संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सध्या कृष्णवर्णीय नागरिकांना भरपाई देण्याचा मुद्दा तापला आहे. शहर प्रशासनाने कृष्णवर्णीय नागरिकांना भरपाई देण्याच्या योजनेला पाठिंबा दिला आहे. मात्र प्रत्येक पात्र व्यक्तीस ५० लाख डॉलर एकरकमी देय द्यावे की सल्लागार समितीने केलेल्या १०० पेक्षा अधिक शिफारशी मान्य कराव्यात याबाबत प्रशासन सदस्यांमध्ये मतभेद आहेत. कृष्णवर्णीयांच्या भरपाईचा मुद्दा नेमका काय आहे, त्याबद्दल…

कृष्णवर्णीयांच्या भरपाईच्या योजनेचे कारण काय?

कृष्णवर्णीयांना भरपाई निधी देण्याची संकल्पना नवीन नाही. यापूर्वीही याबाबत अनेकदा चर्चा झाल्या आणि अनेक योजना तयार करण्यात आल्या. मात्र त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. नवीन मुक्त झालेल्या गुलामांना ४० एकर जमीन आणि एक खेचर देण्याचे तत्कालीन सरकारचे आश्वासन कधीच साकार झाले नाही. २०२०मध्ये जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर भरपाईच्या हालचालींना देशभरात वेग आला. कॅलिफोर्निया राज्य आणि बोस्टन व सॅन फ्रान्सिस्को या शहरांमध्ये कृष्णवर्णीयांची संख्या अधिक असून तिथे अजूनही वर्णद्वेष चालतो. अनेक दशके वर्णद्वेषी धोरणे आणि कायदे यामुळे कृष्णवर्णी अमेरिकी नागरिकांना मालमत्ता, शिक्षण आणि संपत्तीनिर्मिती संसाधने यांमध्ये पद्धतशीरपणे प्रवेश नाकारला गेला आहे. त्यामुळे त्यांना भरपाई म्हणून विशिष्ट निधी मिळावा अशी मागणी जोर धरत आहे.

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये नुकसान भरपाईसाठी युक्तिवाद काय आहे?

१९४० च्या दशकात जलवाहतूक आणि जहाजबांधणीच्या कामांमुळे सॅन फ्रान्सिस्को शहरात कृष्णवर्णीयांचे स्थलांतर वाढले, मात्र वांशिकदृष्ट्या प्रतिबंधात्मक करार आणि ते ज्या परिसरात राहातात, तिथे सुविधांची मर्यादा यामुळे कृष्णवर्णीयांचे खूप हाल झाले. जेव्हा कृष्णवर्णीय रहिवाशांनी फिलमोरमध्ये एक समृद्ध परिसर तयार करू शकले, त्या वेळी म्हणजेच १९६० च्या दशकात सरकारी पुनर्विकास योजना लागू करण्यात आली. या योजनेमुळे कृष्णवर्णीयांची मालमत्ता काढून घेण्यात आली आणि त्यांच्या मालकीचे व्यवसाय नष्ट करण्यात आले, असा दावा भरपाईसाठी युक्तिवाद करताना कृष्णवर्णीय नागरिकांच्या बाजूने असणाऱ्या वकिलाने केला. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सध्या ६ टक्क्यांहून कमी रहिवासी कृष्णवर्णीय असूनही शहरातील बेघर लोकसंख्येपैकी त्यांची संख्या ४० टक्के आहे. कृष्णवर्णीयांना भरपाई मिळावी यांस अमेरिकेतील ‘एनएएसीपी’ या मानवी हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेनेही समर्थन दिले आहे. मात्र कृष्णवर्णीयांच्या संघटनांनी एकरकमी ५० लाख डॉलरचा निधी नाकारला पाहिजे, त्याऐवजी शिक्षण, रोजगार, गृहनिर्माण, आरोग्य सेवा आणि सांस्कृतिक केंद्रांद्वारे भरपाईवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ‘एनएएसीपी’ संघटनेचे म्हणणे आहे.

भरपाईविरोधात युक्तिवाद काय आहे?

