देशातील सैन्याच्या युनिफॉर्ममध्ये येत्या १ ऑगस्टपासून मोठा बदल होणार आहे. ब्रिगेडियरपासून वरच्या पदावर असलेल्या सर्वच अधिकाऱ्यांना सारखाच युनिफॉर्म (गणवेश) असणार आहे. म्हणजेच एखादा अधिकारी कोणत्या रेजिमेंटचा आहे याचा विचार न करता ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, जनरल अशा सर्वच अधिकाऱ्यांना सारखा युनिफॉर्म असणार आहे. याच पार्श्वभूमीवर नव्या निर्णयानुसार भारतीय सैन्यदलात कोणते बदल होणार? हे जाणून घेऊ या…

लष्करासंबंधीचा नवा निर्णय नेमका काय आहे?

लष्करातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे एक संमेलन पार पडले. या संमेलनात सखोल चर्चा झाल्यानंतर ब्रिगेडियरपासून वरच्या अधिकाऱ्यांचा युनिफॉर्म सारखाच असेल, असा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, जनरल अशा अधिकाऱ्यांचा युनिफॉर्म एकसारखाच असेल. म्हणजेच यापुढे वेगवेगळी श्रेणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बेरेट्स (टोप्या) सारख्याच रंगाच्या असतील. तसेच बॅजेस, बेल्ट बकल्स, बूट असे सर्वकाही सारखेच असणार आहे. यापुढे ब्रिगेडियर तसेच त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी त्यांची विशेष ओळख दाखवणारे रेजिमेंटल लॅनियार्ड्स आपल्या खांद्याला लावणार नाहीत. तसेच अधिकारी आपल्या युनिफॉर्मवर ‘स्पेशल फोर्स’, ‘अरुणाचल स्काउट्स’, ‘डोग्रा स्काउट्स’ असा रेजिमेंटचा, पथकाचा उल्लेख असणारे शोल्डर फ्लॅशेसही लावणार नाहीत. रेजिमेंटचा उल्लेख असणारे कोणतेही निशाण अथवा चिन्ह अधिकाऱ्यांच्या युनिफॉर्मवर नसेल. म्हणजेच ब्रिगेडियर पदापासूनचे सर्वच अधिकारी सारखाच दिसणारा युनिफॉर्म परिधान करतील.

Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ex-servicemen , nation building, Army Chief ,
माजी सैनिकांचा राष्ट्रनिर्मितीमध्ये सहभाग शक्य; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे मत
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
Pimpri chinchwad Municipal corporation employees son becomes lieutenant at age 22
पिंपरी : महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा बनला लष्करी अधिकारी, सर्व स्तरातून कौतुक
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”

हेही वाचा >> ईडी संचालकपदाचा कार्यकाळ ठरतोय चर्चेचा विषय, प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात; नेमका आक्षेप काय?

सध्या सैन्यात युनिफॉर्मचे काय नियम आहेत?

सैन्यातील सध्याच्या नियमानुसार लेफ्टनंटपासून ते जनरल पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा युनिफॉर्म वेगळा असतो. हे अधिकारी आपली तुकडी, लष्करातील श्रेणी तसेच सैन्यातील कामगिरीचा उल्लेख करणारे वेगवेगळे बॅजेस आपल्या युनिफॉर्मवर लावतात. यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याची वेगळी ओळख निर्माण होते. इन्फंट्री अधिकारी, मिलिटरी इंटेलिजन्स अधिकाऱ्यांच्या डोक्यावर हिरव्या रंगाची टोपी असते. आर्मड् कॉर्प्स अधिकारी डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घालतात. तोफखाना, अभियंता, सिग्नल्स, एअर डिफेन्स, ईएमई, एएससी, एओसी, एएमसी तसेच काही कॉर्प्स अधिकाऱ्यांच्या डोक्यावर युनिफॉर्मसोबत निळ्या रंगाची टोपी असते.

लष्करात वेगवेगळ्या समारंभांदरम्यान वापरल्या जाणाऱ्या टोप्यादेखील वेगळ्या असतात. बहुतांश इन्फंट्री रेजिमेंट, आर्मड् कॉर्प्स रेजिमेंट तसेच सैन्यात इतर सेवांमधील रेजिमेंट्सच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर वेगवेगळ्या टोप्या असतात. गोरखा रायफल्स, कुमाऊं रेजिमेंट, गढवाल रेजिमेंट आणि नागा रेजिमेंटमधील अधिकाऱ्यांच्या डोक्यावर विशिष्ट टोपी असते. या टोपीला स्लोच टोपी, तेराई हॅट, गोरखा हॅट असेदेखील म्हणतात.

