गर्भवती असताना जर करोनाची लागण झाली तर त्या दरम्यान होणारा त्रास आणि तब्येतीवर होणारा परिणाम याबद्दल अनेक चर्चा ऐकायला मिळत आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाने याबद्दल अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासातून निघालेल्या निष्कर्षानुसार, करोनाबाधित गरोदर महिला आणि तिचं होणार मूल या दोघांनाही त्रास होण्याचा धोका आहे. मात्र हा निष्कर्ष सरसकट सर्वच गर्भवती महिलांबाबत सत्य मानता येणार नाही. कारण हा अभ्यास एका छोट्या गटासंदर्भात करण्यात आला आहे. याबद्दल इंडिया टुडेने काही तज्ज्ञांशी चर्चा केली आहे.

अजिबात घाबरुन जाऊ नका!
तज्ज्ञांच्या मतानुसार, जर गर्भारपणात करोनाची लागण झाली तर घाबरुन जाण्याचं काही कारण नाही. गर्भावस्थेमुळे करोनाचा जास्त त्रास होतो असं काहीही नाही. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये करोना झाला आणि जर सौम्य लक्षणं असतील तर योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि व्यायाम या त्रिसूत्रीच्या आधारावर रुग्ण घरीच बरा होऊ शकतो. पुढच्या टप्प्यांमध्ये काही त्रास होण्याचा धोका असतो. मात्र, तोही त्या महिलेच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून असतो. पण योग्य औषधोपचारांच्या आधारे अशा प्रकरणांमध्येही प्रसूतीमध्ये कोणताही अडथळा निर्माण न होता रुग्ण बरा होऊ शकतो.

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
menstrual leave mva provision
मासिक पाळीच्या रजेचा विषय पुन्हा चर्चेत; भारतात काय आहेत नियम? कोणकोणत्या राज्यांत रजेची तरतूद?
Ruhi Chaturvedi announces pregnancy
Video: एकाच मालिकेतील तिसऱ्या अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई

याबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लवलीना नादिर म्हणतात, “गर्भवतींना करोनाचा धोका अधिक आहे ही गोष्ट चुकीची आहे. गर्भावस्थेत रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यामुळे फक्त करोनाच नाही तर सर्वच प्रकारच्या विषाणूंपासून गर्भवतींना धोका असतो. गर्भवतीने आपण विषाणूच्या संपर्कात येणार नाही अशी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी कमीत कमी घराबाहेर पडायला हवं”.

नवा स्ट्रेन जबाबदार!
डॉ. शेली सिंग म्हणतात, “करोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये गर्भवती महिलांमध्ये करोना प्रादुर्भावाचं प्रमाण वाढत आहे. याचं कारण म्हणजे करोनाचा हा नवा स्ट्रेन. करोनाच्या नव्या स्ट्रेनचा अधिक वेगाने प्रसार होत आहे. काही वेळा आरटीपीसीआर चाचणी करुनसुद्धा अहवाल निगेटिव्ह येतो. बऱ्याचदा करोनाची सर्व लक्षणं असूनसुद्धा अहवाल निगेटिव्ह येतो. अशा परिस्थितीत रुग्णावर करोनाचे उपचार केले जातात”.

प्रसूतीदरम्यानची गुंतागुंत…
डॉ. शेली सिंग यांच्या म्हणण्यानुसार, जर आईची तब्येत गंभीर असेल तर काही वेळा संभाव्य तारखेच्या आधी प्रसूती (Premature delivery) करावी लागते. मात्र हे फक्त करोनामुळे होतं असं नाही. त्याला इतरही कारणे आहेत.
तर डॉ. लवलीना नादिर म्हणतात, “करोनामुळे प्रसूती अवघड होते असं नाही. जर ऑक्सिजन लेव्हल नॉर्मल असेल आणि इतर कोणता आजार आईला नसेल तर प्रसूतीमध्ये धोका नाही”.
डॉ. बंधना सोढी म्हणतात, “प्रसूतीदरम्यान ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. याच कारणामुळे सिझेरियन केलं जातं. नॉर्मल डिलीव्हरीदरम्यान होणाऱ्या प्रसूतीवेदनांमुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊ शकतं. तो धोका टाळण्यासाठी सिझेरियन केलं जातं. त्यामुळे प्रसूतीपूर्व काळातही रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल, ताप आणि रक्तघटकांचं प्रमाण यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे”.

डॉक्टरांचा विशेष सल्लाः
१. करोनासंबंधीच्या सर्व खबरदारीच्या नियमांचं पालन करा. गर्दीमध्ये जाऊ नका.
२. योग्य आहार आणि व्यायाम करा.
३. दवाखान्यात जाण्याची घाई करु नका. जास्तीत जास्त सकारात्मक राहा.
४. स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका. प्रत्येकवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
५. घाबरुन जाऊ नका. स्वतःला अलग करुन घ्या. दर सहा तासांनी ऑक्सिजनचं प्रमाण तपासा आणि डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहा. ऑक्सिजनचं प्रमाण ९४ किंवा त्यापेक्षा खाली असल्याचं त्वरीत आपल्या डॉक्टरांना याची माहिती द्या.
६. गर्भावस्थेच्या अंतिम टप्प्यात अधिक काळजी घ्या.

आईकडून गर्भातल्या बाळाला धोका आहे का?
गर्भातल्या बाळाला धोका नाही. पण अगदी अपवादात्मक प्रकरणांमध्ये हे शक्य आहे. अशा वेळी स्तनपान अधिक महत्त्वाचं आहे. ते करत असताना स्वच्छता, मास्क या नियमांचं पालन करायला हवं. जर बाळाला जवळ घेणं शक्य नसेल अथवा जमत नसेल तर बाळासाठी आईचं दूध काढूनही देता येऊ शकतं. पण धोका टाळण्यासाठी आईचं दूध बाळासाठी फार महत्त्वाचं असल्याची माहिती डॉ.लवलीना यांनी दिली.

गर्भावस्थेदरम्यान लस घ्यावी का?
डॉ. शेली म्हणतात, “अजूनपर्यंत तरी गर्भवतींना लस घेण्याचा सल्ला दिला जात नाही”.
यावर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा.