क्यूबाचे मार्क्सवादी क्रांतिकारी अर्नेस्टो चे गवेरा यांच्या कन्या एलिडा गवेरा भारतात आल्या आहेत. आपल्या प्रवासा दरम्यान भारतातल्या विविध शहरांमध्ये एलिडा जाणार आहेत. चेन्नईत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. याच पक्षाच्या कार्यक्रमात अमेरिकेच्या आर्थिक प्रतिबंधांमुळे क्यूबाचं कसं नुकसान झालं यावर एलिडा यांनी विस्तृत भाष्य केलं. एलिडा अमेरिकेच्या धोरणांच्या प्रमुख टीकाकारांपैकी एक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एलिडा गवेरा भारताच्या दौऱ्यावर

एलिडा गवेरा या मार्क्सवादी क्रांतिकारी अर्नेस्टो चे गवेरा यांची सर्वात मोठी मुलगी आहे. एलिडा या चे गवेरा यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी आहे. एलिडा गवेरा केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांसह भारतातल्या इतर राज्यांमध्येही जाणार आहेत. याआधी २०१९ मध्ये त्या भारतात आल्या होत्या. क्यूबा क्रांतीला ६० वर्षे झाल्याच्या औचित्याने त्या भारतात आल्या होत्या.

एलिडा गवेरा कोण आहेत?

एलिडा गवेरा या चे गवेरा आणि त्यांची दुसरी पत्नी मार्च यांची मुलगी आहे. त्या डॉक्टर आहेत तसंच मानवी हक्कांसाठी लढण्याचंही काम त्या करतात. एलिडा यांनी लेखक म्हणून आपली एक स्वतंत्र ओळख तयार केली आहे. शावेज, वेनेजुएला अँड द न्यू लॅटिन अमेरिका हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. अमेरिकेतल्या साम्राज्यवादावर त्या कडाडून टीका करत असतात.

२०१९ मध्ये एलिडा आल्या होत्या भारतात

२०१९ मध्ये भारतात एलिडा गवेरा आल्या होत्या. त्यावेळी हे वृत्तही आलं होतं की ६० वर्षांहून अधिक काळ अमेरिकेने क्यूबाच्या देशवासीयांचं आयुष्य खडतर केलं होतं. मात्र क्युबाचे नागरिक घाबरले नाहीत, डगमगले नाहीत. ते एकजूट राहिले आणि लढलेही त्यांची ताकद आहे असं वक्तव्य त्यावेळी एलिडा यांनी केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की मी एक बालरोग तज्ज्ञ आहे. माझ्या रूग्णालयात एकदा एक आठ महिन्यांचा आजारी मुलगा आला. त्याच्यावर उपचार करण्यासाठी मला अमेरिकेहून औषध मागवायचं होतं. आमच्याकडे औषध घेण्यासाठी पैसेही होते. मात्र अमेरिकेने नाकाबंदी लावली होती त्यामुळे आम्ही ते औषध घेऊ शकलो नाही. ते औषध न मिळाल्याने त्या आजारी मुलाचा मृत्यू झाला असं त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या.

भारतातल्या कुठल्या शहरांमध्ये एलिडा जाणार आहेत?


एलिडा गवेरा या त्यांची मुलगी एस्टिफेनिया माचिन गवेरासह आआपल्या देशात आल्या आहेत. या आठवड्यात एलिडा गवेरा दोन दिवस कोलकाता या ठिकाणी जातील. तसंच जादवपूर विद्यापीठ, हुगळी या ठिकाणीही जाणार आहेत.

भारताशी काय आहे एलिडा यांचं नातं?

१९५९ मध्ये क्यूबामध्ये जी क्रांती झाली तेव्हा भारताने त्या देशाला मान्यता दिली होती. यानंतर काही कालावधी लोटल्यावर फिदेल क्रस्त्रो यांनी अर्नेस्टो चे गवेरा यांना आशिया आणि अफ्रिकेतल्या काही देशांमध्ये तीन महिन्यांसाठी पाठवलं होतं. हे असे देश होते ज्यांनी काही वर्षांपूर्वीच स्वातंत्र्य मिळवलं होतं. ग्वेरा यांच्या भारत दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधले राजकीय संबंध प्रस्थापित झाले. दोन्ही देशांनी आपल्या आपल्या देशांमध्ये दुतावास सुरू करण्यासही संमती दिली. आपल्या भारत दौऱ्या दरम्यान चे गवेरा यांनी सामाजिक स्तरावर माणसं जोडण्याचं काम तर केलंच. शिवाच फोटोंच्या एका सीरिजचं दस्तावेजही तयार केले. सेल्फ पोट्रेट बाय द चे गवेरा असं शीर्षक त्याला देण्यात आलं होतं. जे नंतर जतन करण्यात आलं. ही गोष्ट कोलकात्यात झाली होती त्यामुळे एलिडा यांचं भारताशी खास नातं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cuban revolutionary che guevaras daughter aleida in india what is the guevaras connection to india scj