Dadasaheb Phalke Award for Mithun Chakraborty: अभिनेता आणि माजी राज्यसभा सदस्य मिथुन चक्रवर्ती यांना २०२४ साठीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ८ ऑक्टोबर २०२४ रोजी होणाऱ्या ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात देण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चक्रवर्ती म्हणाले, ‘इतका मोठा प्रतिष्ठित पुरस्कार मिळणार असल्याचे ऐकून मी नि:शब्द झालो आहे… मला हे कसे व्यक्त करावे हे समजत नाही. मी ना रडू शकतो, ना हसू शकतो. मी हा पुरस्कार माझ्या कुटुंबीयांना आणि जगभरातील चाहत्यांना समर्पित करतो.’ मिथुन चक्रवर्ती यांनी भारतीय सिनेमाक्षेत्रात अनेक भूमिका वठवल्या आहेत, परंतु १९८२ साली आलेल्या ‘डिस्को डान्सर’ या प्रचंड यशस्वी चित्रपटातील त्यांची जिमी या युवकाची भूमिका आजही अजरामर आहे. या चित्रपटाने त्यांना सुपरस्टार केले आणि हा चित्रपट जगभरात १०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला.

डिस्को संस्कृतीचा विकास

‘डिस्को’ हा शब्द फ्रेंच शब्द ‘डिस्कोथेक’चे संक्षिप्त रूप आहे. या शब्दाचा अर्थ म्हणजे एक अशी जागा जिथे लोक एकत्र येऊन पॉप संगीतावर नृत्य करतात. या ‘डिस्को’ संस्कृतीचा उगम १९३० आणि १९४० च्या दशकात..जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर्मनी आणि फ्रान्समधील सार्वजनिक नृत्य पार्टींमध्ये झाला. या पार्टीजमध्ये एक डिस्क जॉकी एका टर्नटेबलचा वापर करून मनोरंजनासाठी रात्रीचे संगीत देण्याचे काम करत असे (डिस्को टाइमलाइन, पोर्शिया के. मॉल्ट्सबी, कार्नेगी हॉल).

Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
rajbhasha kirti puraskar to rajbhasha kirti puraskar
महाबँकेला राजभाषेचा सर्वोच्च ‘कीर्ती पुरस्कार’
Dadasaheb Phalke Award
Dadasaheb Phalke Award : दादासाहेब फाळके पुरस्काराची परंपरा कधी सुरु झाली? काय असतं पुरस्काराचं स्वरुप? कोण कोण आहेत मानकरी?
Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award News in Marathi
Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव
farmers create chaos in krishi awards ceremony
कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात गोंधळ; फेटे उडवून शेतकऱ्यांकडून निषेध
inspirational story of Renowned poet and former IPS officer Keki N Daruwalla
व्यक्तिवेध : केकी दारूवाला
Emmy Award nomination for The Night Manager web series
‘द नाइट मॅनेजर’ वेबमालिकेला एमी पुरस्कारासाठी नामांकन; २५ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये सोहळा

अधिक वाचा: ब्रिटिश व्यक्ती नव्हे तर चंद्रगुप्त मौर्य असेल भारतीय सैन्याचे प्रेरणास्थान; भारतीय सशस्त्र दलात आता बदलाचे वारे!

डिस्को संगीताचे मूळ अनेक संगीत शैलींच्या मिश्रणातून तयार झाले होते. या संगीत शैलींमध्ये प्रामुख्याने आर अँड, फंक, सोल आणि साल्सा यांचा समावेश होतो. ‘हॉट स्टफ: डिस्को अँड द रीमेकिंग ऑफ अमेरिकन कल्चर’ (२००८) या अ‍ॅलिस इकोल्स यांच्या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की, डिस्कोने सर्व प्रकारचे आवाज आणि शैली आत्मसात केल्या, या प्रक्रियेत संगीत कल्पनांचे आंतरराष्ट्रीय आदानप्रदान वेगाने झाले. डिस्को संस्कृती खऱ्या अर्थाने १९६४ साली आकार घेऊ लागली. याचे श्रेय डीजे जिमी सॅविल यांना जाते. त्यांनी स्टेजवर दोन टर्नटेबल्स एकमेकांच्या बाजूला लावून प्रयोग सादर केला. त्यानंतर एका वर्षाने टेरी नोएल यांनी न्यूयॉर्क शहरातील आर्थर क्लबमध्ये सलग दोन रेकॉर्ड्स एकत्र मिसळण्याची कला आणली, त्यापूर्वी रेकॉर्ड्स एकामागून एक गॅप न ठेवता वाजवल्या जात असत. अशा प्रकारे डीजे एका अदृश्य भूमिकेतून पुढे येत डिस्को पार्टींचे मुख्य आकर्षण ठरले, शिवाय ध्वनी-प्रकाशाच्या धुंद करणाऱ्या एकत्रित सादरीकरणाने या संस्कृतीला नवा आयाम देण्याचे काम केले.

डिस्को संस्कृती आणि समानता

१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला न्यूयॉर्क शहरात डिस्को संस्कृती उदयास आली. याच कालखंडात समलैंगिक क्लबची संस्कृतीही निर्माण होत होती. यात मुख्यतः आफ्रो- लॅटिनो समाजातील मंडळी मोठ्या संख्येने सामील होत होती. डिस्कोने LGBTQ+ मंडळींसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले, ज्या ठिकाणी ही मंडळी स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करू शकत होती. त्या काळातील संगीतातून प्रेम, लैंगिकता आणि निषिद्ध विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर या संगीताने कलाकारांना विशेषतः कृष्णवर्णीय महिला गायिकांना मानाचे स्थान दिले. या गायकांना त्या काळातील वर्णद्वेषी अमेरिकेत बाजूला सारले जात होते, डिस्को संस्कृतीमुळे या गायकांना वेगवेगळ्या प्रेक्षकांसमोर सादरीकरणाची संधी मिळाली. यामुळे डॉना समर आणि ग्लोरिया गेयनर यांसारख्या कलाकारांना लोकप्रियता लाभली, या कालखंडात संगीताच्या विश्वात रोलिंग स्टोन्स आणि पिंक फ्लॉइड यांचे वर्चस्व होते. डिस्को संस्कृतीने १९७७ साली रिलीज झालेल्या “Saturday Night Fever” या चित्रपटाने लोकांवर प्रभाव पाडला. या चित्रपटातील जॉन ट्रॅव्होल्टाच्या करिष्माई आणि संवेदनशील नृत्याने डिस्कोचे आकर्षण आणखी वाढले. परंतु ८० चे दशक उजाडते झाले आणि डिस्को संस्कृतीचा प्रभाव कमी झाला. यामागील एक मुख्य कारण म्हणजे डिस्को संस्कृतीच्या माध्यमातून प्रसार झालेल्या भोगवादी जीवन शैलीला होणारा विरोध वाढला होता.

डिस्को डान्सर प्रभाव

१९७० च्या दशकात दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये नाइटक्लब्स सुरु झाले आणि त्यामाध्यमातून भारतात डिस्को संस्कृती स्थिरावू लागली होती. परंतु ही संस्कृती मुख्य प्रवाहाचा भाग मात्र त्या कालखंडात झाली नाही. कारण तोपर्यंत या संस्कृतीला बॉलीवूडने आपलंसं केलं नव्हतं. १९८० साली ‘कुर्बानी’ (१९८०) या चित्रपटातील ‘आप जैसा कोई’ या गाण्याच्या तुफान लोकप्रियतेने या प्रक्रियेला गती मिळाली. हे गाणं १५ वर्षांची पाकिस्तानी गायिका नाझिया हसनने गायले होते आणि बिद्दू अप्पैया हे त्याचे निर्माते होते. या कालखंडात मिथुन चक्रवर्ती यांनी आधीच आपली ओळख एक अभिनेता म्हणून निर्माण केली होती. चक्रवर्ती यांनी मृणाल सेन यांच्या ‘मृगया’ (१९७६) मधून पदार्पण केले होते आणि त्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला होता. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत बॉलिवूडमध्ये प्रामुख्याने ‘अँग्री यंग मॅन’ चा ट्रेण्ड लोकप्रिय होता, अमिताभ बच्चन यांनी हा ट्रे्ण्ड लोकप्रिय केला होता.

अधिक वाचा: Rajmata-Gaumata: प्राचीन भारतीय संस्कृती आणि मिथकं गायींबद्दल काय सांगतात?

मिथुन चक्रवर्ती त्याकाळातील गोऱ्या, उच्चभ्रू नायकांच्या तुलनेत वेगळे ठरले होते. डिसेंबर १९८२ साली प्रदर्शित झालेला डिस्को डान्सर हा चित्रपट बॉलीवूडसाठी “Saturday Night Fever” सारखा क्षण ठरला. एका धडपडणाऱ्या नायकाच्या यशाच्या कहाणीव्यतिरिक्त, या चित्रपटाच्या यशाचे श्रेय बंगाली निर्माता-गायक बप्पी लाहिरींच्या “I am a Disco Dancer” आणि “जिमी आजा” सारख्या गाण्यांना, तसेच चक्रवर्तींच्या अनोख्या नृत्यशैलीला मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडले. यानंतर बॉलिवूडमध्ये डिस्को संगीताविषयी प्रचंड रुची निर्माण केली. १९८० च्या दशकात लाहिरींनी या शैलीबरोबर केलेले प्रयोग हे बॉलिवूडमधील संगीताचे मापदंड ठरले, ज्यात सिंथेसायझर, ड्रम मशीन आणि आकर्षक आवाजांचा वापर करण्यात आला. बॉलीवूड डिस्कोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चमकदार पोशाख, बेल-बॉटम पॅन्ट्स, हेडबॅंड्स आणि चमचमणाऱ्या दिव्यांसह सिंथेसायझरवर आधारित गाणी, या मेळ्यानेच या संगीत शैलीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले.

रशिया आणि Disco Dancer

या चित्रपटाला जगभरात विशेषतः रशियात चांगलाच प्रतिसाद मिळाला. सुधा राजगोपालन यांनी “Leave Disco Dancer Alone: Indian Cinema and Soviet Movie-going after Stalin” या त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, “डिस्को डान्सर (Disco Dancer/Tantsor Disko) सोव्हिएत संघात एक महत्त्वाचा चित्रपट ठरला… डिस्को संगीत आणि उंच, सुदृढ, चपळ नायकाने १९८० च्या दशकात सोव्हिएत युनियनमधील प्रेक्षकांची मने जिंकली…” चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान ताजिकिस्तानमध्ये उसळलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली , त्यात एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. हा चित्रपट सोव्हिएत संघातील सर्वाधिक कमाई करणारा विदेशी चित्रपट ठरला.