अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचे उद्घाटन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्याथ आदी मान्यवर या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान, प्रभू रामाचा उल्लेख करीत देशात रामराज्य असावे, असे हमखास म्हटले जाते. आम्ही सत्तेत आल्यास देशात रामराज्य निर्माण करू, असे आश्वासनही अनेक नेते देतात. महात्मा गांधी यांनीदेखील रामराज्याची संकल्पना मांडली होती. याच पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेले रामराज्य काय आहे? महात्मा गांधींचे रामराज्य काय होते? हे जाणून घेऊ…

“संविधानात रामराज्य अंतर्भूत”

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी रामराज्याचा उल्लेख केला होता. भारतीय संविधानात रामराज्य अंतर्भूत आहे. याच कारणामुळे संविधाननिर्मात्यांनी संविधानातील मूलभूत हक्कांची माहिती असलेल्या पानावर प्रभू राम, सीता व लक्ष्मणाचे चित्र दिलेले आहे, असे धनखड म्हणाले होते.

Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
Sevagram Rahul Gandhi BJP and RSS Nagpur Election
लोकजागर : फसलेले ‘चिंतन’!
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
veer pahariya
राजकारणाऐवजी बॉलीवूड का निवडलं? महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू वीर पहारिया म्हणाला…
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य

योगी आदित्यनाथ यांच्याकडून रामराज्याचा उल्लेख

गेल्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील रामराज्याचा उल्लेख केला होता. “उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा विचार घेऊनच या राज्याची वाटचाल सुरू आहे. आर्थिक समृद्धी, विकासाधारित समाज याxमुळे प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद येऊ शकतो,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.

मोदींकडूनही रामराज्याचा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील महात्मा गांधी यांचा संदर्भ देत रामराज्याचा उल्लेख केला होता. २०१४ साली अयोध्येत एका सभेला संबोधित करताना “जेव्हा लोक तुम्हाला कशा पद्धतीचा राज्यकाभार हवा आहे, असे विचारायचे तेव्हा ते एका वाक्यात उत्तर द्यायचे. आपण जेव्हा लोकांच्या कल्याणाचा विचार करतो, तेव्हा ते रामराज्य असावे. रामराज्यात सर्व जण आनंदी असावेत, एकही व्यक्ती दु:खी नसावी, असे गांधीजी सांगायचे,” असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते.

“रामराज्य म्हणजे पवित्र राज्य”

महात्मा गांधी यांनी आपल्या वेगवेगळ्या लिखाणांत अनेकदा परिपूर्ण राज्याचा उल्लेख केलेला आहे. परिपूर्ण राज्याचा उल्लेख करताना त्यांनी अनेक ठिकाणी गांधीजींनी रामराज्याचा संदर्भ दिला आहे. त्यांनी १९२९ मध्ये ‘हिंद स्वराज’मध्ये आपल्या लिखाणात “रामराज्य म्हणजे हिंदू धर्माचे राज्य, असे माझे मत नाही. रामराज्य म्हणजे पवित्र राज्य. देवाचे राज्य. माझ्यासाठी राम आणि रहीम एकच आहेत. माझ्यासाठी सत्य आणि नीतीमत्ता हेच देव आहेत,” असे महात्मा गांधी म्हणाले होते.

“रामराज्य खऱ्या लोकशाहीपैकी एक”

यंग इंडिया या मासिकातही त्यांनी रामराज्य या संकल्पनेवर भाष्य केलेले आहे. “इतिहासातील प्रभू रामाचे राज्य खऱ्या लोकशाहीपैकी एक आहे. त्यामध्ये सामान्यातील सामान्य नागरिकाला वेगवान न्यायाची खात्री होती. विशेष म्हणजे या न्यायात महाग आणि किचकट प्रक्रिया नव्हती. वाल्मीकी यांनी वर्णन केल्याप्रमाणे एका कुत्र्यालादेखील रामराज्यात न्याय मिळाला होता,” असा उल्लेख महात्मा गांधी यांनी केलेला आहे.

रामराज्यातील कुत्र्याचा संदर्भ काय?

रामराज्यात प्रत्येकाला न्याया मिळायचा, असे म्हटले जाते. वाल्मीकी यांनी लिहिलेल्या रामायणात अशाच एका कुत्र्याला न्याय मिळाल्याचा उल्लेख आहे. वाल्मीकी यांनी उल्लेख केल्याप्रमाणे एक कुत्रा प्रभू रामाच्या अयोध्येतील न्यायालयात गेला होता. एका ब्राह्मण भिकाऱ्याने मारल्यामुळे मला जखम झाली, अशी तक्रार या कुत्र्याने केली होती. हा ब्राह्मण भिकारी आणि कुत्रा अन्नासाठी भांडत होते. या भांडणात भिकाऱ्याने कुत्र्याला मारले होते, असे सांगितले जाते. कुत्र्याने प्रभू रामाच्या न्यायालयात भिकाऱ्याची तक्रार केली होती. रामाने कुत्र्याची ही तक्रार ऐकून भिकाऱ्याला शिक्षा केली होती. तसेच आपल्या अन्नाची गरज भागवण्यासाठी, चांगले जीवन जगण्यासाठी, स्वत:ची स्थिती सुधारण्यासाठी मदत करावी, असा आदेश दिला होता.

धर्म, राजकारण आणि महात्मा गांधी

महात्मा गांधींसाठी रामराज्य ही संकल्पना फक्त एका वर्गापुरतीच मर्यादित नव्हती. फक्त एका वर्गालाच, एका धर्मालाच सर्व फायदा मिळावा, असे गांधी यांचे मत नव्हते. “माझे हिंदुत्व मला सर्व धर्मांचा आदर करायला शिकवते. त्यातच रामराज्याचे रहस्य आहे,” असे १९४७ साली महात्मा गांधी म्हणाले होते.

लोकांना एकत्र आणण्यासाठी धर्माचा वापर

महात्मा गांधी यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी, एकी निर्माण करण्यासाठी त्यांनी धर्माचा वापर केला. पहिल्या महायुद्धात (१९१४ ते १९१८) ऑटोमन साम्राज्याचे विघटन रोखण्यासाठी पॅन इस्लामिक चळवळीला सुरुवात झाली. या चळवळीला महात्मा गांधी यांनी पाठिंबा दिला होता. या चळवळीला पाठिंबा देत, त्यांनी भारतात ब्रिटिशांविरोधात मोहीम सुरू केली. या मोहिमेच्या रूपाने हिंदू आणि मुस्लीम एकत्र येतील, अशी अपेक्षा गांधीजींना होती.

“स्वत:च्या चुकांवर काम करावे लागेल”

महात्मा गांधी यांनी १९३४ मध्य समानता आणि अहिंसा या संदर्भाने रामराज्याबद्दल लिहिलेले आहे. “माझ्या स्वप्नातील रामराज्यात प्रत्येकाला समान अधिकार आहेत,” असे गांधी म्हणाले होते. महात्मा गांधींनी आध्यात्मिक अंगाने राज्याची संकल्पना मांडली होती. “तुम्हाला रामराज्याच्या रूपात देव पाहायचा असेल, तर आत्मपरीक्षण ही त्याची पहिली अट आहे. तुम्हाला स्वत:च्या चुकांवर काम करावे लागेल. तसेच दुसऱ्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून डोळे बंद करावे लागतील. हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे,” असे गांधीजी यांनी आपल्या एका लेखात लिहिलेले आहे.

Story img Loader