“Cinderella Complex” हा विषय सध्या नेटफ्लिक्सवरील काही चित्रपट आणि मालिका यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. सिंड्रेला सिंड्रोम किंवा सिंड्रेला कॉम्प्लेक्स ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. हा सिंड्रोम असणाऱ्या महिलांना स्वातंत्र्याची भीती वाटते तसेच इतर कोणीतरी त्यांची काळजी घ्यावी किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून विशेषत: पुरुष-जोडीदाराकडून काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा असते (प्रिय व्यक्तीकडून काळजी घेण्याची अपेक्षा, ही भावनिक गरज आहे. किंबहुना निरोगी नात्यासाठी ते गरजेचं आहे. परंतु सिंड्रेला सिंड्रोम ही मानसिक अवस्था जोडीदारावरील अवलंबित्त्व आणि स्वतंत्र होण्याची भीती दर्शवते. म्हणजेच प्रेम किंवा आदर यापेक्षा ती भीती आहे म्हणून त्या व्यक्तीवर अवलंबून राहणे घडते). ही संकल्पना कोलेट डोलिंग यांनी त्यांच्या The Cinderella Complex: Women’s Hidden Fear of Independence, १९८२ या पुस्तकात प्रथम मांडली होती.

सिंड्रेला सिंड्रोमचा नेमका अर्थ काय?

सिंड्रेला सिंड्रोमची पाळेमुळे मानवी समाजातील अनेक संस्कृतीत रूजलेली आहेत. जिथे मुलींना लहानपणापासूनच इतरांवर अवलंबून राहण्याचे संस्कार दिले जातात. यामुळे स्त्रिया स्वत:च्या पायावर उभ्या न राहता एखाद्या अशा रक्षकाच्या/ संरक्षकाच्या शोधात असतात; जो त्यांची काळजी घेईल, त्यांना सुरक्षित जीवन प्रदान करेल तसेच त्यांच्या समस्या सोडवेल. या मानसिकतेमुळे स्त्रियांमध्ये स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेबद्दल भीती निर्माण होते. सिंड्रेला सिंड्रोम हा शब्द ‘सिंड्रेला’ या परीकथेमधून घेतलेला आहे. या कथेत सिंड्रेला ही एका दीनवाण्या परिस्थितीत अडकलेली मुलगी असून, ती राजकुमाराच्या प्रतीक्षेत आहे. तो राजकुमार तिचे जीवन सुधारणार, याची ती वाट पाहत आहे. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ती स्वतः काहीही करत नाही. इतर कोणीतरी तिला मदत करेल, या अपेक्षेवर अवलंबून असते. याच परीकथेशी साधर्म्य असणारी मानसिकता काही महिलांमध्ये आढळते, ज्यामुळे त्या स्वातंत्र्याच्या केवळ विचारानेही घाबरतात आणि आर्थिक किंवा भावनिक सुरक्षिततेसाठी नेहमीच इतरांवर अवलंबून राहतात.

pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
savlyachi janu savali fame megha dhade gift to veena jagtap
Video: ‘सावळ्याची जणू सावली’मधील वीणा जगतापला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने दिलं सुंदर गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझी मोठी समस्या…”
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

अधिक वाचा: Bigg Boss 18: भारतात गाढव पाळणे हा गुन्हा आहे का?

सिंड्रेला सिंड्रोमची लक्षणे

सिंड्रेला सिंड्रोमची काही प्रमुख लक्षणे आहेत. ही लक्षणे स्त्रियांमध्ये विविध प्रकारे आढळून येतात.

१. निर्णय घेताना अवलंबित्व: सिंड्रेला सिंड्रोम असलेल्या व्यक्तींना महत्त्वाच्या प्रसंगी स्वत: निर्णय घेण्याची भीती वाटते. किंबहुना त्यांना नेहमीच दुसऱ्या व्यक्तीकडून मार्गदर्शन किंवा इतरांनी त्यांच्यासाठी निर्णय द्यावा असे वाटते.

२. स्वातंत्र्याची भीती: या सिंड्रोमचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्याची वाटणारी भीती. अनेकदा महिलांना एकट्याने जीवन जगणे, आर्थिक निर्णय घेणे किंवा रोजच्या समस्यांचे निराकरण करणे कठीण वाटते, कारण त्यांना इतरांवर अवलंबून राहण्याची सवय झालेली असते.

