Norwegian Dawn Ship Quarantine नॉर्वेजियन डॉन या जहाजावरून प्रवास करणारे ३,००० हून अधिक प्रवासी समुद्रात अडकून पडले आहेत. याचे कारण आहे जहाजावर पसरलेला रोग. मॉरिशसने आरोग्यास धोका असल्याचे सांगत, या जहाजाला कोणत्याही बंदरावर थांबण्याची परवानगी नाकारली आहे. नॉर्वेजियन डॉन या जहाजावर संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे संपूर्ण जहाजालाच क्वारंटाईन करण्यात आले आहे. नेमका हा रोग कोणता? जहाजावर हा रोग कसा पसरला? यापूर्वीही अशा काही घटना घडल्या आहेत का? त्याबद्दल जाणून घेऊ.

नॉर्वेजियन डॉन जहाजावर नक्की काय सुरू आहे?

नॉर्वेजियन क्रूझ लाइनच्या नॉर्वेजियन डॉन जहाजाला सध्या मॉरिशसच्या किनाऱ्यावर क्वारंटाईन करण्यात आले आहे. या जहाजावर पोटाचा आजार पसरल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी (२५ फेब्रुवारी) हे जहाज लुईसमधील बंदरावर थांबविण्यात येणार होते; परंतु या जहाजाला बंदरावर थांबण्याची परवानगी नाकारण्यात आली. मॉरिशस बंदर प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले, “आरोग्याशी संबंधित धोके टाळण्यासाठी समुद्रपर्यटनावर असलेल्या या जहाजाला प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” ते पुढे म्हणाले, “प्रवाशांचे, तसेच देशाचे आरोग्य आणि सुरक्षितता अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.” जहाजावर नक्की कोणता आजार आहे? याची पुष्टी अद्याप झालेली नाही. काहींनी हा आजार कॉलरा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मॉरिशसच्या आरोग्य मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांनी जहाजावरील १५ प्रवाशांचे नमुने घेतले आहेत. या नमुन्यांचा निकाल आल्यावरच पुढील निर्णय घेण्यात येईल.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
Most robotic surgeries performed by Tata hospital in shortest time
टाटा रुग्णालयाकडून कमी कालावधीत सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया
नॉर्वेजियन डॉन जहाजाला सध्या मॉरिशसच्या किनाऱ्यावर क्वारंटाईन करण्यात आले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

यापूर्वी यूएस-मुख्यालयातील नॉर्वेजियन क्रूझ लाइनच्या प्रवक्त्याने ‘रॉयटर्स’ला सांगितले होते की, दक्षिण आफ्रिकेला जाणाऱ्या जहाजावरील काही प्रवाशांमध्ये १३ फेब्रुवारीला पोटाशी संबंधित आजाराची सौम्य लक्षणे आढळली होती. विशेष म्हणजे गेल्या शुक्रवारी या जहाजाला गॅस्ट्रोइंटेस्टायनल आजारांमुळे रियुनियन या फ्रेंच बेटावर थांबण्याची परवानगी नाकारण्यात आली. फ्रान्स सरकारने जहाजावरील व्यक्तींच्या आरोग्याची स्थिती लक्षात घेत, हा निर्णय घेतल्याचे, ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने आपल्या बातमीत सांगितले.

जहाजावर रोगाचा उद्रेक कसा?

नॉर्वेजियन डॉन जहाजावर घडलेल्या घटनेसारख्या अनेक घटना यापूर्वीदेखील घडल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वी, क्युनार्ड क्रूझ लाइनच्या हवाई बाउंड क्वीन व्हिक्टोरिया या जहाजावर गॅस्ट्रोइंटेस्टायनल आजार पसरला. या जहाजावर १,८२४ प्रवासी आणि ९६७ क्रू सदस्य होते. हे जहाज २२ जानेवारीला फोर्ट लॉडरडेलला जाण्यासाठी फ्लोरिडा येथून निघाले होते. १२ फेब्रुवारीला जहाज होनोलुलू येथे पोहोचणे अपेक्षित होते. या जहाजावर १५० हून अधिक लोक आजारी असल्याची नोंद करण्यात आली. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेशन (सीडीसी) या आरोग्य संस्थेने सांगितले की, आजार का उद्भवला या कारणांचा शोध सुरू आहे.

यापूर्वी ३ जानेवारीलाही असेच काहीसे घडले. फ्लोरिडाहून निघाल्यानंतर सेलिब्रिटी कॉन्स्टेलेशनच्या सेलिब्रिटी क्रूझ जहाजावरील जवळपास १०० प्रवाशांना नोरोव्हायरसचा संसर्ग झाला होता. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, जहाजावरील २,०५६ प्रवाशांपैकी ९२ प्रवासी आणि आठ क्रू सदस्य या रोगाने ग्रस्त असल्याची नोंद करण्यात आली. उलट्या व जुलाब ही नोरोव्हायरस या आजाराची मुख्य लक्षणे होती. नोरोव्हायरस हा एक अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. या आजारामुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल हा आजार होतो; ज्यात पोट आणि आतड्यांमध्ये जळजळ, उलट्या व अतिसारसारख्या समस्या उदभवतात.

दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ

सीडीसीच्या विश्लेषणानुसार, २०२३ मध्ये जहाजांवर अशा १३ घटना घडल्या. त्यात १९०० हून अधिक लोक आजारी पडले. २०१२ पासून अमेरिकेत या घटनांची संख्या अधिक वाढली होती. जूनमध्ये वायकिंग नेपच्युन जहाजावरही अशी घटना घडल्याची माहिती मिळाली; जेव्हा जहाजावरील ११० प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्सनी उलट्या, जुलाब व पोटात जळजळ होत असल्याची तक्रार नोंदवली. ‘टुडे डॉट कॉम’च्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात सेलिब्रिटी क्रूझ जहाजावरही नोरोव्हायरसचा उद्रेक झाला होता; ज्यात १५० हून अधिक प्रवासी आणि २५ क्रू मेंबर्स आजारी पडले होते.

२०१४ मध्ये रॉयल कॅरेबियनच्या एक्सप्लोरर ऑफ द सीज जहाजावर ५९५ प्रवासी आणि ५० क्रू मेंबर्स अतिसाराने आजारी पडले होते. जहाजावरील रोगाच्या उद्रेकाने जहाजाला लगेच न्यू जर्सीला परत जावे लागले. गेल्या ऑक्टोबर महिन्यात व्हर्जिन वॉयजेस जहाजावर ७० हून अधिक लोक आजारी पडले होते. अनेकांनी पोटदुखी, उलट्या व अतिसार यांच्या तक्रारी केल्या. त्यानंतर तेथील आरोग्य विभागाने हा आजार साल्मोनेला व ई. कोलाय असल्याचे सांगितले.

जहाजावर हे संसर्गजन्य रोग पसरण्यामागचे नेमके कारण काय?

आजार पसरण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे थेट संपर्क. थेट संपर्कातून विषाणू किंवा जीवाणू सहज पसरण्याची दाट शक्यता असते. समुद्रपर्यटनावर जाताना एकाच जहाजावर लोकांची गर्दी होते. डायनिंग हॉल, कॅसिनो, बार, थिएटर या जागांवर लोक एकमेकांच्या संपर्कात येतात. जहाजावर असणारा गजबजाटदेखील संक्रमणास कारणीभूत ठरतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लोक हसतात, ओरडतात किंवा मोठ्याने बोलतात तेव्हा अधिक थेंब आणि एरोसोल (द्रवपदार्थाचा बारिक फवारा) निघते, याद्वारे संक्रमण होते, असे तज्ज्ञ सांगतात.

यूसीएलए येथील डेव्हिड गेफेन स्कूल ऑफ मेडिसिनमधील संसर्गजन्य रोगांच्या विभागातील प्रोफेसर क्लेअर पॅनोसियन यांनी ‘सीएनएन’ला सांगितले, “जेव्हा बंद वातावरणात बरेच लोक असतात. मग ते नर्सिंग होम असो, शाळा असो किंवा जहाज असो; त्यात लोक एकमेकांच्या फार जवळ असतात. अशात विषाणूचा प्रसार हवेद्वारे आणि लोकांनी स्पर्श केलेल्या पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यास सहज होतो. या परिस्थितीत काही प्रवासी जहाजावर चढण्यापूर्वीच आजारी असतात. यामुळे त्यांच्या शरीरातील जंतू पसरुनही जहाजावर रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

जहाजांवर रोगांचा प्रसार होण्याचे आणखी एक कारण म्हणजे बहुतेक लोक जेवणासाठी बुफेचा पर्याय निवडतात. अन्न घेताना एक चमचा अनेक लोकांद्वारे हाताळण्यात येतो. त्यापैकी अनेकांचे हात स्वच्छ नसतात. तसेच साठवलेल्या पाण्यात भांडी धुतली जातात किंवा घाणेरडी भांडी स्वच्छ भांड्यांमध्ये टाकली जातात. जहाजांवर स्वच्छता राखणे फार कठीण असते. त्यामुळे नोरोव्हायरससारखे रोग जहाजांवर सहज पसरतात.

हेही वाचा : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने निवड केलेले चार अंतराळवीर कोण आहेत? ही निवड नेमकी कशी करण्यात आली?

या रोगापासून स्वतःचा बचाव कसा करायचा?

हा रोग जहाजावरच नाही, तर इतर कोणत्याही ठिकाणी पसरू शकतो. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार या रोगापासून स्वतःला सुरक्षित ठेवता येणे शक्य आहे. त्यात स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे. सावधगिरीच्या बाबींमध्ये वारंवार हात धुणे, कोणतीही लक्षणे जाणवल्यास ती न लपवता, त्यावर उपचार घेणे, खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकणे, तोंडाला किंवा नाकाला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुणे आदी गोष्टींचा समावेश आहे. सीडीसीने सांगितले की, जेव्हा प्रवासी जहाजावर काही खातात, तेव्हा ते काय खातात आणि काय पितात याबद्दलही सावध असणे आवश्यक आहे.