गेल्या वर्षअखेरीस हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यांत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकीत जागावाटपाबाबत काँग्रेसशी चर्चा करताना आक्रमक भूमिका घेतली. अगदी पश्चिम बंगालचे उदाहरण द्यायचे झाल्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काँग्रेसला राज्यात दोनपेक्षा जास्त जागाही द्यायला तयार नसल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे राज्यात सध्या काँग्रेसकडे दोन जागा आहेत. बिहारमध्येही संयुक्त जनता दल गेल्या वेळी जिंकलेल्या सोळा-सतरा जागा लढवण्यावर ठाम आहे. त्यामुळे बिहारमध्ये जनता दल-राजद यांच्या महाआघाडीतून काँग्रेसच्या वाट्याला चार ते पाच जागा येतील असे चित्र आहे. आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये एक उमेदवार जाहीर करत, काँग्रेसवर दबाव वाढवला आहे. आता पंजाबव्यतिरिक्त या दोन पक्षांमध्ये आघाडी होण्याची चिन्हे आहेत. मात्र एकूणच जागावाटपाबाबतची विरोधकांच्या आघाडीतील चर्चा पाहता काँग्रेस पक्ष आतापर्यंतच्या इतिहासात सर्वांत कमी जागा लढेल अशी चिन्हे आहेत.

अडीचशे जागांवर लक्ष?

विरोधकांच्या २७ पक्षांच्या इंडिया आघाडीत काँग्रेस हा देशव्यापी विस्तार असलेला पक्ष आहे. अन्य राष्ट्रीय पक्षांपैकी आम आदमी पक्ष दोन-तीन राज्यांपलीकडे नाही. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद केरळ-पश्चिम बंगालपुरती मर्यादित दिसते. यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी काँग्रेसवर आहे. अशा वेळी अधिकाधिक जागा मागण्यापेक्षा काँग्रेस पक्ष यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी २५५ ते २६५ जागांवर लक्ष केंद्रित करेल असे वृत्त आहे.

Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Donald trump, Elon Musk, Vivek Ramaswamy, Minimum Government, Maximum Governance
विश्लेषण : इलॉन मस्क, विवेक रामस्वामी ‘सरकार कार्यक्षमता’ मंत्री… ‘टीम ट्रम्प’ आतापासूनच का भरवतेय धडकी?
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

हेही वाचा… विश्लेषण: राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा की अजित पवारांचा? अपात्रता याचिकांबाबत शिवसेना निकालाचीच पुनरावृत्ती?

१९५१ पासून २०१९ पर्यंत १७ सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यामध्येही काँग्रेस आतापर्यंतच्या सर्वांत कमी जागा २०२४ मध्ये लढवेल असे संकेत आहेत. लोकसभेच्या एकूण ५४३ जागा असून, काँग्रेसने दरवेळी पावणेपाचशे जागा लढवल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत २००४ मध्ये सर्वांत कमी ४१७ तर १९९६ मध्ये सर्वाधिक ५२९ जागा लढवल्या होत्या. २०१४ व २०१९ मध्ये काँग्रेसने अनुक्रमे ४६४ व ४२१ जागांवर उमेदवार दिले होते.

कामगिरीत घसरण

काँग्रेसने १९५१ व ५७ मध्ये लढवलेल्या जागांपैकी ७५ टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या. तर १९८४ मध्ये हेच प्रमाण ८० टक्के इतके होते. २०१४ पर्यंत काँग्रेसने एकूण लढवलेल्या जागांपैकी २५ टक्क्यांपेक्षा अधिक जागांवर यश मिळवले. मात्र २०१४ मध्ये ४४ जागा व लढवलेल्या जागांच्या तुलनेत यशाचे प्रमाण ९.४८ इतके कमी होते. २०१९ मध्ये यात थोडी सुधारणा होऊन १२.३५ टक्के इतके होते. ही स्थिती पाहता यंदा मोजक्या जागांवर लक्ष केंद्रित करून, विशेषत: दक्षिणेत जेथे काँग्रेसची ताकद आहे, तेथेच काँग्रेस निवडणूक लढवेल असे चित्र आहे. अर्थात २०१९ मध्ये काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या होत्या. त्यात प्रामुख्याने पंजाब, केरळ तसेच तमिळनाडूतील जागांचा समावेश होता. यंदा पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे आव्हान आहे. तर केरळमध्ये डाव्या पक्षांची आघाडी सत्तेत असून, या जागा टिकवण्याचे आव्हान आहे.

एकास-एक लढतीचे उद्दिष्ट

गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष २०९ जागांवर दुसऱ्या स्थानी राहिला तर, १६० जागी तिसऱ्या-चौथ्या स्थानावर होता. आता विरोधकांच्या आघाडीत जागावाटप जर सुरळीत झाले तर भाजपला एकास-एक लढत देण्याचे उद्दिष्ट आहे. मतविभागणी टाळता येईल असे गणित आहे. यामध्ये जागा वाढवता येतील अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. १९९१ नंतर काँग्रेसची ताकद कमी झाली. काँग्रेसला २०१४ मध्ये मोठा फटका बसला, यावेळी २२४ मतदारसंघांत दुसऱ्या तर १९६ ठिकाणी तिसऱ्या-चौथ्या स्थानी पक्ष फेकला गेला. तर १९७७ च्या जनता लाटेतही १५४ जागा जिंकून ३३२ ठिकाणी काँग्रेस दुसऱ्या स्थानी राहिला. एकूणच हे चित्र पाहता सलग दहा वर्षे सत्तेबाहेर राहिल्याने यंदा काँग्रेसने विरोधकांच्या आघाडीला बळ देण्यासाठी जागावाटपात काहीशी नमती भूमिका घेतली आहे.

भाजपचे बळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. पक्षाची पूर्वीची कामगिरी पाहता, १९८४ मध्ये २२९ पैकी केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या. गेल्या वेळी भाजपने ४३६ जागा लढवून ३०३ जागा जिंकल्या आहेत. भाजपने १९९१ नंतर ३०० पेक्षा जास्त जागा लढवल्या आहेत. यंदा भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत गेल्या वेळचे संयुक्त जनता दल तसेच शिवसेना हे प्रमुख पक्ष नाहीत. भाजप यंदाही साडेचारशेच्या आसपास जागा लढवेल. दक्षिणेकडे आंध्र प्रदेश, तमिळनाडू तसेच केरळ या राज्यांत भाजप कमकुवत आहे. येथे भाजप आघाडीतून लढेल, महाराष्ट्रातही दोन पक्षांना जागा सोडाव्या लागतील. बिहार, उत्तर प्रदेशमध्येही भाजपच्या आघाडीत अनेक पक्ष आहेत. भाजपसाठी जागावाटप तितके सोपे नाही. मात्र केंद्रात सत्ता तसेच नरेंद्र मोदी यांच्यासारखे लोकप्रिय नेतृत्व असल्याने मित्रपक्ष भाजपला जागावाटपात फार आव्हान देतील असे दिसत नाही. अर्थात भाजपला मित्र पक्षांची गरज आहे. गेल्या वेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४० टक्क्यांच्या आसपास मते मिळाली आहेत. भाजपला सत्ता राखण्यासाठी मित्र पक्षांची ही मते महत्त्वाची ठरतील. यंदाच्या निवडणुकीत जवळपास साडेचारशे जागांवर भाजपविरोधात एकास-एक उमेदवार देण्याचा विरोधी इंडिया आघाडीचा निर्धार आहे. यातून काँग्रेस पक्षाने अडीचशेच्या आसपास जागांवर लक्ष केंद्रित केले आहे.