कृष्णवर्णीयांना भरपाई मिळण्यास काही जणांनी विरोध केला आहे. या टीकाकारांचे म्हणणे आहे की, कॅलिफोर्निया आणि सॅन फ्रान्सिस्कोने कधीही गुलामगिरीचे समर्थन केलेले नाही. गुलाम राखणारा किंवा गुलाम असणारा कोणीही सध्या जिवंत नाही. मात्र कृष्णवर्णी, स्थलांतरित किंवा संरचनात्मक वर्णद्वेषाचे शिकार झाले आहेत, त्यांना भरपाई देण्यासाठी महापालिका करदात्यांच्या पैशाचा वापर करणे योग्य नाही. सरकारी धोरणांतून त्यांच्यासाठी खर्च करणे हे भेदभावपूर्ण असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठातील हूवर संस्था जी पुराणमतवादी मानली जाते, त्यांच्या म्हणण्यानुसार, सॅन फ्रान्सिस्कोमधील प्रत्येक कृष्णवर्णी नसलेल्या कुटुंबाला भरपाईच्या महागड्या शिफारशींसाठी किमान ६,००,००० डॉलर कररूपाने खर्च करावा लागेल. हे शक्य होणार नाही.

भरपाईला समर्थन आणि विरोध किती?

‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने याबाबत २०२२मध्ये सर्वेक्षण केले. अमेरिकेतील ६८ टक्के प्रतिसादकर्त्यांनी भरपाईला विरोध केला आहे तर ३० टक्के प्रतिसादकर्त्यांनी भरपाईचे समर्थन केले आहे. सर्वेक्षणात जवळपास ८० टक्के कृष्णवर्णीयांनी भरपाईचे समर्थन केले. रिपब्लिकन पक्षाचे समर्थक असणाऱ्या ९० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी भरपाईला विरोध केला, तर डेमोक्रेटिक पक्षाचे समर्थक मात्र विभागले गेले असून काही जणांनी भरपाईच्या विरोधातही मत नोंदविले.

सॅन फ्रान्सिस्को प्रशासन यासाठी निधी कसा देणार?

याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नाही. ज्या सल्लागार समितीने भरपाईसंदर्भात शिफारशी केल्या आहेत, त्यांचे म्हणणे आहे की, सॅन फ्रान्सिस्को प्रशासनाने याबाबत वित्तपुरवठा कसा करायचा हे सांगणे आपले काम नाही. हे स्थानिक राजकारण्यांवर अवलंबून असते. त्यापैकी दोन राजकीय व्यक्तींनी हा मुद्दा मतदारांपर्यंत नेण्यात रस व्यक्त केला. सॅन फ्रान्सिस्कोचे प्रशासन प्रमुख मॅट डोर्सी यांनी सांगितले की, अर्थसंकल्पाचा भाग म्हणून सॅन फ्रान्सिस्को कौन्सिलमध्ये भरपाई निश्चित करण्यासाठी ते मतविभागणीचे समर्थन करतील. प्रशासनातील अन्य काही सदस्यांनीही भरपाईच्या योजनेला पाठिंबा दिला आहे.

भरपाईच्या काही शिफारशी काय आहेत?

भरपाईसाठी नेमलेल्या सल्लागार समितीने शिक्षण, आरोग्य, राेजगार यांसह अनेक बाबींसंदर्भात शिफारशी सुचविल्या आहेत. शिक्षणातील शिफारशींमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आफ्रोकेंद्री शाळा स्थापन करणे, जेणेकरून कृष्णवर्णीयांना भेदभाव नसलेले आणि सुरक्षित शिक्षण घेता येईल. कृष्णवर्णीय शिक्षकांची नियुक्ती करणे, कृष्णवर्णीय इतिहास व संस्कृती अभ्यासक्रमात अनिवार्य करणे, जोखीम असलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देणे यांचा समावेश आहे. आरोग्यसंदर्भातील शिफारशींमध्ये गरीब कृष्णवर्णीय, हिंसक गुन्ह्याचे बळी आणि पूर्वी कारागृहात असणाऱ्यांसाठी मोफत मानसिक आरोग्य उपचार आणि पुनर्वसन उपचार यांचा समावेश आहे. नोकरीच्या संधी आणि रोजगार प्रशिक्षणासाठी सॅन फ्रान्सिस्कोमधील कृष्णवर्णीय रहिवाशांना प्राधान्य देण्याची आणि कृष्णवर्णीयांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी मार्ग शोधण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.