हेही वाचा >> विश्लेषण : केरळ बोट दुर्घटनेमागे काय कारण? पर्यटनस्नेही प्रतिमेचे किती नुकसान?

प्रत्येक रेजिमेंटचा वेगळा गणवेश

प्रत्येक इन्फंट्री रेजिमेंट आणि कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांना स्वत:च्या तुकडीची एक लॅनियार्ड (खाद्याजवळ असणारी जाड दोरी) असते. ही लॅनियार्ड खांद्याभोवती असते. लॅनियार्डची एक बाजू डाव्या किंवा उजव्या खिशाजवळ बांधलेली असते. प्रत्येक श्रेणीच्या अधिकाऱ्याला वेगवेगळे बॅजेस दिलेले असतात. रायफल रेजिमेंटमध्ये गणवेशावर अधिकाऱ्याची श्रेणी सूचित करणारे काळ्या रंगाचे बॅज असतात. काही रेजिमेंटमध्ये सोनेरी किंवा चांदीच्या रंगाचे बॅजेस असतात. प्रत्येक तुकडीतील परंपरेनुसार अधिकाऱ्यांच्या युनिफॉर्मची बटणेही वेगळी असतात. रायफल रेजिमेंटमधील अधिकाऱ्यांच्या युनिफॉर्मवर काळ्या रंगाची बटणे असतात. तर ब्रिगेड ऑफ गार्ड्सच्या तुकडीतील अधिकाऱ्यांच्या युनिफॉर्मवर सोनेरी रंगाची बटणे असतात. तुकडीतील परंपरेनुसार अधिकाऱ्यांच्या बेल्टची बकल्सही वेगवेगळी असतात.

सर्व अधिकाऱ्यांना एकच युनिफॉर्म ठरवण्याचे कारण काय?

सैन्यातील रेजिमेंटल सेवा कर्नल पदावर आल्यानंतर संपुष्टात येते. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याच्या युनिफॉर्मवर त्याच्या रेजिमेंटचा उल्लेख असलेला लोगो कायम ठेवण्यात काहीही अर्थ नाही. वरिष्ठ श्रेणीवरील अधिकाऱ्याला वेगवेगळ्या रेजिमेंट्सना सूचना द्याव्या लागतात. त्यामुळे संबंधित अधिकारी हा तटस्थ असणे गरजेचे आहे. याच कारणामुळे कोणत्याही रेजिमेंटचा उल्लेख असणारे चिन्ह हटवण्याचा तसेच सारख्याच युनिफॉर्मचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा >> इम्रान खान यांच्यावर कोर्टाबाहेर अटकेची कारवाई, भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अल-कादिर ट्रस्ट प्रकरण’ नेमके काय आहे? जाणून घ्या…

अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे का?

युनिफॉर्मच्या बाबतीत अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आलेला नाही. याआधी ४० वर्षांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या युनिफॉर्मध्ये अशीच पद्धत पाळली जायची. अगोदर १९८० च्या मध्यापर्यंत लेफ्टनंट कर्नल या पदापर्यंत रेजिमेंटल सेवा असायची. त्यानंतर कर्नल पदापासून पुढच्या अधिकाऱ्यांचे युनिफॉर्म सारखेच असायचे. कर्नल आणि ब्रिगेडियर पदावरच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या रेजिमेंटचा उल्लेख असणारे बॅजेस लावणे बंद केले. त्याऐवजी ते राष्ट्रीय चिन्ह असलेली टोपी घालायचे. मात्र १९८० च्या मध्यानंतर रेजिमेंट्सची कमांड कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली. त्यामुळे कर्नल पुन्हा एकदा आपल्या रेजिमेंटचा उल्लेख असणारे बॅजेस आपल्या गणवेशावर लावू लागले.

अन्य देशांच्या सैन्यामध्ये गणवेशाची काय परंपरा आहे?

ब्रिटिश सैन्यामध्ये कर्नल तसेच कर्नल पदापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या युनिफॉर्मला स्टाफ युनिफॉर्म म्हटले जाते. एखाद्या विशिष्ट रेजिमेंटचा युनिफॉर्म या अधिकाऱ्यांपेक्षा वेगळा असावा यासाठी या युनिफॉर्मला असे नाव देण्यात आलेले आहे. ब्रिटश लष्करातील नियमानुसार रेजिमेंटच्या युनिफॉर्ममधील टोपी स्टाफ युनिफॉर्मसोबत घालण्यास बंदी आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांतही ब्रिटनसारखेच नियम आहेत. या देशांत लेफ्टनंट कर्नल तसेच वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना रेजिमेंटचा युनिफॉर्म नसतो. ब्रिगेडियर तसेच वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांचा येथे जवळजवळ सारखाच युनिफॉर्म असतो.

Story img Loader