गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती शिवसेनेतील भूकंपानंतर स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची. पण त्याच वेळी बिहारमध्ये तशाच प्रकारचा राजकीय भूकंप झाला तो राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या रुपात. नितीश कुमार यांनी आपल्या धक्कातंत्र राजकारणाचा कित्ता गिरवत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राजीनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली. अवघ्या २४ तासांत त्यांनी सत्तेतील मित्रपक्ष बदलला आणि भाजपा ते राजद प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. मात्र, या प्रवासात देखील सत्तेच्या चाव्या आपल्याच हाती राखण्यात ते यशस्वी ठरले. नव्हे, त्या आपल्याच हाती राहतील याच हिशोबाने त्यांनी आपले डावपेच आखले आणि ते अंमलात आणले! पण नितीश कुमार यांनी नेमकं कुणाच्या भरवशावर थेट मुख्यमंत्रीपद पणाला लावलं? बिहारमधील राजकीय समीकरण पाहाता इथले तीन समाजघटक यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरल्याचं पाहायला मिळतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा