अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटागॉन’ची गोपनीय कागदपत्रे (पेंटागॉन पेपर्स) उघड करणाऱ्या डॅनियल एल्सबर्ग यांचे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. १९७० च्या प्रारंभापर्यंत एल्सबर्ग सरकारी-लष्करी सल्लागार होते. त्यांनी अमेरिकी सरकारचे व्हिएतनाम युद्धासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे उघड केल्यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. पुढे याच कारणामुळे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर एल्सबर्ग यांनी उघड केलेल्या कागदपत्रांत नेमके काय होते? ही कागदपत्रे उघड करताना अमेरिकेतील माध्यमांनी काय भूमिका बजावली? या सर्व बाबी जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डॅनियल एल्सबर्ग यांचे सुरुवातीचे आयुष्य

डॅनियल एल्सबर्ग यांचा ७ एप्रिल १९३१ रोजी मिशिगन येथे जन्म झाला. त्यांच्या आईला एल्सबर्ग यांनी पियानिस्ट व्हावे असे वाटायचे. त्यासाठी त्या एल्सबर्ग यांच्याकडून रियाज करवून घ्यायच्या. मात्र एल्सबर्ग यांना यामध्ये रस नव्हता. १९४६ साली एल्सबर्ग यांची आई आणि बहिणीचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर ते संगीतापासून दूर झाले.

हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्यूत्तर पदवी

एल्सबर्ग हे कुशाग्र होते. त्यांनी अर्थशास्त्रात प्रथम वर्गात पदवी संपादन केली. तसेच फेलोशीप मिळवून पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी केंब्रीज येथील किंग्ज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९५३ साली त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्यूत्तर पदवी संपादन केली.

अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटागॉन’येथे नोकरी

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी युनायटेड स्टेट्स मरीन कॉर्प्समध्ये नोकरी केली. पुढे त्यांनी जागतिक धोरणावर अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या रँड (RAND ) या ना नफा न तोडा या तत्वावर काम करणाऱ्या संस्थेत काम केले. पुढे डॉक्टरेट पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटागॉन’ येथे नोकरी केली.

अमेरिकेचा आशियाई देशांत हस्तक्षेप वाढल्यामुळे अमेरिकेने १९६५ साली एल्सबर्ग यांना व्हिएतनाम येथे तेथील शांतता प्रस्थापित करण्याच्या मोहिमेचे मूल्यांकन करण्यासाठी पाठवले. एल्सबर्ग यांनी व्हिएतनाममध्ये साधारण १८ महिने वास्तव्य केले.

युद्धामधील निरर्थकता लक्षात आली

पुढे व्हिएतनाममध्ये असताना एल्सबर्ग यांना युद्धामधील निरर्थकता लक्षात आली. याबाबत त्यांनी २००३ सालच्या आपल्या ‘सिक्रेट्स : अ मेमोयर ऑफ व्हिएतनाम अॅण्ड द पेंटागॉन पेपर्स’ या पुस्तकात याबाबत लिहिलेले आहे. व्हिएतनाममधील युद्धात अमेरिका जिंकणार नाही, असे त्यांना समजले होते. असे रॉयटर्स वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात सांगितले आहे.

३५ जणांनी ७ हजार पानांचा एक अहवाल तयार केला

व्हिएतनामधून परतल्यानंतर १९६७ साली डॅनियल एल्सबर्ग यांच्यासह अन्य ३५ जणांवर पेंटागॉनने महत्त्वाची जबाबदारी सोपवली. त्यांना व्हिएतनाम युद्धाच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर साधारण २ वर्षांनतर डॅनियल एल्सबर्ग यांच्यासह अन्य ३५ जणांनी ७ हजार पानांचा एक अहवाल तयार केला. याच अहवालाला ‘पेंटागॉन पेपर्स’ म्हटले जाते. या अहवालात निघालेल्या निष्कर्षानंतर एल्सबर्ग फार व्यथित झाले होते. व्हिएतनाम युद्धातील सहभागाबद्दल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तेथील जनतेला अंधारात ठेवले. तसेच आपण युद्ध जिंकणार नाहीत, हे माहीत असतानाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ही बाब जनतेपासून लपवून ठेवली, असे या अहवालातून समोर आले होते.

त्यानंतर एल्सबर्ग हे अमेरिकेतील युद्धविरोधी चळवळीला पाठिंबा देऊ लागले. त्यानंतर त्यांनी रँड या संस्थेतही काम करण्यास नकार देत राजीनामा दिला. पुढे एल्सबर्ग यांनी रँड या संस्थेतील सहकारी अँथनी जे रुसो ज्युनियर यांच्याशी संपर्क साधला. या दोघांनीही पेंटागॉन पेपर्सच्या एकूण ४७ खंडाची आणखी एक प्रत छापण्याचा निर्णय घेतला.

पेंटागॉन पेपर्स कसे बाहेर आले?

पेंटागॉन पेपर्स लीक कसे झाले? याबाबत न्यूयॉर्क टाईम्स या अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिकाने अधिक माहिती दिली आहे. एल्सबर्ग यांना मी व्यवस्थेत राहून काम करू शकेल असे वाटले होते. याच कारणामुळे त्यांनी सिनेटचे सदस्य जे विल्यम फुलब्राइट, फॉरेन रिलेशन कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेसमधील इतरांना पेंटागॉन पेपर्सच्या काही पानांच्या प्रती दिल्या. मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे शेवटी एल्सबर्ग यांनी न्यूयॉर्क टाईम्सचे पत्रकार नील शीहान यांच्याशी संपर्क साधला. शीहान आणि एल्सबर्ग यांची व्हिएतनाममध्ये याआधी भेट झालेली होती. मार्च १९७१ मध्ये शीहान यांनी एल्सबर्ग यांच्या वॉशिंग्टन येथील निवासस्थानी एक मुक्काम केला. या वेळी या दोघांमध्ये एक अलिखित करार झाला. मी तुम्हाला पेंटागॉन पेपर्स देतो. न्यूयॉर्क टाईम्सने ही गुप्त माहिती छापण्यास तयारी दाखवल्यास न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने तसेच तुम्ही (शीहान) मला वाचवण्यासाठी तसेच माझे नाव गुप्त ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करायचे, अशी अट एल्सबर्ग यांनी शीहान यांना घातली होती.

मी तुम्हाला या कागदपत्रांच्या प्रती छापू देणार नाही

पुढे शीहान एल्सबर्ग यांची एल्सबर्ग यांच्या मॅसॅच्युसेट्समधील केंब्रीज येथील निवासस्थानी भेट झाली. याच निवासस्थानी ‘पेंटागॉन पेपर्स’ हे गुप्त आणि महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यात आली होती. मात्र सर्वकाही ठरल्याप्रमाणे घडले नाही. शीहान आणि एल्सबर्ग यांच्यात करार झाला होता. मात्र एल्सबर्ग यांनी शीहान यांना पेंटागॉन पेपर्स सुपूर्द करण्यास नकार दिला. त्याऐवजी ‘तुम्ही ही कागदपत्रे वाचू शकता मात्र मी तुम्हाला या कागदपत्रांची नक्कल करू देणार नाही,’ असे एल्सबर्ग यांनी शीहान यांना सांगितले. शीहान यांच्याकडे ही कागदपत्रे गेल्यानंतर टाईम्स या कागदपत्रांचा हवा तसा वापर करेल, अशी भीती एल्सबर्ग यांना होती.

…आणि वृत्त प्रकाशित होण्यास सुरुवात झाली

शीहान यांनी एल्सबर्ग यांची ही अटदेखील मान्य केली. शीहान यांच्यावर विश्वास ठेवून एल्सबर्ग यांनी त्यांच्या घराच्या चाव्या शीहान यांना दिल्या. शीहान यांनी मात्र पेंटागॉन पेपर्स जनतेच्या मालकीचे आहेत, असे समजून या कागदपत्रांच्या कॉपीज काढल्या आणि न्यूयॉर्कला गेले. त्यानंतर न्यूयॉर्क टाईम्सने या गुप्त कागदपत्रांसंदर्भात रिपोर्ट प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली.

कोर्टाने वृत्त प्रकाशित करण्यास मनाई केली

द न्यूयॉर्क टाईम्सचे रिपोर्ट शीहान यांच्या हातात पेंटागॉन पेपर्स आल्यानंतर न्यूयॉर्क टाईम्सने टप्या-टप्याने या पेपर्ससंबंधीचे वृत्त प्रकाशित करण्यास सुरुवात केली. यासंदर्भातील पहिले वृत्त हे १३ जून १९७१ रोजी प्रसिद्ध झाले होते. ही कागदपत्रे सार्वजनिक झाल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सॉन यांनी कोर्टात धाव घेतली. पुढे कोर्टाने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित करण्यास मनाई केली. हा मनाई आदेश येईपर्यंत द न्यूयॉर्क टाईम्सने मात्र या कागदपत्रांसदर्भात तीन लेख प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कृत्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच हे कृत्य हेरगिरी कायद्यानुसार शिक्षेस पात्र आहे, असा देवा केला होता.

बघता बघता १७ वर्तमानपत्रांत वृत्त प्रकाशित होऊ लागले

न्यूयॉर्क टाईम्सने एल्सबर्ग यांच्याकडील कागदपत्रांचा आधार घेत पेंटागॉन पेपर्ससंदर्भात तीन लेख प्रसिद्ध केले होते. पुढे न्यायालयाने अशा प्रकारचे लेख प्रसिद्ध करण्यास न्यूयॉर्क टाईम्सला मनाई केली होती. मात्र तोपर्यंत दुसरीकडे एल्सबर्ग भूमिगत झाले होते. त्यांनी द वॉशिंग्टन पोस्ट यासारख्या दैनिकांना पेंटागॉन पेपर्स पुरवले. पुढे १८ जून पासून वॉशिंग्टन पोस्टने पेंटागॉन पेपर्सचा आधार घेत एक एक उतारा प्रसिद्ध करण्यास सुरूवात केली होती. बघता बघता बॉस्टन ग्लोब, शिकागो सन टाईम्स अशा अनेक वर्तमानपत्रांतून पेंटागॉन पेपर्ससंदर्भातील उतारे प्रकाशित होण्यास सुरूवात झाली. कोर्ट एखाद्या वर्तमानपत्राला पेंटागॉन पेपर्ससंदर्भातील लेख प्रकाशित करण्यास मनाई करेपर्यंत दुसऱ्या वर्तमानपत्रात यासंदर्भातील लेख प्रकाशित होण्यास सुरुवात होई. बघता बघता पेंटागॉन पेपर्ससंदर्भात एकूण १७ वर्तमानपत्रे वेगवेगळे लेख प्रकाशित करत होते.

न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्टने कोर्टात घेतली धाव

लेख प्रकाशित करण्यास मनाई केल्यामुळे न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट या दोन्ही दैनिकांनी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने वर्तमानपत्रांच्या बाजूने निकाल दिला. हा खटला ‘न्यूयॉर्क टाईम्स विरुद्ध अमेरिका’ या नावाने ओळखला जातो. राष्ट्रीय आणीबाणी वगळता वर्तमानपत्रांवर प्रकाशनापूर्वी निर्बंध लादता येणार नाहीत, असे कोर्टाने म्हटले होते.

एल्सबर्ग यांनी पेंटागॉन पेपर्स लीक केल्याचे केले मान्य

दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देण्याच्या बरोबर एका दिवसापूर्वी एल्सबर्ग यांनी पेंटागॉन पेपर्स लीक केल्याचे सार्वजनिकरित्या मान्य केले होते. त्यानंतर एल्सबर्ग यांच्यासह रुसो यांच्यावर हेरगिरी, कट रचणे तसेच इतर गुन्हे केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र कोर्टाने त्यांना १९७३ साली आरोपांतून मुक्त केले.

एल्सबर्ग यांच्यावर पाळत ठेवण्यात आली

पुढे एल्सबर्ग यांना कायदेशीर बाबींमध्ये अडकवण्याचे अनेक प्रयत्न झाले. अमेरिकेतील व्हाईट हाऊस मधील प्लंबर विभागाचे जी गॉरडोन लिड्डी आणि ई हॉवर्ड हंट यांनी एल्सबर्ग यांच्याविरोधातील माहिती गोळा केली होती. एफबीआयनेही एल्सबर्ग यांचे संभाषण टॅप केले होते. यासह पेंटागॉन पेपर्ससंदर्भात खटला सुनावणाऱ्या न्यायाधीशालाही लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असे म्हटले जाते.