देशामध्ये मागील काही आठवड्यांपासून करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. आठवड्याभरापासून देशात रोज नव्याने तीन लाखांहून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचं चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड्स, औषधे आणि करोनासंदर्भातील आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली सारख्या राज्यांनी करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी नाईट कर्फ्यू, कठोर निर्बंध, संचारबंदी यासारखे नियम लागू केलेत. असं असतानाही आरोग्य व्यवस्थांवरील ताण हा प्राकर्षाने जाणवत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून देशभरातील अनेक ठिकाणांहून खासगी आणि सरकारी रुग्णालयांनी राज्य सरकारांना एसओएस मेसेज पाठवून आप्तकालीन परिस्थितीचा इशारा दिल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक खासगी रुग्णालयांनी एसओएस मेसेजच्या माध्यमातून यंत्रणांना ऑक्सिजन अपुरा पडत असल्याचे सांगितल्याच्या बातम्या पाहावयास मिळत आहेत. मात्र हा एसओएस संदेश नेमका असतो तरी काय?, त्याचा अर्थ काय?, तो कधी पाठवतात?, मुळात या शब्दाचा जन्म कसा झाला यासंदर्भात अनेकांना फारशी माहिती नसते. याचसंदर्भात आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
नक्की वाचा >> समजून घ्या : महाराष्ट्रात आता करोना रुग्णसंख्या वाढणारा नाही कारण…
एसओएस चा फुलफॉर्म काय आहे?
एसओएसचा फुलफॉर्म सेव्ह अवर शिफ्स, म्हणजेच आमच्या होड्या वाचवा असा आहे. काहीजण याचा फुलफॉर्म सेव्ह अवर सोल्स म्हणजेच आमचा जीव वाचवा असं असल्याचंही सांगतात.
एसओएसचा अर्थ काय?
ज्याप्रमाणे या शब्दाच्या फुलफॉर्मवरुनच हा शब्द नाविक आणि समुद्रामध्ये प्रवास करणाऱ्या जहाजांकडून भरकटल्यानंतर वापरला जायचा हे लक्षात येतं. एसओएस हा मूर्स कोड डिस्ट्रेस सिग्नल नावाओ ओळखला जातो. मूर्स कोड ही जहाजांकडून सांकेतिक भाषेत संदेश आदान प्रदान करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत होती. मूर्स कोडमध्ये तीन डॉट, तीन लाइन्स आणि तीन डॉट (…—…) या संकेताचा अर्थ एसओएस असा व्हायचा. अनेक परदेशी चित्रपटांमध्ये (उदाहरणार्थ टायटॅनिक चित्रपट) एका मशीनवर पटापट बटणं दाबून जाहाजाचा कप्तान मदत मागवताना दिसतो. ही मगत याच मूर्स कोडच्या मदतीने म्हणजेच एसओएसचा संदेश पाठवून मागवली जायची.
नक्की वाचा >> समजून घ्या : प्राणवायू म्हणून ओळखला जाणारा ‘मेडिकल ऑक्सिजन’ घातक कसा ठरु शकतो?
एसओएसचा जन्म कसा झाला?
२० व्या शकतामध्ये वायलेस तंत्रज्ञान वापरण्यात आलेल्या रेडिओटेलीग्राफीचा जाहांजावर वापर केला जाऊ लागला. एखाद्या दुसऱ्या जहाजाने हल्ला केला, वादळ आलं किंवा अन्य काही संकट आलं तर या माध्यमातून कोड्सच्या मदतीने अशीच यंत्रणा वापरणाऱ्या समुद्रातील आजूबाजूच्या पण नजरेच्या पल्यात नसणाऱ्या जहाजांकडून मदत मागितली जायची. सुरुवातीला यासाठी वेगवेगळ्या देशांनी आणि संस्थांनी वेगवेगळे कोड्स ठेवले होते. सांगायचं झाल्यास अमेरिकन नौदल एनसी हा कोड वापरुन जहाज संकटात असल्याचं सांगयाचे. वेगवेगळ्या जहाजांवर टेलीग्राफ आणि ही वायलेस यंत्रणा पुरवणाऱ्य मार्कोनी कंपनीकडून सीक्यूडी हा कोड वापरला जायचा. सर्वात आधी जर्मनीमधील ‘जर्मन रेग्युलेशन ऑफ कंट्रोल स्पार्ट टेलिग्राफी’ या संस्थेने जर्मन जहाजांना आताचा सांकेतिक एसओएस कोड म्हणजेच (…—…) वापरण्यास सांगितलं.
