छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा नुकताच पार पडला. महाराष्ट्रभर, तसेच भारतभर हा ऐतिहासिक राज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा केला, गोव्यातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याच निमित्ताने केलेल्या भाषणात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेले विधान वादग्रस्त ठरले. त्यांच्या या विधानावर गोवा- महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. गोव्यावर १९६१ सालापर्यंत चार शतके राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांवर राज्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील माजी वसाहतवादी राज्यकर्त्यांच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचे आवाहन जनतेला केले. हा ‘कल्चरल जिनोसाइड’चाच प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर संस्कृतीतून- इतिहासातून खरोखरच एखाद्या संस्कृतीच्या किंवा समाजाच्या पाऊलखुणा पुसता येतात का? कल्चरल जिनोसाइड म्हणजे नक्की काय? हे समजावून घेणे गरजेचे ठरते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा