छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा नुकताच  पार पडला. महाराष्ट्रभर, तसेच भारतभर हा ऐतिहासिक राज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा केला, गोव्यातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याच निमित्ताने केलेल्या भाषणात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेले विधान वादग्रस्त ठरले. त्यांच्या या विधानावर गोवा- महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. गोव्यावर १९६१ सालापर्यंत चार शतके राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांवर राज्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील माजी वसाहतवादी राज्यकर्त्यांच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचे आवाहन जनतेला केले. हा ‘कल्चरल जिनोसाइड’चाच प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.  त्याच पार्श्वभूमीवर संस्कृतीतून- इतिहासातून खरोखरच एखाद्या संस्कृतीच्या किंवा समाजाच्या पाऊलखुणा पुसता येतात का? कल्चरल जिनोसाइड म्हणजे नक्की काय? हे समजावून घेणे गरजेचे ठरते. 

कल्चरल जिनोसाइडचा आरोप

गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी केलेल्या या विधानावर रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीचे (आरजीपी) अध्यक्ष मनोज परब यांच्या सह अनेक विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. परब यांनी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा (हिंदू) ध्रुवीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. इतकेच नव्हे तर ‘मुख्यमंत्री पोर्तुगीज राजवटीचे कोणते पैलू ते पुसून टाकू इच्छितात?, मुख्यमंत्र्यांना पोर्तुगीजांचा समान नागरी कायदा (uniform civil code), कोमुनिदादचा कायदा (Code of Comunidades) किंवा पोर्तुगीजांनी राज्यभर बांधलेले कालवे, पायाभूत सुविधा आणि समृद्ध वारसा नष्ट करायचा आहे का? की, त्यांना पोर्तुगीजांच्या नावावर असलेल्या रस्त्यांची नावे बदलायची आहेत? असे प्रश्न परब यांच्याकडून विचारण्यात आले. गोव्यातील प्रत्येक गावात तुम्हाला पोर्तुगीज संस्कृतीच्या काही खुणा पाहायला मिळतात. गोव्यातील समुदायांमधील एकोपा बिघडवण्याचा हा केवळ एक प्रयत्न आहे.” असा आरोपही मनोज परब यांनी केला. याशिवाय काही विरोधकांकडून हा प्रकार ‘कल्चरल जिनोसाइड’ असल्याची टीकाही केली जात आहे. 

village near Dombivli brother of private tution teacher sexually assaulted eight year old girl
डोंबिवलीत खासगी शिकवणी चालिकेच्या भावाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
school students mumbai darshan
मंत्री नरहरी झिरवळ यांचे विद्यार्थ्यांसह मुंबई दर्शन

आणखी वाचा: विश्लेषण: स्वस्तिक: मांगल्य ते रक्तरंजित इतिहास व्हाया अ‍ॅडॉल्फ हिटलर

संस्कृती म्हणजे नेमके काय ?

संस्कृती ही विविधांगी आहे. त्यामुळे एका वाक्यात तिची व्याख्या करणे कठीण आहे. सर्वसाधारण संस्कृतीमध्ये सामाजिक वर्तन, संस्था आणि मानवी समाजात आढळणारे नियम तसेच वेगवेगळ्या सामाजिक गटांमधील ज्ञान, श्रद्धा, कला, कायदे, प्रथा, क्षमता आणि सवयी यांचा समावेश होतो. एखाद्या संस्कृतीचा उगम अनेकदा विशिष्ट प्रदेश किंवा स्थानापासून होतो असे मानले जाते. वेगवेगळ्या क्षेत्रातील अभ्यासकांनी संस्कृती या संकल्पनेची व्याख्या वेगवेगळी दिली आहे. प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ एडवर्ड बर्नेट टायलर यांनी संस्कृतीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. (“Culture or Civilization is that complex whole which includes knowledge belief, art, morals, law, customs and any other capabilities and habits acquired by man as a member of society.”) “संस्कृती ही संपूर्णत: जटील आहे ज्यामध्ये ज्ञान, कला, नैतिकता, कायदा, चालीरीती आणि समाजाचा एक सदस्य म्हणून मनुष्याने आत्मसात केलेल्या इतर सर्व क्षमता आणि सवयींचा समावेश होतो.” तर इरावती कर्वे यांनी नमूद केल्याप्रमाणे ‘‘ मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तूरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी, पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय. एकूणच कोणताही जीव जन्माला आल्यापासून त्याच्या चांगल्या-वाईट क्षमतांचा  विकास ज्या घटकांच्या सानिध्यात होतो. त्या घटकांचा समावेश संस्कृतीमध्ये होतो. ज्या वेळी आपण भारतीय संस्कृती असा उल्लेख करतो त्यावेळी एकूणच भारतातील वेगवेगळ्या भागातील राहणीमान, भाषा, वेशभूषा, संस्कार या सर्वांचाच विचार त्यात अपेक्षित असतो.  इतकेच नव्हे तर सभोवतालच्या निर्जीव घटकांचा दृश्यपरिणाम हा देखील संस्कृतीचाच अविभाज्य भाग समाजाला जातो.

