दररोज सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड व्हायरल होत असतात. ट्रेंड म्हणजेच काय तर एका व्यक्तीने केलेली गोष्ट पुढे अनेक लोक करत जातात आणि तो एक ट्रेंड तयार होतो. असाच काहीसा प्रकार आता नात्यांच्या बाबतीतही घडताना दिसतोय. एखाद्या जोडप्याच्या सहजीवनाची जेव्हा सुरुवात होते, तेव्हा सुरुवातीला नात्यात एक वेगळी गोडी असते. जसजसा हा प्रवास पुढे जातो, तसतसा जोडप्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यात सर्वात आवश्यक बाब असते ती म्हणजे जोडप्याला एकमेकांविषयी असलेली निष्ठा. निष्ठा हा नात्याचा कणा असतो, असे म्हणायला हरकत नाही. जोडीदाराची हीच निष्ठा तपासण्यासाठी लोक आता चक्क पैसे देऊन गुप्तहेराची मदत घेत आहेत.

सवाना हॅरिसन नावाच्या एका महिलेने तिच्या प्रियकराला फसवणूक करताना पकडले. तेव्हा इतर महिलांबरोबर असे काही घडू नये म्हणून तिने ‘लॅझो’ नावाने ओळखली जाणारी ‘लॉयल्टी टेस्ट’ची सेवा पुरवणारी एक कंपनी सुरू केली. सवाना हॅरिसनचे वय केवळ २७ वर्षे आहे. चुकीच्या नातेसंबंधात अडकलेल्या महिलांसाठी हे अत्यंत उपयुक्त असल्याचे सवाना हॅरिसनचे सांगणे आहे. ‘स्काय न्यूज’च्या वृत्तानुसार, स्वतःच्या वाईट अनुभवानंतर हॅरिसनला इतर महिलांची मदत करायची इच्छा होती. हॅरिसन ‘लॉयल्टी टेस्ट’साठी सोशल मीडियाचा वापर करते. तिचे सांगणे आहे की, प्रत्येक महिन्याला तिच्याकडे आपल्या जोडीदाराच्या निष्ठेची चाचणी करण्यासाठी डझनभर लोक येतात. नेमका हा प्रकार काय? याची लोकप्रियता वाढण्याचे कारण काय? त्याविषयी तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घेऊ.

David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
IDBI Bank Recruitment 2024: Registration Underway For 1000 Vacancies; Apply By November 16
युवकांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; आयडीबीआय बँकेत भरती; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
बहुतांश स्त्रियांमध्ये आपल्या जोडीदाराविषयी संशय असतो. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

हेही वाचा : फोर्टिफाइड तांदूळ म्हणजे काय? २०२८ पर्यंत हे तांदूळ मोफत वाटप करण्याचा निर्णय सरकारने का घेतला?

‘लॉयल्टी टेस्ट’

गुप्तहेर महिला/पुरुषाद्वारे हॅरिसन तिच्या संशयास्पद क्लायंटच्या निर्देशांचे पालन करते आणि क्लायंटच्या जोडीदारापर्यंत पोहोचते. तिने उघड केले की, तिच्या क्लायंट बहुतेक स्त्रिया असतात; ज्यांना आपल्या पती किंवा बॉयफ्रेंडवर संशय असतो. जोडीदार मोकळा वेळ कुठे घालवतो याची ती चौकशी करते, नंतर त्याला कुठेतरी पाहिल्याचा दावा करून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते किंवा चुकून त्याला संदेश किंवा छायाचित्र पाठवते. तिने स्काय न्यूजला सांगितले की, समोरच्याने प्रतिसाद द्यावा म्हणून मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. या संपूर्ण चाचणीदरम्यान संवादाचे स्क्रीनशॉट्स ती आपल्या क्लायंटला पाठवत असते. ही निष्ठा चाचणी जवळ जवळ पाच दिवसांची असते. नियुक्त केलेले गुप्तहेर किंवा चेकर्स बरेचदा समोरच्या व्यक्तीला भेटण्याचाही प्रयत्न करतात. हॅरिसन म्हणाली की, अपराधीपणाची भावना माझ्या मनात नाही. “जर तुम्ही एकनिष्ठ राहू शकत नसाल, तर तुम्ही त्या नात्यात राहू नये,” असे तिचे मत आहे. हॅरिसन कॅलिफोर्निया येथे आयलॅश टेक्निशियन म्हणूनही काम करते.

‘लॉयल्टी टेस्ट’साठी किती खर्च येतो?

लॉयल्टी टेस्टची किंमत सामान्यत: ५० डॉलर्स ते ८० डॉलर्स (४,१९८ ते ६,७१७१ रूपये) दरम्यान असते. मात्र, वेगवेगळे गुप्तहेर त्या कामासाठी वेगवेगळे पैसे घेतात. काहींकडून या सेवांसाठी १०० डॉलर्स (८,३९६ रुपये) पेक्षा जास्तचे शुल्क आकारले जाते. ‘लॅझो’कडे सध्या लॉयल्टी चाचण्यांमधून सुमारे तीन हजार डॉलर्स (२.५१ लाख) मासिक कामावणारे पूर्ण वेळ गुप्तहेर आहेत. सवाना हॅरिसन हिचे म्हणणे आहे की, ती हे काम पैशांसाठी करत नसून तिच्यासारख्या मुलींना मदत करण्यासाठी करत आहे. लाझोचे समुदाय व्यवस्थापक ॲश्लिन नाकासू यांनीही समान भावना व्यक्त केली. ते म्हणाले, हा व्यवसाय लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नाही. त्याऐवजी कंपनीचे उद्दिष्ट आहे की, क्लायंटचे नातेसंबंध नीट व्हावेत आणि वाईट नात्यातून त्यांना बाहेर पडता यावे.

लॉयल्टी टेस्ट नातेसंबंधांमध्ये विश्वास निर्माण करण्यापेक्षा अधिक नुकसान करू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

हेही वाचा : ब्रिटनमध्ये केला जात होता ‘नागा मानवी कवटी’चा लिलाव; भारताने केला हस्तक्षेप, नेमके प्रकरण काय?

यावर तज्ज्ञ काय सांगतात?

नातेसंबंधातील एक तज्ज्ञ सांगतात, लॉयल्टी टेस्ट नातेसंबंधांमध्ये विश्वास निर्माण करण्यापेक्षा अधिक नुकसान करू शकतात. “त्यांना नातेसंबंधात असुरक्षित का वाटते, याबद्दल बोलणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे टॅविस्टॉक रिलेशनशिप्सचे सायकोसेक्सुअल थेरपिस्ट मॅरियन ओ’कॉनर यांनी ‘स्काय न्यूज’ला सांगितले. ओ’कॉनर सांगतात की, जोडप्यांनी कोणत्याही समस्या उघडपणे सोडविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अविश्वासाच्या मुद्दयावरही बारकाईने लक्ष देण्याची शिफारस त्या करतात. “तुम्हाला सर्व नातेसंबंधांमध्ये हाच अनुभव आला आहे का? हा विश्वासाचा अभाव लहानपणापासूनच आहे की या विशिष्ट नात्यात आहे?” असे प्रश्न स्वतःला विचारायला हवेत,” असे त्यांचे मत आहे. ओ’कॉनरसारख्या तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, एकमेकांशी प्रामाणिकपणे केलेली संभाषणेच नातेसंबंध मजबूत करतात.