तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाकडून टीआरएस अर्थात तेलंगाणा राष्ट्र समितीच्या (आता- भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस) आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आमदारांना फोडून तेलंगाणामधील सरकार पाडण्याचा कट लचला जात आहे, असा आरोप चंद्रशेखर राव यांनी केला आहे. तर भाजपाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव यांनी केलेले आरोप काय आहेत? त्या आरोपांवर भाजपाचे मत काय आहे? याबद्दल जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीआरएसच्या आमदारांचा आरोप काय?

मागील महिन्यात २६ ऑक्टोबर रोजी तेलंगाणामधील सायबराबाद पोलिसांनी हैदराबाद शहराच्या बाहेर असलेल्या मोनीबादमधील एका फार्महाऊसवर छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांनी तिघांना पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून टीआरएसच्या आमदारांना लाच दिली जात होती. लाच देऊन टीआरएसच्या आमदारांनी भाजपात प्रवेश करावा, अशी गळ घालण्यात येत होती, असा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच, तंदूरचे टीआरएसचे आमदार रोहिथ रेड्डी यांनी याबाबतची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती. भाजपाशी संबंध असलेले तीन लोक मला भेटण्यासाठी येत आहेत. भाजपामध्ये प्रवेश केला तर, १०० कोटी रुपये देऊ, अशी लाच मला देत आहेत, असे आम्हाला रेड्डी यांनी सांगितले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने बंद पडण्यामागचं कारण काय?

अटक करण्यात आलेले तीन आरोपी मोईनाबाद येथील फार्महाईऊसवर आले होते. त्यानंतर फार्महाऊसवर असलेल्या टीआरएसच्या आमदारांशी त्यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर तेथील आमदारांनी पोलिसांना छापा टाकण्याचा इशारा दिला. आम्ही फार्महाऊसवर छापेमारी करणार आहोत, याची माहिती अगोदरच कोणीतरी माध्यमांना दिली होती, असेही छापेमारी करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.

माध्यमांकडे असलेल्या व्हिडीओमध्ये काय आहे?

फार्महाऊसवर कारवाई होण्याअगोदर काही माध्यमांनी फार्महाऊसमध्ये घडणाऱ्या घडामोडींचे चित्रण केले. यामध्ये एका टेबलवर अटक करण्यात आलेले तीन आरोपी दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सोफ्यावर टीआरएसचे आमदार दिसत आहेत. पोलिसांनी केलेली छापेमारी तेथील काही स्थानिक माध्यमांनी कॅमेऱ्यात कैद केली आहे. पोलिसांच्या छापेमारीनंतर आमदार रोहिथ रेड्डी यांनी अटक करण्यात आलेल्या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. अटक केलेल्या तिघांनी आमदारांना भाजपात जाण्यासाठी आमिष दाखवले. तसेच भाजपात प्रवेश केला नाही, तर त्यांच्याविरोधात खटले उभारले जातील. तसेच सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई केली जाईल, अशी धमकी दिली, असा दावा या तक्रारीत करण्यात आलेला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : एलॉन मस्क यांनी खरेदी केल्यानंतर ट्विटर आता खासगी कंपनी, नेमके काय बदल होणार?

अटक करण्यात आलेले तीन आरोप कोण?

पोलिसांनी आपल्या छापेमारीत रामचंद्र भारती उर्फ सतीश शर्मा, (सेक्टर २१ फरिदाबाद, हरियाणा) कोरे नंदू कुमार, (हैदराबातमधील उद्योगक) डी सिंहायजी (पुजारी, तिरुपती, आंध्र प्रदेश) या तीन आरोपींना अटक केलेले आहे. नंदू कुमार हा रोहिथ रेड्डी यांच्या तंदूर यांच्या मतदारसंघातील विकराबाद जिल्ह्यातील परगी येतील रहिवाशी आहे. सिंहायजी हे आरोपी २०१९ पर्यंत आंध्र प्रदेशमधील अनामया जिल्ह्यातील चिन्नामांडेम येथील रामनाथा गावातील श्री मंत्रजा पीठाचे मुख्य पुजारी होते. ते बंगळुरू येथील ‘इस्ताह’ या संस्थेचे सदस्यही आहेत. या संस्थेमार्फत ग्रामीण भगात विशेषत: शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम केले जाते. तशी माहिती या संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या या तिन्ही आरोपींना पोलिसांनी भाजपा कार्यकर्ते असल्याचे म्हटले आहे. न्यायालयात सादर केलेल्या सर्व कागदपत्रांवर पोलिसांनी तसेच लिहिलेले आहे. तर या आरोपींनी आमचा भाजपाशी कसलाही संबंध नाही, असा दावा केला आहे. तसेच भाजपानेदेखील अटक करण्यात आलेले आरोपी हे भाजपाचे सदस्य नाहीत, असे सांगितले असून तेलंगाणा उच्च न्यायालयात अर्ज करून या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत केली जावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ५ जी लॉंन्च झाले मात्र अद्याप सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचली नाही, कारण काय?

टीआरएसचे ४ आमदार कोण, ज्यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला?

पी रोहिथ रड्डी, (तंदूर मतदारसंघ) रेगा कांथा राव, (अचामपेट) बी हर्षवर्धन रेड्डी, (कोल्लापूर) गुव्वाला बालाराजू (अचमपेट) या चार आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा दावा टीआरएसने केला आहे. रेगा कांथा राव आणि बी हर्षवर्धन रेड्डी हे २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र नंतर ९ आमदारांसोबत त्यांनी टीआरएसमध्ये प्रवेश केला.

आरोपींना अटक केल्यानंतर पुढे काय झालं?

सायबराबाद पोलिसांनी आरोपींना २७ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत विभागाच्या विशेष न्यायालयासमोर हजर केले होते. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने पोलीस या आरोपासंदर्भात ठोस पुरावे सादर करू शकलेले नाहीत, असे सांगत आरोपींना सोडण्याचे आदेश दिले. तसेच पोलिसांची याचिका फेटाळून लावली. आरोपींना हैदराबाद शहर सोडण्यास न्यायालयाने मनाई केली होती. तर जेव्हा गजर भासेल तेव्हा चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहवे, अशी नोटीस पोलिसांनी आरोपींना दिली होती. या आरोपासंदर्भात पोलीस पुरावा म्हणून रोख रक्कम दाखवू शकलेले नाहीत, असेदेखील न्यायालयाने नमूद केले होते.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘वन नेशन, वन आयटीआर फॉर्म’ काय आहे? करदात्यांना याचा कसा फायदा होणार?

पुढे सायबराबाद पोलिसांनी एसीबीच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यालयाने एसीबीच्या आदेशाला रद्दबातल ठरवत पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी पुरेसे पुरावे सादर केले आहेत, म्हणत आरोपींनी २४ तासांच्या आत आत्मसमर्पण करावे, असा आदेश दिला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आमदारांना लाच दिल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना पुन्हा अटक केली. आता या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

तेलंगाणाच्या राजकारणाची स्थिती काय?

दरम्यान, तेलंगाणामध्ये मुनूगोडी विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना टीआरस टीआरएसच्या आमदारांना लाच दिल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर टीआरएसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. भाजपातर्फे आमचे सरकार उलथवून लावण्याचा प्रयत्न केला गेला. आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप चंद्रशेखर राव यांनी केला.

हेही वाचा >>> विश्लेषण: भारतालाही मिळणार क्षेपणास्त्र कवच? बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली चाचणीचे महत्त्व किती?

विशेष म्हणजे आमदार खरेदीचे हे कथित प्रकरण समोर आल्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ दाखवले. या व्हिडीओमध्ये अटक करण्यात आलेले आरोपी, आमदारांना लाच देत आहेत, असा दावा करण्यात आला आहे. तर भाजपाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुनूगोडी येथे पराभव होणार आहे, हे समजल्यामुळे टीआरएसने हे षड्यंत्र रचल्याचा दावा भाजपाने केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm k chandrasekhar rao alleges bjp poaching trs mla trying to topple government know in detail prd