करोना संदर्भातील निर्बंध उठवल्यानंतर जनतेचे दैनंदिन आयुष्य रुळावर आले आहे. अनेकांकडून तर मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या करोना नियमावलीचे पालनसुद्धा करण्यात येत नाही. समाजातून करोना संपला, असा समज नागरिकांचा झालेला दिसत आहे. मात्र, याबाबत शास्त्रज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. करोना संकट आणखी काही काळ जगावर घोंगावू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे. १९१८ सालातील ‘फ्लू’ साथीपेक्षाही करोनाची साथ जास्त काळ टिकू शकते, असा अंदाज शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विश्लेषण: बुद्धिबळ जगज्जेत्या कार्लसनने सिनक्वेफिल्ड स्पर्धेतून तडकाफडकी माघार का घेतली?

करोना साथीवरील लशींच्या बुस्टर डोसमुळे नागरिकांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. अमेरिकेत सध्या BA.4.6 या ओमिक्रॉनच्या नव्या विषाणूने थैमान घातले आहे. आठ टक्के लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे. BA.5. या विषाणूपेक्षाही अत्यंत वेगाने ओमिक्रॉनचा हा नवा विषाणू रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला चढवत आहे. या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शास्त्रज्ञांना भीती आहे.

करोना किती काळ टिकेल?

करोना आपल्यासोबत आयुष्यभर असेल, असे व्हाईट हाऊसचे करोना साथींचे समन्वयक डॉक्टर आशिष झा यांनी म्हटले आहे. या विषाणूचा प्रसार काही विशिष्ट भागांमध्ये सातत्याने होत राहिल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. लशींना अद्ययावत करणे थांबवले, या साथीच्या उपचारांकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात करोना लढ्यात आपण मागे पडू, अशी भीती झा यांनी व्यक्त केली आहे.

करोनामुळे लोकांमध्ये गंभीर आजारांचे निदान होण्याची शक्यता आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून नव्या ओमिक्रॉन विषाणूवर काम करणाऱ्या बुस्टर डोसची निर्मिती केली जात आहे. हा बुस्टर डोस येत्या नोव्हेंबरपर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनच्या नव्या विषाणूची १.३ दशलक्ष लोकांना बाधा होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. या काळात पावणेदोन लाखांवर मृत्यू होण्याची भीतीदेखील वर्तवण्यात आली आहे.

विश्लेषण : नवीन आयफोनला सॅटेलाइट जोडणी? अ‍ॅपलच्या कार्यक्रमात आज आयफोन १४ ची घोषणा

नव्या विषाणूची उत्पत्ती कशी थांबेल?

करोना विषाणूमध्ये काही काळापासून सातत्याने लक्षणीय बदल होत आहेत. मात्र, हे बदल कायम होत राहतील, असे शास्त्रज्ञांना वाटत नाही. “जगातील अनेक लोकांमध्ये प्राथमिक प्रतिकारशक्ती नसते. एक तर त्यांना या विषाणूची बाधा होत नसावी किंवा ते लसीकरणापासून दूर असावेत” असे अमेरिकेच्या रोचेस्टरमधील ‘मायो’ क्लिनिकच्या विषाणूशास्त्र विभागाचे संचालक मॅथ्यू बिन्नीकॅर यांनी म्हटले आहे.

प्रतिकारशक्तीची पातळी लक्षणीयरित्या वाढल्यास संसर्गाचा दर आणि त्यामुळे उदयाला येणाऱ्या नव्या विषाणूंच्या संख्येत घट होईल, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.

विषाणूंचा प्रसार रोखणे आपल्या हातात आहे का?

करोना साथीची लस आणि त्याचा बुस्टर डोस घेतल्यास या विषाणूंचा प्रसार रोखता येऊ शकतो. “करोना विषाणूला रोखण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. यापासून होणाऱ्या मृत्यूंवरदेखील आपण नियंत्रण मिळवू शकतो. करोनाची बाधा झाल्यास सातत्याने उपचार आणि लस घेतल्यास करोनाचा प्रसार थांबू शकतो”, असे मत डॉ. आशिष झा यांनी व्यक्त केले आहे. या लशींमुळे केवळ करोनापासून संरक्षणच होत नाही, तर त्यामुळे प्रतिकारशक्तीदेखील वाढते, असे झा यांनी सांगितले आहे. दरम्यान, मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन शास्त्रज्ञांनी केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona pandemic may lasted longer precautionary meaures should be taken said scientists rvs