१७ नोव्हेंबर, लाला लजपत राय यांच्या पुण्यतिथीचा दिवस. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सुप्रसिद्ध लाल- बाल- पाल पैकी लाल म्हणजे लाला लजपत राय, त्यांना प्रेमाने ‘पंजाब केसरी’ म्हणतात. त्यांना स्वदेशी चळवळीतील भूमिकेसाठी आणि शिक्षणाच्या पुरस्कारासाठी स्मरणात ठेवले जाते. सायमन कमिशनच्या विरोधातील रॅलीदरम्यान पोलिसांनी केलेल्या हल्ल्यात १९२८ साली लाहोर येथे या देशभक्ताला वीरमरण आले.
लाला लजपत राय यांचे शिक्षण प्रेम
लाला लजपत राय यांचा जन्म २८ जानेवारी १८७५ साली पंजाबमधील लुधियानाजवळ असलेल्या धुडीके येथे झाला. त्यांचे कायद्याचे शिक्षण लाहोर येथील सरकारी महाविद्यालय झाले, सध्या हे महाविद्यालय जीसीयू, लाहोर म्हणून ओळखले जाते. त्यांनी लाहोर येथे केवळ शिक्षण घेतले एवढेच नव्हे तर याच शहरात कायदेतज्ज्ञ म्हणून सरावही केला. जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, ते आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांचे अनुयायी होते आणि नंतर समाजाच्या नेत्यांपैकी एक झाले. १८८१ साली, वयाच्या १६ व्या वर्षी ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. १८८५ साली राय यांनी लाहोरमध्ये दयानंद अँग्लो-वेदिक विद्यालयाची स्थापना केली आणि ते आयुष्यभर वचनबद्ध शिक्षणतज्ज्ञ राहिले.
लाल- बाल- पाल
१८९३ साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनादरम्यान, राय यांनी आणखी जहाल राष्ट्रभक्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळ गंगाधर टिळक यांची भेट घेतली आणि ते दोघे आजीवन सहकारी राहिले. राय, टिळक आणि बिपिन चंद्र पाल (म्हणूनच त्यांना लाल-बाल-पाल म्हणतात) यांनी लॉर्ड कर्झनने १९०५ मध्ये केलेल्या बंगालच्या वादग्रस्त फाळणीनंतर स्वदेशी वस्तूंच्या वापराचा आणि जनआंदोलनाचा आग्रह धरला.
मंडाले येथे हद्दपार
१९०७ साली पंजाबमधील निदर्शनात भाग घेतल्यानंतर, वसाहतिक अधिकार्यांनी राय यांना कोणत्याही खटल्याशिवाय म्यानमारमधील मंडाले येथे हद्दपार केले, परंतु पुराव्याअभावी त्यांना त्याच वर्षी परत जाण्याची परवानगी देण्यात आली.
१९१३ साली राय हे जपान, इंग्लंड आणि अमेरिकेत व्याख्यान दौऱ्यासाठी निघाले, परंतु पहिले महायुद्ध संपल्यानंतर त्यांना परदेशात राहण्यास भाग पाडले गेले आणि १९२० सालापर्यंत ते परदेशात राहिले. प्रवासादरम्यान ते अनेक जन समुदायांना भेटले. १९१७ साली न्यूयॉर्क शहरात इंडियन होम रूल लीग ऑफ अमेरिकेची स्थापना केली. परत आल्यावर, १९२० मध्ये कोलकाता येथे झालेल्या विशेष अधिवेशनात राय यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले, ज्यामध्ये महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर १९२१ आणि १९२३ मध्ये त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
अखेरचा श्वास
१९२८ साली भारत सरकार कायदा, १९१९ च्या (मॉन्टेगु-चेम्सफोर्ड सुधारणा) अंमलबजावणीचा अभ्यास करण्यासाठी सायमन कमिशन हा ब्रिटिश-नियुक्त कायदेकर्त्यांचा गट भारतात आला. या ७ जणांच्या गटात एकाही भारतीय सदस्याचा समावेश नव्हता, या वस्तुस्थितीवर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राय हे आयोगाला विरोध करणाऱ्या चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक होते आणि ३० ऑक्टोबर १९२८ रोजी लाहोरमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर राय यांनी स्पष्ट केले, “आज माझ्यावर झालेला प्रहार भारतातील ब्रिटिश राजवटीचा शेवट ठरेल (माझ्या अंगावर पडलेली प्रत्येक काठी ब्रिटीश सरकारच्या शवपेटीवरील खिळ्याप्रमाणे काम करेल). या हल्ल्यातून जखमी झालेल्या राय यांचा काही दिवसांनी १७ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.
अधिक वाचा: ‘भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईत पेटली दंगल, इंग्रजांची झाली होती उपासमार’!
एक सुज्ञ लेखक
राजकारणातील सक्रिय सहभागाव्यतिरिक्त, राय यांनी इंग्रजी आणि उर्दूमध्येही विपुल लेखन केले. ‘आर्य समाज’, ‘यंग इंडिया’, ‘इंग्लंडचे भारतावरील ऋण’, ‘जपानची उत्क्रांती’, ‘इंडियाज विल टू फ्रीडम’, ‘मेसेज ऑफ द भगवद्गीता’, ‘भारताचे राजकीय भविष्य’ , ‘भारतातील राष्ट्रीय शिक्षणाची समस्या’, ‘द डिप्रेस्ड ग्लासेस’, आणि ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ हे प्रवासवर्णन इत्यादींचा समावेश आहे.