(फोटो : विकिपिडियावरुन साभार)
नक्की वाचा >> समजून घ्या : लसी वाया जातात म्हणजे नेमकं काय होतं?
जगभरातील देशांनी दिली मान्यता
एकाच वेळी जगभरामध्ये आपत्कालीन संदेश पाठवण्यासाठी अनेक कोड्स वापरले जात असल्याने गोंधळ निर्माण होऊ लागला. सांकेतिक भाषेमध्येही नियम आणि कोड्सची अढचण निर्माण होऊ लागली. त्यामुळे सर्व देशांनी एकत्र येत एक समान कोड वापरण्याचा निर्णय़ घेतला १९०६ साली बर्लिनमधील आंतरराष्ट्रीय व्हायरलेस टेलिग्राम कनव्हेंशन जागतिक स्तरावर एकच कोड ठेवण्यासंदर्भातील चर्चा झाली. यावेळी मार्कोनी कंपनीचा इटलीने आधीच्या बैठकीमध्ये सुचवलेला “-.-.–.–..”, आणि “………-..-..-..” हा म्हणजेच ट्रीपल एस ट्रीपल डी हा कोड लांबलचक असल्याने नाकारण्यात आला. मात्र जर्मनीचा “…—…” हा कोड पाठवण्यास सोपा आणि लवकर समजणारा असल्याचे मत जवळजवळ सर्वच देशांनी व्यक्त केलं. त्यामुळे हा कोडच जागतिक स्तरावर आपत्कालीन मदत मागण्यासाठीचा एसओएस कोड म्हणून मान्यता प्राप्त कोड म्हणून सर्व देशांनी स्वीकारला. १ जुलै १०९८ पासून ही पद्धत वापरण्यास सुरुवात झाली.
(फोटो : यूट्यूबवरुन साभार)
पहिल्यांदा कधी पाठवण्यात आला?, टायटॅनिकशी संबंध काय?
उत्तर कॅलिफॉर्नियाजवळच्या केप हॅथरसजवळ एसएस अॅरफ्रॉन या जहाजाचा अपघात झाल्यानंतर ऑगस्ट १९०९ साली पहिला एसओएस कोड पाठवण्यात आला. जगभरामध्ये एसओएसला मान्यता मिळाली तरी मार्कोनी कंपनी जिथे सेवा पुरवायची तिथे त्यांनी सीक्यूडी कोडलाच प्राधान्य दिलं. टायटॅनिकच्या बोर्डवरही मार्कोनीची सिस्टीम असल्याने आणि जहाज बर्फात आडकल्यानंतर सीक्यूडी कोड पाठवण्यात आलेला. त्यानंतर बऱ्याच वेळाने एसओएस कोड पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येतं.
सध्या कसा होतो वापर?
सध्या एसओएस तंत्रज्ञानाचा जीपीएस आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानामुळे जहाजांमध्ये फारसा वापर होत नाही. मात्र आता एसओएस टी टर्म आपत्कालीन संदेश या शब्दाला समानार्थ म्हणून वापरली जाते. अगदी कॉर्परेट जगतामध्ये कंपनीला होणाऱ्या आर्थिक नुकसानानंतर वित्तपुरवठादारांना पाठवलेल्या मेसेजपासून ते आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या रुग्णालयांकडून सध्या पाठवल्या जाणाऱ्या मेसेजेसला एसओएस असं म्हणतात. अर्थात प्रत्येक परिस्थितीनुसार कंपन्या, रुग्णालये आणि हे असे आपत्कालीन मेसेज पाठवणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्यांच्या संदेशामधील मजकूर आणि साचा वेगळा असला तरी अडचणीच्या काळात असा मदतीचा मेसेज पाठवला आणि मदत तातडीने हवी असेल तर अशा संदेशांना एसओएसच म्हटलं जातं.