अनिश पाटील

अमली पदार्थांच्या खरेदीसाठी पैसे मिळावे म्हणून अंधेरीतील दाम्पत्याने पोटच्या दोन मुलांना विकले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेने कारवाई करून १८ बालकांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची माहिती मिळवली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

प्रकरण काय?

अमली पदार्थांच्या व्यसनासाठी पैसे मिळावे, म्हणून पोटच्या दोन मुलांना अंधेरीतील दाम्पत्याने विकले होते. गुन्हे शाखेच्या कक्ष-९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तत्काळ याप्रकरणाचा उलगडा केला. शब्बीर खान, त्याची पत्नी सानिया यांना अमली पदार्थाचे व्यसन एवढे जडले होते की, त्याच्यापासून दूर होता येत नव्हते. अमली पदार्थांसाठी पैसे मिळावे म्हणून त्यांनी दोन वर्षांचा मुलगा हुसेन आणि एक महिना २२ दिवसांच्या मुलीला विकले. शब्बीर आणि सानिया यांनी मे २०२२ मध्ये हुसेनला ६० हजार रुपयांना एका व्यक्तीला विकले. हुसेननंतर त्यांनी गेल्या महिन्यात मुलीलाही आरोपी शकील मकरानी याला १४ हजार रुपयांना विकले होते. याप्रकरणाच्या तपासात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीत १८ मुलांच्या खरेदी-विक्रीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या माहितीच्या आधारे कारवाई करून चार मुलांची सुटका करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान एका कुटुंबाने पाच मुलांची विक्री केल्याचे उघडकीस आले. त्यात आरोपीची बहिणी, मेव्हणी यांच्या मुलांचाही समावेश होता.

आणखी वाचा-विश्लेषण: मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये भाजपकडून ‘बिनचेहऱ्याचे’ मुख्यमंत्री का?

राज्यातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या प्रमाण किती?

देशात अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग (एनसीआरबी) यांच्या आकडेवारीचा विचार केल्यास २०२२ मध्ये महाराष्ट्रात ११ हजार ८५९ मुले बेपत्ता झाली अथवा त्यांचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात ९१६३ मुली व २६९६ मुलांचा समावेश आहे. याच काळात राज्यात सहा वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या अपहरणाप्रकरणी १५२ गुन्हे दाखल झाले होते. त्यात ७९ मुली व ७३ मुलांचा समावेश आहे.

मागील प्रकरणांमध्ये मुलांच्या विक्रीची नेमकी कारणे कोणती?

मुलांच्या विक्रीमागे प्रमुख कारण गरीबी आहे. बहुसंख्य दाम्पत्य पैशांसाठी मुलांची विक्री करत असल्याचे मागील काही प्रकरणांमधून उघड झाले आहे. अपत्य नसलेली दाम्पत्ये अशा मुलांची खरेदी करतात. मुंबईतील एका प्रकरणात तेलंगणा, कर्नाटकपासून अगदी मध्य प्रदेशापर्यंत मुलांची विक्री करण्यात आली होती. परदेशातही मुलांची विक्री झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. मुले विक्री करणाऱ्या टोळ्या गरीब दाम्पत्यांना हेरून त्यांच्या बालकांची बेकायदा विक्री करतात व कमिशन घेतात. याशिवाय विक्री केलेल्या बालकांना भीक मागण्यासाठी, वेश्या व्यवसायासाठीही खरेदी केले जाते. देशातील दुर्गम प्रदेश, गरीब वस्त्या या ठिकाणी असे प्रकार मोठ्या प्रमाणात चालतात. आई-वडिलांचाच अशा प्रकरणांमध्ये सहभाग असल्यामुळे ही प्रकरण उघड करणे कठीण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-विश्लेषण : भारताला विशाल विमानवाहू युद्धनौकेची गरज का आहे?

पोलीस यंत्रणा काय करते?

मुलांच्या खरेदी विक्रीच्या प्रकरणांत कुटुंबातील व्यक्तींचा सहभाग असल्यामुळे अशा प्रकरणांचा उलगडा करणे खूप कठीण काम आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बेपत्ता अल्पवयीन मुलांना शोधण्यासाठी विशेष पथके आहेत. त्यांच्याकडून प्रतिबंधात्मक कारवाईही केली जाते. ‘ऑपरेशन मुस्कान’सारख्या मोहिमाही राबवल्या जातात. पण अनेक प्रकरणांमध्ये तक्रारही करण्यात येत नसल्यामुळे ती पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत. मुंबई पोलिसांकडून ‘ऑपरेशन ऑलआऊट’ अंतर्गत शहरातील संशयीत व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते.

नागरिकांमधील जागरूकता किती महत्त्वाची?

मुलांच्या खरेदी-विक्री प्रकरणांमध्ये पोलिसांसह स्थानिक नागरिक अथवा कुटुंबातील व्यक्तींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. मुंबईत १८ मुलांच्या खरेदी विक्री प्रकरणाची तक्रार एका दाम्पत्याच्या बहिणीनेच दिली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही मोठ्या शिताफीने विविध जिल्ह्यांतून आरोपींना अटक करून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. मुले दत्तक घेण्याचे कायदेशीर मार्गही आहेत. मुलांना परवानगीशिवाय दत्तक घेणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे मुलांची खरेदी केल्यास आपल्यावर गुन्हा दाखल होऊन अटक होऊ शकते. याशिवाय परिसरातील लहान मुलांसह संशयितरित्या वावरणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलिसांना दिल्यास अशा प्रकरणांची उकल करता येऊ शकते.