चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे निष्ठावंत आणि जवळचे सहकारी ली किंयाग यांची चीनचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ली किंयाग ली कियांग हे कम्युनिष्ट पार्टी शांघायचे माजी अध्यक्ष आहेत. चीनमध्ये पंतप्रधान हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्चपद आहे. याच पार्श्वभूमीवर कियांग नेमके कोण आहेत? आगामी काळात त्यांच्यासोर कोणती आव्हानं असणार हे जाणून घेऊ या.

व्यवहारिक आणि उद्योगस्नेही राजकारणी

काही दिवसांपूर्वीच क्षी जिनपिंग यांची पुन्हा एकदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली. राजकारणातील स्थान अढळ राहावे म्हणून ते आपल्या निष्ठावंतांना महत्त्वाची पदं देत आहेत. ली कियांग हे क्षी जिनपिंग यांचे निष्ठावंत नेते मानले जातात. हाच हेतू समोर ठेवून ली कियांग यांना पंतप्रधानपदाची संधी देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याआधी ले केकियांग यांच्याकडे २०१३ सालापासून पंतप्रधानपद होते. मात्र कियांग यांना संधी देण्यासाठी जिनपिंग यांनी केकियांग यांच्याकडील अधिकार हळूहळू काढून घेण्यास सुरुवात केली होती. ली कियांग हे एक व्यवहारी आणि उद्योगस्नेही राजकारणी म्हणून ओळखले जातात. मागील दोन वर्षांत करोना महासाथीमुळे चीनची दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाची सूत्रं हाती आल्यानंतर चीनला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान कियांग यांच्यासमोर असेल.

Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Strained US China Relations news in marathi
चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार?
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
US China Relations , US China, Xi Jinping ,
चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
from former Chief Minister Prithviraj Chavan Question over responsible for the extortion cases in the state
राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा

हेही वाचा >>> विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिडस् चा भारताशी काही संबंध आहे का?

ली कियांग यांची राजकीय कारकीर्द

ली कियांग यांनी वयाच्या २४ व्या वर्षी १९८३ साली कम्यूनिष्ट पक्षात प्रवेश केला होता. वयाच्या ४३ व्या वर्षी पक्षाने त्यांच्यावर व्हेंझोऊ शहर सचिवपदाची जबाबदारी सोपवली. २००४ साली ते पक्षाच्या झेजियांग प्रांत समितीचे सरचिटणीस झाले. याच वर्षी क्षी जिनपिंग झेजियांग प्रांताचे सचिव असताना कियांग यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली.

झेजियांग प्रांताच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी

२०१३ साली ली कियांग यांच्याकडे झेजियांग प्रांताच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी आली होती. या पदावर ते २०१६ पर्यंत होते. आपल्या या कार्यकाळात त्यांनी अनेक लोकप्रिय निर्णय घेतले. या निर्णयामुळे कियांग यांना उद्योगस्नेही नेता म्हणून ओळख मिळाली. याच काळात त्यांनी व्यवसाय, उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी अनुकूल वातावरण, सोईसुविधा असणारी छोटी शहरं वसवण्याची मोहीम हाती घेतली. या कामाची दखल पुढे क्षी जिनपिंग यांनीदेखील घेतली होती.

हेही वाचा >>> विश्लेषण : नील अर्थव्यवस्था म्हणजे काय?

२०१६ साली जियांगसू प्रांताच्या सचिपवदाची जबाबदारी

पुढे पक्षातर्फे शांघाय शहराचे सचिवपद मिळण्याआधी त्यांनी २०१६ साली जियांगसू प्रांताच्या सचिपवदाची जबाबदारी सांभाळली. याच वर्षी सीसीबी पॉलिटब्यूरोचे सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती ली कियांग यांना राष्ट्रीय राजकारणात येण्यासाठीचे प्रवेशद्वार ठरले.

ली कियांग यांच्यावर कधी टीका तर कधी समर्थन

शांघायचे प्रभारी असताना त्यांनी येथे उद्योगांची भरभराट होण्यासाठी प्रयत्न केले. उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी येथे वेगवेगळ्या योजना राबवल्या. त्यांच्या कार्यकाळात येथे टेस्लाने मोठी गिगाफॅक्टरी उभारली. परिणामी येथे मोठी रोजगारनिर्मिती झाली. २०१९ साली ली यांनी शांघाय स्टॉक एक्सेचंज स्टार मार्केटची स्थापना केली. चीनमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना भांडवली बाजारात स्थान मिळावे, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. पुढे करोना महासाथीमुळे तसेच चीनच्या झिरो कोविड पॉलिसीमुळे शांघायचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. करोनाकाळात घेतलेल्या काही निर्णयामुळे तसेच करोनाला हाताळण्याच्या पद्धतीमुळे ली यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली.

हेही वाचा >>> विश्लेषण : संयुक्त राष्ट्रांच्या सागरी कराराचे महत्त्व काय? काही देशांचा कराराला विरोध कशासाठी?

ली यांच्यापुढील आव्हाने

ली यांच्याकडे आता चीनच्य पंतप्रधानपदाची जबाबदारी आलेली आहे. ली एक व्यवहारिक राजकारणी असल्याचे म्हटले जाते. तसेच नोकरशाहीशी चांगले संबंध ठेवून कामे करून घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. ते खासगी क्षेत्रांना पाठिंबा देणारे नेते आहेत. असे असले तरी त्यांच्यासमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. मागील तीन वर्षांत चीनी अर्थव्यवस्थेने चांगल्याच गटांगळ्या खाल्लेल्या आहेत. चीनने २०२३ या वर्षासाठी ५ टक्के आर्थिक वृद्धीदराचे उद्दीष्ट समोर ठेवलेले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी ली कियांग यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. उद्योजक, व्यावसायिक यांच्यामध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. चीनची मागील दोन वर्षे करोना महासाथीला रोखण्यातच गेली. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा झळाळी मिळवून देण्याचे त्यांच्यासमोर लक्ष असेल.

Story img Loader