्या व्यवहारावर पाळत ठेवली जात होती. तेव्हापासूनच या मुलाला फसवले जात होते, असे पोलिसांना वाटते.

अपहरण केल्याचे भासवले जाते

एफबीआयच्या वेबसाईटवरही आभासी किडनॅपिंगविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. “आभासी म्हणजेच सायबर किडनॅपिंग हे अनेक माध्यमांनी होऊ शकते. मात्र, अशा प्रकारच्या अपहरणाचा खंडणी मागणे हाच उद्देश असतो. अशा प्रकारच्या अपहरणात संबंधित पीडित व्यक्तीच्या सुटकेसाठी पैशांची मागणी केली जाते. पीडित व्यक्ती आमच्या ताब्यात असून तिला त्रास दिला जातोय किंवा या व्यक्तीचा खूनही होऊ शकतो, असे भासवले जाते. खरं पाहता अशा प्रकारच्या अपहरणात खंडणीखोरांनी कोणाचेही अपहरण केलेले नसते. मात्र, अपहरण झाल्याचे भासवून खंडणी मागितली जाते,” असे एफबीआयच्या संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर खंडणीखोर कोणाच्याही हुबेहूब आवाजाची निर्मिती करू शकतात. गेल्या वर्षी अमेरिकेत अरिझोना राज्यातील जेनिफर डेस्टेफॅना नावाच्या महिलेबरोबर असाच प्रकार घडला होता. या महिलेला एक निनावी कॉल आला होता. या कॉलमध्ये त्या महिलेची मुलगी रडत होती आणि मला काही लोकांनी पकडले आहे, असे सांगत होती. त्यानंतर खंडणीखोरांनी मुलगी सुखरुप हवी असेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगितले होते. या महिलेने घाबरून आपल्या मुलीच्या मोबाइलवर फोन केला. त्यानंतर समोरून मी सुखरूप असल्याचे या महिलेला तिच्या मुलीने सांगितले होते. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर या महिलेच्या मुलीच्या कृत्रिम आवाजाची निर्मिती करण्यात आली होती.

आतापर्यंत किती जणांची फसवणूक?

दरम्यान, अशा प्रकारे आतापर्यंत किती लोकांना फसवण्यात आले आहे, याची कोणतीही माहिती सध्यातरी उपलब्ध नाही. बीबीसीने जुलै २०२० मध्ये एक वृत्त दिले होते. या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियामध्ये २०२० साली सायबर किडनॅपिंगच्या एकूण आठ तक्रारी दाखल झाल्या होत्या. या सर्व तक्रारींनुसार मुळच्या चीनच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले होते.

स्वत:चा बचाव कसा करावा?

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात अशा प्रकारच्या घटना आपल्यासोबत घडू नयेत, यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अनोळख्या नंबरवरून आलेला फोन कॉल उचलताना काळजी घ्यावी. काही सायबर गुन्हेगार नातेवाईक असल्याचे भासवतात. त्यामुळे अनोळखी नंबर उचलताना काळजी घ्यावी. अशा प्रकारे फसवणूक करण्यासाठी तुमच्या समाजमाध्यमांवर असलेल्या माहितीची मदत घेतली जाऊ शकते. त्यामुळे भाऊ, बहीण, आई-वडील तसेच मुलांची नावे, त्यांचे राहण्याचे ठिकाण समाजमाध्यमांवर टाकताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. समाजमाध्यमांवर घराचा फोटो, कुटुंबीयांचे फोटो टाकताना काळजी घ्या.