गेल्या वर्षअखेरीस हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यांत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकीत जागावाटपाबाबत काँग्रेसशी चर्चा करताना आक्रमक भूमिका घेतली. अगदी पश्चिम बंगालचे उदाहरण द्यायचे झाल्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काँग्रेसला राज्यात दोनपेक्षा जास्त जागाही द्यायला तयार नसल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे राज्यात सध्या काँग्रेसकडे दोन जागा आहेत. बिहारमध्येही संयुक्त जनता दल गेल्या वेळी जिंकलेल्या सोळा-सतरा जागा लढवण्यावर ठाम आहे. त्यामुळे बिहारमध्ये जनता दल-राजद यांच्या महाआघाडीतून काँग्रेसच्या वाट्याला चार ते पाच जागा येतील असे चित्र आहे. आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये एक उमेदवार जाहीर करत, काँग्रेसवर दबाव वाढवला आहे. आता पंजाबव्यतिरिक्त या दोन पक्षांमध्ये आघाडी होण्याची चिन्हे आहेत. मात्र एकूणच जागावाटपाबाबतची विरोधकांच्या आघाडीतील चर्चा पाहता काँग्रेस पक्ष आतापर्यंतच्या इतिहासात सर्वांत कमी जागा लढेल अशी चिन्हे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा