Dr. Babasaheb Ambedkar’s 3 warnings about India’s future: संविधान दिवस: मंगळवारी (२६ नोव्हेंबर) भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेच्या संयुक्त अधिवेशनात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत असे म्हटले की, राजकारण्यांनी “धर्मापेक्षा देशाला महत्त्व दिले पाहिजे”. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वारंवार हे सांगितले होते की, संविधानाची कार्यक्षमता आणि प्रभाव त्या लोकांवर अवलंबून असेल, जे ते अंमलात आणतील. “… कितीही चांगले संविधान असले तरीही, ते वाईट ठरू शकते, जर त्याची अंमलबजावणी करणारे लोक वाईट असतील,” असे त्यांनी म्हटले होते. धनखड यांनी उद्धृत केलेले विधान हे २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेतील डॉ. आंबेडकर यांच्या समारोपाच्या भाषणातील आहे. या भाषणात त्यांनी देशाच्या भविष्याबाबत काही बाबतीत धोके व्यक्त सांगितले होते. आजच्या राजकीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवर संविधानाचा वारंवार उल्लेख केला जातो, अशा वेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या धोक्यांचाही प्रतिध्वनी ऐकू येतो. येथे त्यापैकी तीन धोक्यांची चर्चा केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अधिक वाचा: Constitution Day: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे महिलांना संविधानात कोणते हक्क मिळाले?
१) भारत पुन्हा स्वातंत्र्य गमावेल का?
भारताने कशाप्रकारे अंतर्गत मतभेदांमुळे स्वातंत्र्य गमावले याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते आणि पुन्हा असे होईल का, याबाबत चिंता व्यक्त केली होती. “इतिहासाची पुनरावृत्ती होईल का? हा विचार मला चिंतेने भरून टाकतो. जात आणि धर्म यांच्या रूपाने आपले जुने शत्रू असण्याबरोबरच आता अनेक राजकीय पक्ष विविध आणि विरोधी राजकीय विचारसरणींसह उदयास येणार आहेत, ही जाणीव सदरहू चिंता अधिकच वाढवते. भारतीय नागरिक या देशाला धर्माच्या वर ठेवतील का, की धर्माला देशाच्या वर ठेवतील, मला माहीत नाही. परंतु हे नक्की आहे की, जर पक्षांनी धर्माला देशाच्या वर स्थान दिले, तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे गमावले जाईल,” डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. स्वातंत्र्याचा अर्थ केवळ भौगोलिक नसतो. जर देशातील लोकांच्या कृती देशाच्या प्रगतीच्या इच्छेने प्रेरित नसतील आणि जर ते धर्म, समाज, जात इत्यादींच्या भीती आणि पूर्वग्रहांच्या कैदेत असतील, तर अशा देशाला खरे स्वातंत्र्य लाभलेले आहे असे म्हणता येणार नाही.
२) ‘India has known democracy before, will it remain democratic?’ भारत ही लोकशाहीच राहील का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले होते की, लोकशाही ही भारतासाठी नवी संकल्पना नव्हती, तर ती प्राचीन काळातही अस्तित्वात होती. “एक काळ असा होता की, भारतात अनेक गणराज्ये होती… भारताला संसद किंवा संसदीय प्रक्रिया माहीत नव्हती असेही नाही. बौद्ध भिक्षू संघांच्या अभ्यासातून असे दिसून येते की, फक्त संसदच होत्या असे नाही (कारण संघ म्हणजेच संसद होत्या) तर त्या संघांना आधुनिक काळात परिचित असलेल्या संसदीय प्रक्रियेचे सर्व नियम माहीत होते आणि ते नियम ते पाळतही होते.”
व्यक्तिपूजेला विरोध
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, बुद्धाने आपल्या काळातील देशातील राजकीय सभांमधील नियमांमधून ही कार्यपद्धती घेतली असावी. यानंतर त्यांनी एखाद्या नेत्याच्या व्यक्तिपूजेस किंवा भक्तीवृत्तीबद्दल सावध राहण्याचा इशारा दिला. “ज्या महान व्यक्तींनी देशासाठी आयुष्यभर सेवा केली आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीही चुकीचे नाही. पण कृतज्ञतेलाही काही मर्यादा आहेत… भारतात भक्ती किंवा ज्याला आपण भक्तीमार्ग किंवा व्यक्तिपूजा म्हणतो, ती राजकारणात इतकी मोठी भूमिका बजावते, तिने इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात एवढी मोठी भूमिका बजावली जात नाही. धर्मात भक्ती आत्म्याच्या मुक्तीसाठी मार्ग असू शकतो. पण राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधोगतीकडे आणि शेवटी हुकूमशाहीकडे जाण्याचा निश्चित मार्ग ठरतो,” असे त्यांनी सांगितले.
३) If political democracy would expand to social democracy सामाजिक लोकशाहीचा पाया
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकणार नाही”, ज्याचा अर्थ “स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जीवनाची तत्त्वे म्हणून ओळखणारी जीवनपद्धती आहे.” त्यानंतर त्यांनी भारतात अस्तित्वात असलेल्या टोकाच्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर प्रकाश टाकला.
सत्ता ही काहींचीच मक्तेदारी
“… या देशातील राजकीय सत्ता फार काळ काही मोजक्या लोकांची मक्तेदारी ठरली आहे आणि अनेकजण केवळ ओझे वाहणारे पशूच नव्हे तर भक्षकही ठरले आहेत. या मक्तेदारीमुळे प्रगतीची संधीच हिरावून घेतली गेली नाही, तर त्यांना जीवनातील महत्त्वाचा अर्थही गमवावा लागला आहे.
या दलित वर्गाला आज त्यांच्यावर राज्य होत आहे याचा कंटाळा आला आहे. त्यांना स्वतःला शासन करायचे आहे. दलित वर्गातील ही आत्मसाक्षात्काराची इच्छा वर्गसंघर्ष किंवा वर्गयुद्धात रूपांतरित होऊ नये, यासाठी दक्ष राहिले पाहिजे,” असा इशारा डॉ. आंबेडकर यांनी दिला. अखेरीस, ते म्हणाले होते की, जर देशाचे भविष्य खरंच अंधकारमय झाले, तर एकच निष्कर्ष काढता येईल. “खरंच, मी असे म्हणण्याचे धाडस करू शकतो. जर नवीन संविधानाच्या अंतर्गत गोष्टी बिघडल्या, तर याचे कारण आपण वाईट संविधान तयार केले असे नाही. तर आपल्याला म्हणावे लागेल माणूसच नीच होता,” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. बाबासाहेबांनी व्यक्त केलेले हे तिन्ही धोके सद्यस्थितीत डोके वर काढताना दिसत आहेत, असे समाजधुरिणांना वाटते!