जागतिक महासत्ता म्हणून जगभरात अमेरिकेचा नावलौकिक आहे. अमेरिकेची जी आर्थिक भरभराट झाली आहे, त्यात भारतीय नागरिकांचा मोठा वाटा आहे. अमेरिकेतील ‘इंडियास्पोरा’ नावाची स्वयंसेवी संस्था अमेरिकेतील भारतीय अमेरिकन लोकांचे योगदान आणि देशावर त्यांचा प्रभाव याबद्दलचा तपशील देते. याच स्वयंसेवक संस्थेने एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे. ‘स्मॉल कम्युनिटी, बिग कॉन्ट्रिब्युशन्स, बाउंडलेस होरायझन्स : द इंडियन डायस्पोरा इन द युनायटेड स्टेट्स’ असे या अहवालाचे शीर्षक आहे. या अहवालात काय? ते जाणून घेऊ.

भारतीयांचे योगदान

-५.१ दशलक्ष भारतीय अमेरिकन अमेरिकेत वास्तव्य करतात. त्यात भारतात आणि अमेरिकेत जन्माला आलेल्या भारतीयांचा समावेश आहे. अमेरिकेत परदेशस्थ भारतीयांची संख्या देशाच्या लोकसंख्येच्या केवळ १.५ टक्का आहे. त्यापैकी ४५ टक्के भारतीय २०१० नंतर अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले; तर सुमारे ३० टक्के लोक २००० पूर्वी स्थलांतरित झाले. त्यातील बहुतांश लोकसंख्या न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियामध्ये केंद्रित आहे.

५.१ दशलक्ष भारतीय अमेरिकन अमेरिकेत वास्तव्य करतात. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : भारतात मंकीपॉक्सची साथ कधी आली होती? यंदा या विषाणूचा सामना करण्यासाठी भारत तयार आहे का?

-अमेरिकेमधील ६४८ पैकी ७२ युनिकॉर्न स्टार्टअप्सचे नेतृत्व भारतीय स्थलांतरित करतात. या स्टार्टअप्सचे एकत्रित मूल्य १९५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. या कंपन्यांमध्ये अंदाजे ५५ हजार लोक (युनिकॉर्न कर्मचारी १३ टक्के) काम करतात.

-अमेरिकेतील एकूण हॉटेल्सपैकी ६० टक्के हॉटेल्स भारतीय अमेरिकन नागरिकांच्या मालकीची आहेत. ही हॉटेल्स अंदाजे ७०० अब्ज डॉलर्स इतकी कमाई करतात आणि दरवर्षी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे चार दशलक्षांहून अधिक नोकऱ्या निर्माण करतात.

-अमेरिकेतील सर्व सुविधा स्टोअर्सपैकी ३५ ते ५० टक्के भारतीय अमेरिकन लोकांच्या मालकीची आहेत. ते दरवर्षी ३५० ते ४९० अब्ज डॉलर्सची कमाई करतात.

-वार्षिक खर्चात भारतीय अमेरिकन नागरिकांचा ३७० ते ४६० डॉलर्स इतका वाटा असतो; तर भारतीय अमेरिकन वार्षिक कर महसुलात ३०० अब्ज डॉलर्स म्हणेच सहा टक्के योगदान देतात. त्यांची कर देयके अत्यावश्यक सार्वजनिक सेवा आणि पायाभूत सुविधांना बळकटी देतात; ज्यामुळे ते अमेरिकन अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग ठरतात.

-२०२३ सालच्या अमेरिकेतील सर्व जर्नल प्रकाशनांमध्ये १३ टक्के भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी सह-लेखन केले होते. २०१५ मध्ये हा आकडा ११ टक्के होता.

-अमेरिकेमधील ५० पैकी ३५ महाविद्यालयांमध्ये भारतीय अमेरिकन उच्च पदांवर कार्यरत आहेत; ज्यामध्ये कुलपती, प्रोव्होस्ट आणि महाविद्यालयांचे संचालक यांसारख्या भूमिकांचा समावेश आहे.

हेही वाचा : 26/11 Mumbai Terror Attack: हल्ल्यातील प्रमुख आरोपीचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण? कोण आहे तहव्वूर राणा?

-२००० पासून इंग्रजी भाषेसंदर्भातील अमेरिकेतील आघाडीचा क्विझ शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘स्क्रिप्स स्पेलिंग बी’ स्पर्धेतील ३४ विजेत्यांपैकी २८ जण भारतीय वंशाचे होते.

-२००८ पासून अमेरिकन विद्यापीठांना भारतीय अमेरिकन लोकांनी तीन अब्ज डॉलर्स इतकी देणगी दिली आहे.

-भारतीय अमेरिकन नागरिक दरवर्षी कार्यामध्ये १.५ ते दोन अब्ज डॉलर्सचे योगदान देतात.

Story img Loader