वेश्या व्यवसाय हा जगातला सगळ्यात जुना आणि खोट्या चलनी नोटा, नाणी हा जगातला सगळ्यात दूसरा जुना व्यवसाय आहे. नुकतंच प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ या वेबसीरिजमधून याच दुसऱ्या क्रमांकाच्या व्यवसायावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘काउंटरफिट करन्सी’ ही संपूर्ण जगाच्या अर्थकारणाला लागलेली खूप मोठी कीड आहे जीचं अस्तित्त्व कायमचं मिटवण हे कोणालाच जमलेलं नाही. या वेबसीरिजच्या माध्यमातून एकंदरच या खोट्या नोटा कशा बनवल्या जातात आणि त्या देशभरात कशा पोहोचवल्या जातात, संपूर्ण माफिया लॉबी यासाठी नेमकं कसं काम करते याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खोट्या नोटा जर तुमच्या हातात पडल्या असतील तर तोवर वेळ हातातून निघून गेलेली असते, त्यामुळे या नोटांच्या डिस्ट्रिब्यूशनवरच आळा घालणं हे अत्यंत गरजेचं आहे. २०१६ मध्ये भारतीय सरकारने नोटाबंदी करत नव्या ५०० आणि २००० च्या नोटा बाजारात आणल्या त्यावेळी या नोटांबद्दल बऱ्याच अफवा पसरवल्या गेल्या होत्या. असं म्हंटलं जातं की जेव्हा पैशांचा किंवा तत्सम साधनांचा शोध लागला तेव्हापासून हा खोट्या चलनाचा व्यवसाय सुरू आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत कुठल्याही यंत्रणेला या खोट्या चलनी नोटांच्या व्यवसायावर अंकुश ठेवता आलेला नाही.

नोटा छापण्याचा इतिहास :

असं म्हंटलं जातं की १९२६ मध्ये ब्रिटिशांनी नाशिकमध्ये एक प्रिंटिंग प्रेसची सुरुवात केली आणि तिथेच भारतासाठी ब्रिटिश लोक नोटा छापायचे. स्वातंत्र्यानंतर १९९९ मध्ये मैसूरमध्ये अंबई २००० साली पश्चिम बंगालच्या सलबोनी परिसरात प्रिंटिंग प्रेस सुरू करण्यात आलं. आजही भारतात नाशिक, सलबोनी, मैसूर आणि मध्यप्रदेश या ४ ठिकाणीच नोटांची छपाई होते. मध्यप्रदेशच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये १०, ५० आणि ५०० रुपयांच्या नोटा छापल्या जातात तर मैसूरमध्ये २००० रुपयांच्या नोटांची छपाई होते. रिसर्व बँकेच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी २००० कोटी चलनी नोटा छापल्या जातात. या नोटा बनवण्यासाठी कापसापासून बनवलेला एक विशेष कागद आणि एक खास शाईचा वापर केला जातो. या नोटांसाठी वापरलेली जाणारी शाई स्वित्झर्लंडमधून आयात केली जाते.

आणखी वाचा : ३ सुवर्णपदक २ रौप्यपदक जिंकून आर माधवनच्या मुलाने केलं महाराष्ट्राचं नाव मोठं; अभिनेत्याने ट्वीट करत केलं अभिनंदन

काही महिन्यांपूर्वी RBI ने जारी केलेल्या रीपोर्टनुसार भारतीय बँकांमध्ये ५.४५ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या नोटा या खोट्या निघाल्या होत्या. यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. २०१९-२० च्या दरम्यान ५०० रुपयांच्या ३०,०५४ नोटा सापडल्या होत्या. २०२०-२१ मध्ये हीच संख्या ३०% ने वाढलेली असल्याचंदेखील समोर आलं होतं. यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की या खोट्या चलनी नोटा छापण्याचं रॅकेट आणि या गुन्हेगारांचे हात किती वरपर्यंत पोहोचले आहेत.

५०० किंवा २००० च्या खोट्या नोटा कशा ओळखायच्या?

मध्यंतरी RBI ने खोट्या नोटा कशा ओळखायच्या यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. यामुळे नक्कीच सामान्य माणसालाही खोट्या नोटा चटकन ओळखण्यात मदत होऊ शकते आणि फसवणुकीची शक्यता कमी होऊ शकते.
१. महात्मा गांधीजी यांचा फोटो नोटेच्या बरोबर मध्यभागी आहे की नाही ते तपासणे.
२. नोट दुमडून सिक्युरिटी थ्रेडचा हिरवा रंग निळा होतोय की नाही ते बघणे.
३. नव्या नोटांवरील गव्हर्नरची स्वाक्षरी, गॅरंटी क्लोज, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो उजव्या बाजूला आहे की नाही हे तपासणे
४. नोटा छापण्याचं वर्षं तपासणे.
५. स्लोगनसह छापलेला स्वच्छ भारतचा लोगो नीट तपासणे.
६. नोटांवर छापण्यात आलेल्या आकड्यांचा आकार आणि पॅटर्न तपासून पाहणे.

आणखी वाचा : ‘बाहुबली’मधील ‘भल्लालदेव’ अडचणीत; अभिनेता आणि त्याच्या वडिलांवर लागलेत जमीन बळकावण्याचे आरोप

याबरोबरच नव्या ५०० आणि २००० च्या नोटांवर अत्यंत सूक्ष्म अक्षरात आरबीआयचं नाव प्रिंट केलं गेलं आहे जे नोटेवरील गांधीजींच्या कॉलरवर आपल्याला बघायला मिळते. हे तपासण्यासाठी तुम्हाला भिंग किंवा एखादी सूक्ष्मदर्शी दुर्बिणीचा वापर करावा लागतो. भारतातील बहुतांश बँकांमध्ये या नोटा ओळखण्यासाठी एक विशेष यंत्रणा आणि तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे, तरी बाजारात या खोट्या नोटांचा सुळसुळाट काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाही. RBI च्या मे २०२२ च्या वार्षिक अहवालानुसार ५०० रुपयांच्या ७९,६६९ नोटा सापडल्या होत्या.

ही समस्या आपल्याला वाटते तेवढी किरकोळ नाही. या खोट्या नोटांच्या जोरावरच देशात वेगवेगळे गुन्हे घडतात, दहशतवादाचा धोका निर्माण होतो, सामान्य जनतेच्या विश्वासहर्ता लोप पावू शकते, देशाच्या अर्थकारणावर याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे या गोष्टीला लवकरात आळा घालणं गरजेचं आहे, शिवाय आरबीआयने सांगितलेल्या या गोष्टी ध्यानात ठेवून आपणही खोट्या चलनी नोटा सहज ओळखू शकतो.