ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंत्रिमंडळात फेरबदल केले असून ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची (सोमवार, दि. १३ नोव्हेंबर) गृहमंत्री पदावरुन हकालपट्टी केली. लंडनच्या ‘द टाइम्स’ या वृत्तपत्रात सुएला ब्रेव्हरमन यांनी आपल्याच पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढणारा लेख लिहिला होता. लंडनची पोलिस यंत्रणा पॅलेस्टाईन धार्जिणी आहे, असा आरोप या लेखातून त्यांनी केला होता. या लेखामुळे ब्रिटनचे पंतप्रधान आणि सरकारवर टीका झाल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली आहे. ब्रेव्हरमन यांच्याजागी विद्यमान परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेवर्ली (James Cleverly) यांना गृहमंत्री म्हणून नेमण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना क्लेवर्लीच्या जागी परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पदावर सहा वर्ष ब्रिटनच्या पंतप्रधान भूषविणारे कॅमेरून गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणातून दूर झाले होते. परराष्ट्र मंत्री पद मिळाल्यामुळे त्यांचे राजकीय पुनरागमन झाल्याचे बोलले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा