कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आश्चर्यकारक कामगिरी केली. या निवडणुकीत काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून एकूण १३५ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपाला फक्त ६६ जागांवर विजय मिळवता आला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा विजय काँग्रेससाठी खूप महत्त्वाचा असल्याचे म्हटले जात आहे. या विजयामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची देशात किती राज्यांत सत्ता आहे? किती राज्यांत हा पक्ष सत्तेत सहभागी आहे? हे जाणून घेऊ या.

कर्नाटकमधील विजयासह काँग्रेस पक्ष देशात एकूण ७ राज्यांत सत्तेवर आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि आता काँग्रेस अशा चार राज्यांत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. तर तामिळनाडू, बिहार आणि झारखंड या राज्यांत काँग्रेस सत्तेत सहभागी आहे.

Dharavi Kumbharwada rehabilitation
धारावी कुंभारवाड्याचे मुलुंड कचराभूमीच्या जागेवर पुनर्वसन?; जागा दाखविण्यासाठी नेल्याने रहिवासी संतप्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच
people among the Kumbh Mela pilgrims contributed to the resolve traffic jam
गेले संगमस्नानास अन् ओंजळीत वाहतूक नियंत्रणाचे पुण्य!
plan to increase the length of the ghats for kumbh mela discussed in weekly meeting
कुंभमेळ्यासाठी घाटांची लांबी वाढविण्याची योजना; साप्ताहिक बैठकीत चर्चा
board regarding new dharavi in mulund removed
मुलुंडमधील नवीन धारावीसंदर्भातील फलक हटविले
mauni amavasya at mahakumbh
मौनी अमावस्या म्हणजे काय? महाकुंभात त्याचे महत्त्व काय?

हेही वाचा > विश्लेषण : परमबीर यांचे निलंबन मागे घेण्यामागे काय दडलंय? राजकीय संघर्षात अधिकाऱ्यांचाही वापर?

हिमाचल प्रदेश :

हिमाचल प्रदेशमध्ये २०२२ साली विधानसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसने एकूण ६८ जागांपैकी ४५ जागांवर विजय मिळवला होता. २०२७ सालापर्यंत हे राज्य काँग्रेसच्याच ताब्यात असणार आहे. काँग्रेसने या निवडणुकीत तेथील जनतेला आकर्षक आश्वासने दिली होती. यासह सत्तेत आल्यास आम्ही नवी पेन्शन योजना मागे घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करू, असेही आश्वासन काँग्रेसने येथील जनतेला दिले होता. येथे निवडणुकीपूर्वी सत्ताविरोधी वातावरण निर्माण झाले होते. त्याचाही फायदा येथे काँग्रेसला झाला. परिणामी भाजपा येथे फक्त २५ जागांवर विजय मिळवू शकला.

निवडणूक जिंकल्यानंतर येथे मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्येच स्पर्धा लागली होती. मात्र काँग्रेसने पक्षात दुफळी निर्माण न होऊ देता सुखविंदर सिंग सुखू यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले.

हेही वाचा >> Karnataka Election 2023 : ७ टक्के मते आणि ७० जागांचा फरक! ‘या’ कारणामुळे काँग्रेसचा विजय; पण भाजपाला कोणत्या प्रदेशात फटका? जाणून घ्या… 

राजस्थान :

राजस्थानमध्ये याच वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर येथे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. सध्या येथे काँग्रेसची सत्ता असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री आहेत. २०१८ साली येथे २०० जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी १०० जागांवर काँग्रेसचा विजय झाला होता. २०१८ सालच्या निवडणुकीआधी येथे भाजपाची सत्ता होती. तर वसुंधराराजे या मुख्यमंत्रीपदी होत्या. निवडणुकीदरम्यान येथे सत्ताविरोधी वातावरण निर्माण झाले होते. मात्र काँग्रेसला त्याचा फारसा फायदा झाला नाही. २०१८ सालापासून काँग्रेसची येथे सत्ता आहे. मात्र अंतर्गत वादामुळे येथील काँग्रेसमधील दुफळी अनेकदा समोर आलेली आहे. काँग्रेसचे तरुण नेते सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोन नेत्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वासाठी सध्या राजकीय युद्ध सुरू आहे.

राजस्थानमध्ये याच वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. असे असताना गेहलोत-पायलट हा वाद काँग्रेसला न झेपणारा आहे. याच कारणामुळे निवडणुकीआधी या दोन नेत्यांतील वादावर योग्य तो तोडगा काढणे काँग्रेससाठी फार महत्त्वाचे आहे.

हेही वाचा >> Mothers day 2023: विश्लेषण: भारताला मातृपूजेची तब्बल २६ हजार वर्षांची परंपरा! 

