बांगलादेशातील हिंदूंवरील वाढत्या हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवणारे हिंदू पुजारी आणि इस्कॉन पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना ढाका येथे अटक करण्यात आली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना पदच्युत झाल्यापासून देशात अल्पसंख्याकांवर हल्ले होत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. ढाक्याच्या उत्तरेस सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या रंगपूर शहरात हिंदू समुदायाच्या नेतृत्वाखाली मजबूत कायदेशीर संरक्षण आणि अल्पसंख्यांकांना समर्पित मंत्रालयाच्या मागणीसाठी निदर्शने सुरू होती. त्या अंतर्गतच ही अटक करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. कोण आहेत चिन्मय कृष्णा दास? त्यांना अटक करण्याचे कारण काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ निदर्शने सुरू होती. आता चिन्मय कृष्णा दास यांच्या अटकेचा विरोध करत बांगलादेशमध्ये मोठ्या संख्येने हिंदू रस्त्यावर उतरले आहेत. “मला नुकतीच धक्कादायक बातमी मिळाली की, हिंदू साधू आणि बांगलादेशी अल्पसंख्याकांचा चेहरा असलेले चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना ढाका पोलिसांनी अटक केली आहे आणि अज्ञात ठिकाणी नेले आहे. या प्रकरणाकडे लक्ष द्या,” असे इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना टॅग करत पोस्ट लिहिली. बांगलादेशी अधिकाऱ्यांनी अधिकृत विधान जारी केले नसले तरी या आठवड्याच्या सुरुवातीला ब्रह्मचारी यांना ढाका विमानतळावर ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जाते. हिंदूंना लक्ष्य करणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात त्यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता, त्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

हेही वाचा : अंतराळातही कचऱ्याचे ढीग; कोण आहे जबाबदार?

अटकेवर इस्कॉनचा आक्षेप

बांगलादेशमध्ये हिंदू नेते चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना अटक केल्यानंतर सोमवारी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियंसने (इस्कॉन) तीव्र आक्षेप नोंदवला. या प्रकरणात भारत सरकारने हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही संघटनेने केली आहे. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये इस्कॉनने लिहिले की, “आम्हाला वेदनादायी वृत्त मिळाले आहे की, इस्कॉन बांगलादेशच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले चिन्मय कृष्णा दास यांना ढाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जगात कुठेही इस्कॉनचा दहशतवादाशी संबंध आहे, असा निराधार आरोप करणे निंदनीय आहे.” इस्कॉन इंकने भारत सरकारला या प्रकरणात त्वरित पावले उचलण्याची विनंती केली. “ISKCON, Inc. भारत सरकारला विनंती करते की, त्यांनी बांगलादेश सरकारशी बोलून त्वरित पावले उचलावीत,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

चिन्मय कृष्णा दास ब्रम्हचारी कोण आहेत?

चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी सुरुवातीला चंदनकुमार धर या नावाने ओळखले जात होते. चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना सोमवारी दुपारी ढाका विमानतळावरून अटक करण्यात आली, असे ‘एएनआय’ने वृत्त दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून, कृष्णा दास यांनी बांगलादेशमध्ये कथित सहभक्तांवरील अत्याचारचा निषेध करण्यासाठी अनेक रॅली काढल्या होत्या. ‘एएफपी’नुसार, कृष्णा दास प्रभू हे बांगलादेशातील प्रमुख हिंदू नेते आणि बांगलादेश संमिलितो सनातन जागरण जोते गटाचे सदस्य आहेत. कृष्णा दास प्रभू यांनी इस्कॉनचे प्रवक्ते म्हणूनही काम केले आहे. ते बांगलादेशातील हिंदू हक्कांसाठी कायम आपली भूमिका प्रखरतेने मांडत आले आहेत. देशातील लक्ष्यित द्वेषपूर्ण हल्ले आणि धार्मिक भेदभावावरही ते सातत्याने टीका करताना दिसतात. कृष्णा दास प्रभू यांच्यावर ऑक्टोबरमध्ये चितगाव शहरात रॅलीचे नेतृत्व केल्याबद्दलही खटला सुरू आहे. रॅलीदरम्यान त्यांच्यावर बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अनादर केल्याचा आरोप आहे. ढाका पोलिसांचे प्रवक्ते तालेबुर रहमान यांनी ‘एएफपी’ला त्यांच्या अटकेची माहिती दिली, परंतु आरोपांची माहिती दिली नाही.

बांगलादेशातील हिंदू

बांगलादेशच्या १७० दशलक्ष लोकसंख्येपैकी अंदाजे आठ टक्के हिंदू आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी झाल्यापासून मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील नवीन लष्करी-समर्थित अंतरिम सरकारला अल्पसंख्याकांवरील हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने सातत्याने टीकेचा सामना करावा लागला आहे. अलीकडच्या काही महिन्यांत, बांगलादेशात अशांतता वाढत आहे. हिंदू व्यवसाय, घरे आणि मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला चितगावमध्ये अल्पसंख्याक हक्क रॅलीमध्ये सहभागी झालेल्या १९ लोकांवर देशद्रोहाचे आरोप दाखल करण्यात आले होते.

भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी बांगलादेशातील युनूस सरकारवर टीका केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “प्रसिद्ध फायरब्रँड हिंदू नेते चिन्मय कृष्णा दास प्रभू यांचे बांगलादेशातील ढाका विमानतळावर गुप्तहेर शाखेने अपहरण केले आहे. ते बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या अस्तित्व आणि सन्मानाच्या लढ्याचे नेतृत्व करत आहेत. बांगलादेशी सनातनी समुदायाला भीती वाटते की, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील कट्टरपंथी सरकार कोणत्याही स्तरावर जाऊ शकते.

हेही वाचा : ‘Spy Balloon’म्हणजे नक्की काय? हेरगिरीसाठी त्याचा वापर कसा केला जातो? एका फुग्यामुळे चीन-तैवानमध्ये तणाव का वाढला?

एस. जयशंकरजी कृपया या प्रकरणाची दखल घेऊन तातडीची पावले उचलावीत,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. पोलिस गुप्तहेर शाखेचे प्रवक्ते रेझौल करीम यांनी सांगितले की, पोलिसांच्या विनंतीवरून चिन्मय दास यांना ताब्यात घेण्यात आले. चिन्मय दास यांना कायदेशीर प्रक्रियेसाठी संबंधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader