केंद्र सरकारकडून सातत्याने आपल्या मोबाईलवर मेसेज स्वरुपात किंवा रेकॉर्डेड फोन कॉलच्या स्वरूपात ऑनलाईन फ्रॉडपासून सावध राहण्याचे संदेश येत असतात. अनेकदा अशा मेसेजेसचा वैताग आल्याचंही लोक सांगतात. पण कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीला बळी न पडण्यासाठी सतर्क राहणं किती आवश्यक आहे, हे नुकत्याच उघड झालेल्या तब्बल ९०३ कोटींच्या महाघोटाळ्यावरून स्पष्ट झालं आहे. हैदराबाद पोलिसांनी या महाघोटाळ्याचा पर्दाफाश केला असून या प्रकरणात एकूण १० आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये चीन, तैवान आणि भारत अशा तीनही देशातील नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे या घोटाळ्याचं स्वरूप किती व्यापक होतं, याचा सहज अंदाज यावा!

बुधवारी, अर्थात १२ ऑक्टोबर रोजी हैदराबाद पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. हा एवढा मोठा घोटाळा करण्यासाठी चीनमध्ये बसलेल्या घोटाळ्याच्या मास्टरमाईंडनी परकीय चलन रुपांतरीत करण्याच्या माध्यमांचा वापर केल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली आहे. हा पैसा गोळा करण्यासाठी बनावट मोबाईल अॅपचा वापर करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. “आत्तापर्यंत या घोटाळ्याशी संबंधित अनेक बँक खाती गोठवून १.९१ कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. पण हा घोटाळा खूप मोठा आहे आमच्याकडे असलेल्या पुराव्यांवरून जवळपास ९०३ कोटी रुपये बेकायदेशीररीत्या बाहेर गेले आहेत”, अशी माहिती हैदराबाद पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी माध्यमांना दिली आहे.

dhfl scam of wadhawan family
घोटाळ्यांचे घराणे (डीएचएफएल)
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Malegaon ed investigation 125 crore rupees scam
मालेगावातील कोटींच्या उड्डाणांची ईडी चौकशी
ca ambar dalal
अंबर दलाल प्रकरणात २२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ११०० कोटींचा गैरव्यवहार
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
Fraud for 50 thousand rupees by claiming to cure cancer in thane
कर्करोगावरील उपचाराच्या नावाने फसवणूक
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ

काय होती घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?

या घोटाळ्यासाठी प्रामुख्याने बनावट मोबाईल अॅप्सचा वापर करण्यात आला. त्याद्वारे लोकांना गुंतवणुकीवर दुप्पट परतावा देण्याची आमिषं दाखवण्यात आली. सुरुवातीला लोकांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावाही देण्यात आला. पण नंतर मोठ्या प्रमाणावर रक्कम आल्यानंतर हे अॅप निष्क्रिय झाले आणि आपली फसगत झाल्याचं लोकांच्या लक्षात आलं. हा पैसा नंतर डॉलरमध्ये रुपांतरीत करून हवालाच्या माध्यमातून विदेशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा केला जायचा. तिथून पुन्हा दुसऱ्या खात्यांमध्ये हा पैसा ट्रान्सफर होत होता.

विश्लेषण: हिंदी भाषेची सर्व राज्यांवर सक्ती? कार्यालयीन भाषा समितीच्या अहवालावरून राजकारण तापलं; नेमकं काय आहे प्रकरण?

घोटाळ्यामध्ये कोण सहभागी?

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्यामध्ये चीन, तैवान, संयुक्त अरब अमिराती आणि भारत अशा चार देशांमधील आरोपी सहभागी आहेत. या घोटाळ्याचं सगळं सूत्रसंचालन चीनमधून केलं जायचं. चीनचा नागरिक लेक उर्फ ली झोंजुन, तैवानचा नागरिक चु चुन-यू, भारताच्या इतर भागातील नागरिक नागरिक विरेंद्र सिंह, संजय यादव, साहिल बजाज, सनी उर्फ पंकज, नवनीत कौशिक आणि हैदराबादचे नागरिक मोहम्मद परवेझ, सय्यद सुलतान आणि मिर्झा नदीम बेग अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

एका तक्रारीने हाती लागलं घबाड!

हा सगळा घोटाळा हैदराबादमधील एका व्यावसायिकानं केलेल्या तक्रारीनंतर उघड झाला. या व्यक्तीने जुलै महिन्यात Loxam नावाच्या मोबाईल अॅपवर गुंतवणूक केल्यानंतर तब्बल १.६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. तपास केला असता हा पैसा या मोबाईल अॅपच्या माध्यमातून इंडसइंड बँकेतील Xindai Technologies Pvt Ltd च्या नावाने नोंद असलेल्या खात्यामध्ये जमा झाली होती.हे खातं विजेंद्रसिंग राठोड नावाच्या व्यक्तीने चीनी नागरिक असलेल्या जॅक नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून उघडलं होतं. यासाठी विजेंद्रला १.२ लाख रुपये कमिशन स्वरुपात मिळाले होते! याच खात्यासाठी दिलेला मोबाईल क्रमांक वापरून Bentech Networkds Pvt Ltd असं दुसरं एक खातंही उघडण्यात आलं होतं. हे खातं दिल्लीतला रहिवासी संजय कुमार यादव यानं लेक उर्फ ली झोंजुन याच्या सांगण्यावरून उघडलं होतं.

या सर्व खात्यांची माहिती, क्रमांक आणि इतर डिटेल्स चीनमधे बसलेल्या पेई आणि हुआन झुआन यांना देण्यात आले. संजय यादवनं अशाच प्रकारे एकूण १५ बँक खाती उघडून त्याची चु चुन-यू ला पाठवली होती. चुन-यूनं पुढे या खात्यांची माहिती अजून काही देशांमधील त्यांच्या हस्तकांना पाठवली.

विश्लेषण : तापमान वाढीमुळे कोणत्या पाच देशांचे भविष्य अंधःकारमय? उर्वरित जगासाठी कोणता इशारा?

अशा प्रकारे बनावट नावांनी बँक खाती उघडून त्यांची माहिती इतर देशांमधील हस्तकांना पाठवली जायची. या खात्यांचा वापर करून हा पैसा डॉलर्समध्ये बदलून पुढे हवालामार्गे इतर देशांमध्ये पाठवला जात होता.

फॉरेन एक्सचेंज कंपन्यांची मदत

हा पैसा डॉलर्समध्ये बदलण्यासाठी रंजन मनी कॉर्पोरेशन आणि केडीएस फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांकडे पैसा पाठवण्यात येत असे. गेल्या सात महिन्यांमध्ये रंजन मनी कॉर्पोरेशननं ४४१ कोटी रुपये तर केडीएक्स फॉरेक्सनं फक्त ३८ दिवसांत ४६२ कोटी रुपये डॉलर्समध्ये बदलल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी या कंपन्यांना ०.२ टक्के कमिशन देण्यात येत होतं.

आता पुढे काय?

या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांना विनंती करणार असल्याचं हैदराबाद पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या तपासानंतर कदाचित घोटाळ्याचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.