छत्तीसगड :

राजस्थानप्रमाणेच छत्तीसगड या राज्यातही याच वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. २०१८ सालच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला धूळ चारली होती. एकूण ९० जागांपैकी येथ काँग्रेसने तब्बल ६८ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. भाजपाला येथे फक्त १५ जागांवरच विजय मिळवता आला होता. २०१८ सालातील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर २००३ पासून येथे १५ वर्षे भाजपाची सत्ता होती.

निवडणूक जिंकल्यानंतर या राज्यातही मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला होता. येथे एका बाजूला ओबीसी समाजाचे नेते भूपेश बघेल तर दुसरीकडे सुरगुजा येथील राजघराण्यातील डी. एस. सिंह देव असे दोन नेते आमनेसामने आले होते. मात्र काँग्रेसने पहिल्या अडीच वर्षांसाठी बघेल यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. तर पुढची अडीच वर्षे डी. एस. सिंह देव यांना मुख्यमंत्री केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र अद्याप येथे बघेल हेच मुख्यमंत्री आहेत.

हेही वाचा >> कर्नाटकच्या विजयामुळे इतर राज्यात जिंकण्याच्या काँग्रेसच्या आशा पल्लवित; विरोधकांमध्ये काँग्रेसची पत वाढेल?

कर्नाटक :

नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसने येथे बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेसचा १३५ तर भाजपाचा ६५ जागांवर विजय झाला आहे. दरम्यान, निवडणूक जिंकली असली तरी येथे अद्याप मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या शर्यतीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोन नेते आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांपैकी काँग्रेस कोणाकडे मुख्यमंत्रीपद सोपवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बिहार :

याव्यतिरिक्त काँग्रेस एकूण तीन राज्यांत सत्तेत सहभागी आहे. २०२० साली बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपाचा ७४ तर जेडीयू पक्षाचा ४३ जागांवर विजय झाला होता. नंतर या दोन्ही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केले होते. २४३ जागा असलेल्या विधिमंडळात काँग्रेसचा येथे फक्त १९ जागांवर विजय झालेला आहे. त्यामुळे अगोदर हा पक्ष आरजेडी, सीपीआय (एमएल)(एल) तसेच सीपीआय (एम) या पक्षांसोबत विरोधकांच्या भूमिकेत होता. मात्र २०२२ साली जेडीयूचे नेते नितीशकुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेतला. तसेच आरजेडी, सीपीआय (एमएल)(एल) तसेच सीपीआय (एम) आणि काँग्रेसला सोबत घेत महाआघाडीचे सरकार स्थापन केले. येथे काँग्रेसकडे २ मंत्रीपदे आहेत.

हेही वाचा >> विश्लेषण : भारतीय संस्कृतीतील मातृसत्ताक कुटुंबपद्धती ! 

झारखंड :

२०१९ साली झारखंड राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांनंतर येथे विधानसभेची निवडणूक पार पडली होती. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे छत्तीसगडच्या निवडणुकीतही भाजपा चांगली कामगिरी करेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र ८१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीनंतर जेजेएम (३० जागा), काँग्रेस (१६ जागा), आरजेडी (१ जागा) या पक्षांनी एकत्र येत येथे सरकारची स्थापना केली. येथे जेजेएम पक्षाचे सर्वेसर्वा हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री आहेत. काँग्रेस पक्षाकडे ४ मंत्रीपदे आहेत.

तामिळनाडू :

२०२१ साली तामिळनाडूमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली होती. येथील डीएमके पक्षाचे नेते एम करुणानिधी आणि एआयएडीएमके पक्षाच्या नेत्या जे जयललिता यांच्या निधनानंतर येथे २०२१ साली पहिल्यांदाच निवडणूक झाली होती. मात्र या निवडणुकीत डीएमके पक्षाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीने सरकारची स्थापना केली. काँग्रेस पक्षदेखील या आघाडीचा भाग आहे. या निवडणुकीत डीएमकेने १३३ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसचा एकूण १८ जागांवर विजय झाला होता. येथे सध्या डीएमके पक्षाचे एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्री आहेत.

हेही वाचा >> Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांचे ‘सहा’ कळीचे मुद्दे

२०२३ साली कोणकोणत्या राज्यांत निवडणुका होणार?

२०२३ या साली देशात आणखी ५ राज्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. यामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान, तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. यापैकी छत्तीसगड आणि राजस्थान अशा दोन राज्यांत काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे या राज्यांत सत्ताविरोधी लाट रोखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे असणार आहे. काँग्रेसने २०१८ साली मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणूक जिंकली होती. मात्र जोतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेक आमदारांनी बंड केल्यामुळे येथे काँग्रेसची सत्ता गेली. त्यामुळे या राज्यातही पुन्हा एकदा सत्तेत येण्याची काँग्रेसला या वर्षी संधी असेल.

Story img Loader