जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन या नवीन प्रकाराच्या वाढत्या वेगाच्या पार्श्वभूमीवर लस उत्पादक कंपनी फायझरने इशारा दिला आहे की करोना महामारी २०२४ पर्यंत कायम राहू शकते. गेल्या महिन्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण समोर आल्यानंतर या विषाणूच्या स्वरुपाचा अंदाज आला आहे. हा विषाणूच्या रुपात ५० हून अधिक वेळा बदल झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे संसर्गाविरूद्ध लसीच्या दोन डोसची परिणामकारकता कमी झाली आहे आणि जगभरात वेगाने पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
फायझरचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी, मिकेल डॉलस्टन यांनी गुंतवणूकदारांना सादर केलेल्या सादरीकरणात सांगितले की, कंपनीला अपेक्षा आहे की काही प्रदेशांमध्ये पुढील किंवा दोन वर्षांपर्यंत करोना महामारी कायम राहील. या काळात संसर्ग इतर देशांमध्येही पसरेल. डॉल्स्टीन म्हणाले की कंपनीचा अंदाज आहे की २०२४ पर्यंत जगभरात साथीच्या रोगाचा प्रभाव राहू शकतो. ते म्हणाले की त्याची गती लस आणि उपचारांच्या परिणामकारकतेवर अवलंबून असेल. ते म्हणाले की, कमी लसीकरण झालेल्या भागात लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल.
ओमायक्रॉन प्रकाराच्या आगमनापूर्वी, अमेरिकेचे रोग चिकित्सक अँथनी फौसी यांनी भाकीत केले होते की अमेरिकेतला करोना प्रादुर्भाव २०२२ मध्ये संपेल. पण नव्या प्रकाराचा वेग ज्या प्रकारे वाढत आहे, त्यावरून हा अंदाज खोटा ठरेल, असे वाटते.
फायझरकडे पॅक्सलोविड नावाची प्रायोगिक अँटीव्हायरल गोळी देखील आहे, ज्याने क्लिनिकल चाचण्यांमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि जास्त जोखीम असलेल्या व्यक्तींमधील मृत्यू जवळजवळ ९० टक्क्यांनी कमी केले आहेत.