३. पारंपरिक स्त्री-पुरुष भूमिका स्वीकारणे: सिंड्रेला सिंड्रोमची लक्षणे असणाऱ्या महिलांना पारंपरिक स्त्री-पुरुष भूमिका स्वीकारण्यात आनंद वाटतो. उदाहरणार्थ, गृहिणी म्हणून काम करणे यात काहीच वाईट नाही. किंबहुना घराचा डोलारा हा त्या गृहिणीच्याच खांद्यावर असतो. परंतु स्वतंत्र होऊन काहीतरी करण्याची भीती वाटते म्हणून गृहिणी म्हणून काम करणे हे सिंड्रेला सिंड्रोम या मानसिक अवस्थेचे लक्षण आहे. यात स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचे टाळतात. या परिस्थितीत त्या नेहमीच इतरांवर अवलंबून राहण्यास प्राधान्य देतात.

४. सदोष नातेसंबंधांमध्ये अडकून राहणे: अशा स्त्रिया बहुतेकदा निरोगी नसलेल्या, तणावग्रस्त नात्यांमध्ये अडकून राहतात. त्या स्वयंपूर्ण होऊ शकत नाहीत, अशीच त्यांची स्वतःची भावना असते.

५. भावनिक अवलंबित्व: सिंड्रेला सिंड्रोम असलेल्या महिलांना अनेकदा वाटते की, त्यांच्या जीवनातील आनंद हा इतर व्यक्तींवर अवलंबून आहे, विशेषतः त्यांच्या जोडीदारावर. अशा परिस्थितीत त्या स्वतःच्या भावनिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत नाहीत.

सिंड्रेला सिंड्रोमची कारणे

सिंड्रेला सिंड्रोमचे मूळ आपल्या समाजातील लैंगिक भूमिकांच्या रूढींमध्ये खोलवर रुजलेलं आहे. लहान वयातच मुलींना असे संस्कार आणि सामाजिक मूल्ये शिकवली जातात, ज्यातून त्यांच्यात पुरुषी संरक्षणाची अपेक्षा निर्माण होते. त्यामुळेच त्या इतरांवर अवलंबून राहण्याची मानसिकता अंगीकारतात. ज्या कुटुंबांमध्ये स्त्रीची किंवा पुरुषाची भूमिका काय असणार आहे, हे ठरवून दिलेले असते अशा कुटुंबातील स्त्रियांना आर्थिक, भावनिक किंवा सामाजिक दृष्ट्या स्वतंत्र होण्याची संधी मिळत नाही.

सिंड्रेला सिंड्रोम दूर करता येतो का?

सिंड्रेला सिंड्रोम असलेल्या व्यक्तींसाठी स्वावलंबनाची भीती ही मोठी समस्या असू शकते. परंतु ती समस्या सोडवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे या परिस्थितीचे अस्तित्त्व स्वीकारणे हा होय. आपल्याला हे लक्षात येणे आवश्यक आहे की, स्वतःच्या निर्णयक्षमतेवर आपण अवलंबून राहू शकतो आणि स्वातंत्र्याचे मूल्य ओळखू शकतो. मनोविकारतज्ज्ञ किंवा सल्लागारांच्या मदतीने हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. मानसोपचार, विशेषतः संज्ञानात्मक-व्यवहारवादी थेरपी (CBT), व्यक्तींना त्यांच्या भीती आणि अवलंबित्वाच्या कारणांचा शोध घेण्यास मदत करू शकते. या प्रक्रियेमध्ये, व्यक्तींना स्वावलंबनाचे महत्त्व शिकवले जाते आणि त्यांना निर्णयक्षमता, आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास विकसित करण्यात मदत केली जाते. स्व-चिंतन आणि स्व-साक्षात्कार हे देखील या प्रक्रियेत महत्त्वाचे आहेत. व्यक्तींनी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे आणि आपले व्यक्तिमत्व कसे विकसित करायचे आहे याचा विचार करून आपली उद्दिष्ट्ये निश्चित करणे आवश्यक आहे. आत्मसन्मान विकसित करणे आणि आनंदाचा स्रोत स्वतःमध्ये शोधणे हे देखील महत्त्वाचे आहे.

अधिक वाचा: World Cotton Day 2024: भारतीय वस्त्रोद्योगाला ब्रिटिशांनी लावला सुरुंग; नेमके काय घडले?

सिंड्रेला सिंड्रोम ही केवळ एक परीकथेमधली संकल्पना नाही, तर वास्तविक जगात अनेक स्त्रियांमध्ये दिसणारी समस्या आहे. स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता यांच्या भयामुळे अनेक स्त्रिया पारंपरिक भूमिकांमध्ये अडकून राहतात. त्यामुळे त्यांचे भावनिक आणि आर्थिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. मात्र योग्य मार्गदर्शन आणि आत्मचिंतनाच्या माध्यमातून हा सिंड्रोम दूर करता येतो. ज्यामुळे व्यक्ती आपल्या आयुष्यात अधिक स्वावलंबी आणि आनंदी होऊ शकते.