Why Not To Take Pills In Fever: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीची लाट पसरत आहे. नाताळ पर्यंत तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. अगदी मुंबई पुणे अशा शहरी भागातही पहाटे वातावरण खूपच थंड होऊ लागले आहे. अशावेळी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंडीच्या महिन्यात ताप व सर्दीचे प्रमाण वाढते. अशातच आता करोनाच्या परतीची चाहूल लागल्याने अनेकांच्या मनात तापाची भीतीच तयार झाली असेल. ताप येताच सुरुवातीला घरगुती उपाय केले जातात पण मागच्या करोना पासून घरगुती उपाय म्हणजे डोलो, क्रोसीन, विक्स अशा गोळ्या घेण्यापासूनच सुरुवात होते. मात्र असे करणे हे आपल्या आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. याबाबत स्वतः डॉक्टर काय सल्ला देतात जाणून घेउयात..
ताप आल्यावर लगेच औषध घेतल्यास…
डॉ एरिक विल्यम्स, इंटर्नल मेडिसिन, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, लुधियाना यांच्या माहितीनुसार, जर ताप दोन दिवसांपेक्षा अधिक काळ राहिला तर आणि टाच तुम्ही गोळ्या औषधांकडे वळावे. अन्यथा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये. डॉ विल्यम्स पुढे सांगतात की, डेंग्यू, टायफॉइड किंवा मलेरिया यांसारख्या प्रमुख आजारांव्यतिरिक्त तापाची शेकडो कारणे आहेत याची बहुतेक लोकांना माहिती नसते. “कधीकधी, एखाद्या व्यक्तीला दीर्घ प्रवासानंतर ताप येऊ शकतो. हा ताप थकव्यामुळे येतो. परंतु अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीने स्वत:च औषधोपचार करण्याचा पराक्रम करू नये असा सल्ला दिला जातो कारण यामुळे दीर्घकाळापर्यंत शरीराला हानी पोहोचू शकते,”
डॉ मनोज शर्मा, वरिष्ठ सल्लागार, फोर्टिस हॉस्पिटल, नवी दिल्ली यांच्या मते, असे कोणतेही औषध नाही ज्याचे दुष्परिणाम होत नाहीत. “तुम्ही पॅरासिटामॉल जास्त प्रमाणात घेतल्यास यकृतावर त्याचा गंभीर व दूरगामी परिणाम होऊ शकतो. यामुळे शरीराचं अंतर्गत विषबाधा होण्याचा धोका असतो इतकेच नाही तर यकृत पूर्णतः निकामी होऊ शकते.
ताप कमी होण्यासाठी काय करावे?
सौम्य तापाच्या गोळ्या वारंवार घेतल्याने, व्यक्तीचे अवलंबित्व वाढू शकते. ज्याचा परिणाम तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला ताप येण्याच्या अपेक्षेनेच गोळ्या घेण्याची सवय लागली तर साधी दुखणी व किंचित थकवा सुद्धा शरीर सहन करू शकणार आहे. अशावेळी गोळ्या घेण्याच्या ऐवजी आपण आराम करायला हवा व शरीर अधिकाधिक हायड्रेटेड कसे राहील याचा प्रयत्न करायला हवा.
ताप आल्यास रक्तचाचणी कधी करावी?
जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हा डॉक्टर सर्वात आधी घसा आणि फुफ्फुसांची तपासणी करून तापाचे मूळ कारण शोधून काढतात. सहसा मूत्रमार्ग, घसा किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल मार्ग इथूनच संसर्ग सुरु होतो. असे नसल्यास मग अन्य चाचण्या करायला सांगितल्या जातात.
ताप आल्यास औषध कधी घ्यावे?
जर तुमचा ताप १०० अंश फॅरेनहाइटपेक्षा जास्त असेल तर दिवसातून एकदाच पॅरासिटामॉल ५०० घेणे योग्य ठरेल.
हे ही वाचा<< विश्लेषण: पहिल्या हार्ट अटॅकआधी पुरुष व महिलांमध्ये दिसतात वेगवेगळी लक्षणे; वयानुसार कसा ओळखाल धोका?
डॉक्टर विल्यम्स म्हणाले की बहुतेक ताप विषाणूजन्य असतात आणि या प्रकरणांमध्ये अँटीबायोटिक्स मदत करत नाहीत. बॅक्टेरिया कमी होताच तुमची सर्दी आणि ताप अखेरीस सात दिवसांत कमी होईल. अँटीबायोटिक्सच्या माऱ्यामुळे, सामान्यतः, जेव्हा एखादा रुग्ण ओपीडी (बाह्य-रुग्ण विभाग) मध्ये प्रवेश करतो, तेव्हा डॉक्टरांना त्या रुग्णाने अगोदरच घेतलेल्या औषधांमुळे स्थितीचे मूल्यांकन करणे कठीण होते.