सांस्कृतिक पाऊलखुणा म्हणजे नेमक्या काय?

एखादा समाज किंवा मानवी गट ज्या ठिकाणी राहतो, वावरतो तो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आपल्या अस्तित्त्वाचा पाऊलखुणा मागे सोडत असतो. या खुणा कधी वस्तूच्या तर कधी वास्तूच्या (स्थापत्य- मंदिरे, वाडे इत्यादी ) स्वरूपात असतात, तर कधी त्या समाजाने वापरलेल्या इतर वस्तूंच्या स्वरूपात असतात. किंबहुना त्या मानवी गटाने निर्माण केलेले साहित्य त्या गटाचे प्रतिनिधित्त्व करते. याखेरीज एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या त्या गटाच्या किंवा समाजाच्या चालीरीती, भाषा, पोशाख, खाद्य संस्कृती यांचा समावेश याच पाऊलखुणांमध्ये होतो. या खुणा त्या समाजाविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्याचे काम करतात. ही माहिती आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय इतिहासाविषयी जाणून घेण्यात मदतनीस ठरते. त्यामुळेच इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ, मानववंशकार यांसाठी गत काळातील मानवी संस्कृतीविषयी जाणून घेण्यासाठी या स्वरूपाच्या खुणा गरजेच्या असतात. 

या खुणा पुसून टाकता येतात का?

या सांस्कृतिक खुणांमध्ये स्थापत्यरुपी पुराव्यांचा समावेश होतो. हे स्थापत्य कधी मंदिराच्या स्वरूपात असते तर कधी राजवाडे, महाल, किल्ले अशा अनेक प्रकारात असते. दृश्यस्वरूपात ते नष्ट करणे सोपे असते. किंबहुना इतिहासात तसे झाल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. परंतु अशा स्वरूपाच्या कृत्याने खरंच संस्कृती नष्ट होते का ? याचा विचार करणे गरजेचे आहे. 

काय आहे कल्चरल जिनोसाइड?

कल्चरल जिनोसाइड या संकल्पनेची व्याख्या  सांस्कृतिक (नर) संहार अशी करण्यात येते. परंतु संस्कृतीचा संहार नेमका कोणत्या मार्गाने केला जातो, याविषयीची स्पष्टता कुठेही नाही. हा नरसंहार हिंसक पद्धतीनेच केला गेल्याची उदाहरणे आहेत. कल्चरल जिनोसाइड म्हणजे एखाद्या प्रदेशाची परंपरा, मूल्ये, भाषा आणि इतर घटकांचा पद्धतशीरपणे नाश करणे. वांशिक, धार्मिक, राष्ट्रीय गटाचा नाश करण्याच्या उद्देशाने होणारा विनाश अशीही या संकल्पनेची व्याख्या करण्यात येते. कल्चरल जिनोसाइडच्या अनेक कारणांपैकी धार्मिक हेतूंसाठी केलेला संहार हा प्रमुख मानला जातो. या संकल्पनेअंतर्गत विशिष्ट स्थान किंवा इतिहासातील पुरावे काढून टाकण्यासाठी वांशिक शुद्धीकरणाची मोहीम राबवली जाते. याचाच एक भाग म्हणजे इतिहासाचे पुनर्लेखन, त्याचाही यात समावेश होतो. 

आणखी वाचा : विश्लेषण : World Heritage Day 2023: वातावरणातील बदल खरंच ‘सांस्कृतिक वारसा’ नष्ट करत आहेत का?

गोव्यातील कल्चरल जिनोसाइडचा इतिहास 

गोवा  इन्क्विझिशन हे कल्चरल जिनोसाइडचे उदाहरण मानले जाते. १५६० ते १८१२ या दरम्यानचा गोव्याच्या इतिहासातील सर्वात क्रूर काळ म्हणजे गोवा इन्क्विझिशनचा काळ, असे मानले जाते. ज्या हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास नकार दिला किंवा धर्मांतर करूनही छुप्या पद्धतीने हिंदू धर्माचे आचरण केले त्यांना दोषी ठरवून चर्चकडून शिक्षा देण्यात आली होती. १५१० सालानंतर आफोन्सो द अल्बुकर्क याने गोवा जिंकल्यानंतर या इन्क्विझिशनच्या इतिहासाला सुरूवात झाली. पोर्तुगीजांकडून बळजबरीने धर्मांतरास सुरूवात झाल्यावर, अनेकांना ख्रिस्ती धर्म घेण्यास भाग पाडले, यात हिंदू, मुस्लिम, आणि ज्यूंचा समावेश होता. बळजबरीने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतरही अनेकजण जुन्याच परंपराचे आचरण करत असल्याचे पोर्तुगीजांच्या लक्षात आल्यावर, अशा हिंदूंवर व इतर धर्मियांवर कडक कारवाई करण्याकरिता इन्क्विझिशनची स्थापना करण्यात आली होती. या अंतर्गत मूर्तीपूजा, धार्मिक विधी, पारंपरिक वेशभूषा, स्थानिक भाषा यांवर बंदी घालण्यात आली. भर चौकात जिवंत जाळणे, कोडाचे फटाके देणे, मालकीच्या जमिनी काढून हाकलवून लावणे यांसारख्या अघोरी शिक्षांचा त्यात समावेश होता. या धर्मांतराच्या प्रक्रियेत काही वेळेस हिंदू मुलांना त्यांच्या पालकांपासून दूर नेले जात असे आणि पालकांसमोर जाळले जात होते, पालकांना बांधले जात होते आणि जोपर्यंत ते ख्रिस्ती धर्म स्वीकारत नाही तोपर्यंत मुलांना जिवंत ज्वालेत तसेच ठेवले जात असे. (संदर्भ: सरस्वतीची मुले: मंगलोरियन ख्रिश्चनांचा इतिहास, अ‍ॅलन मचाडो प्रभू, आय .जे.ए. प्रकाशन, १९९९, पृष्ठ १२१)

‘समाजाची सामायिक सांस्कृतिक स्मृती’

मात्र कोणत्याही कल्चरल जिनोसाइडने अशा प्रकारे सांस्कृतिक पाऊलखुणा पुसता येत नाहीत. कारण त्या माणसाच्या डीएनएमध्ये शिरलेल्या असतात, असे आधुनिक मानववंशशास्त्राने सिद्ध केले आहे. त्याला विज्ञानामध्ये ‘समाजाची सामायिक सांस्कृतिक स्मृती’ असे म्हटले जाते. ती पिढ्यानपिढ्या डीएनएमधून पुढच्या पिढीमध्ये उतरते. म्हणूनच प्रसंगी विरोधाभासात्मक वाटतील अशा चालिरिती अनेक समाजामध्ये पाहायला मिळतात. उदा.- ख्रिश्चन लग्नामध्ये हळदी समारंभ. हा समारंभ त्या विशिष्ट घराण्याच्या सामायिक सांस्कृतिक स्मृतीचा भाग असतो आणि तो त्या त्या समाज किंवा घराण्यांकडून नकळत जपलाही जातो. सांस्कृतिक पाऊलखुणांचा समावेश या ‘समाजाची सामायिक सांस्कृतिक स्मृती’मध्ये होतो. त्यामुळे त्या पुसून टाकणे कठीण असते!

Story img Loader