गांजा हा अमलीपदार्थ म्हणून ओळखला जातो. तो प्रतिबंधित आहे. याविषयी नागपूर उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय देताना गांजाच्या झाडाला लागलेले केवळ फूलच प्रतिबंधित गांजाच्या व्याख्येत समाविष्ट होते. गांजा वनस्पतीच्या बियांना, पानांना किंवा इतर भागाला ‘एनडीपीएस’ कायद्याच्या (नारकॉटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अॅक्ट १९८५) अंतर्गत गांजा म्हणता येणार नाही, असे मत व्यक्त केले. त्या आधारावर एका आरोपीला जामीनही दिला. या प्रकरणात न्यायालयाने प्रतिबंधित गांजाची व्याख्याच स्पष्ट केली.

गांजाचे झाड कसे असते?

भारतात ‘कॅनॅबिस इंडिका’ नावाचे झाड उगवते, सामान्यतः याला गांजाचे रोप असेही म्हणतात. त्याची उंची ४ ते १० फूट असते. भारतात प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालमध्ये कॅनॅबिस आढळून येते. कॅनॅबिसला तेलुगूमध्ये गांजाई, तमिळमध्ये गांजा व कन्नडमध्ये बांगी असे म्हणतात. ही वनस्पती पडीक जमिनीवरदेखील वाढते. त्यामुळे रस्त्याच्या कडेलाही ही वनस्पती सहज आढळून येते. या वनस्पतीपासून फायबर, तेल व अमलीपदार्थ या तीन गोष्टी मिळतात. या वनस्पतीतून तयार होणाऱ्या तेलाचा वापर वॉर्निश उद्योगांमध्ये जवस तेलाला पर्याय म्हणून केला जातो. साबणाच्या निर्मितीमध्येही याचा वापर केला जातो.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Randeep Surjewala promised Rs 7000 per quintal for soybeans if Maha Vikas Aghadi wins
सत्तेत आल्यास सोयाबीनला ७ हजार रुपये हमीभाव…रणदीप सिंग सुरजेवाला यांची घोषणा…
Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
supreme-court-
Supreme Court on firecracker ban: फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं विधान; धर्माचा उल्लेख करत सरकारला सुनावलं…

वाचा सविस्तर… हुकूमशहा किम जोंग उन सक्रिय; उत्तर कोरिया-दक्षिण कोरिया युद्धाच्या उंबरठ्यावर?

न्यायालयाचा निर्णय काय?

‘एनडीपीएस’ कायदा १९८५ मध्ये प्रतिबंधित गांजाची व्याख्या करण्यात आली आहे. या कायद्याचा दाखला देताना न्यायालयाने सांगितले की, गांजा वनस्पतीचे केवळ फूल प्रतिबंधित आहे. फुलांशिवाय गांजा वनस्पतीचे इतर भाग असतील तर त्याला प्रतिबंधित गांजा म्हणता येणार नाही. या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात गांजाच्या फुलांच्या प्रमाणाबाबत काहीही उल्लेख केला नाही. पोलिसांनी गांजाचे पान, बिया यासह इतर भागांचे एकत्रित वजन केले आणि आरोपीकडून ५० किलो गांजा जप्त झाला असे नमूद केले. नियमानुसार, २० किलोपेक्षा अधिक प्रमाणात गांजा जप्त केल्यावर ते कायद्याच्या चौकटीत येते.

कायदा काय म्हणतो?

१९८५ मध्ये एनडीपीएस कायदा तयार करण्यात आला. यात ड्रग्ज आणि तस्करीसारख्या गुन्ह्यांविरोधात शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यातील अनेक तरतुदी ड्रग्जचे उत्पादन, विक्री, बाळगणे, सेवन, तस्करी अशा कृतींचा समावेश आहे. याला केवळ परवानगीने वैद्यकीय किंवा वैज्ञानिक कारणांसाठी वापर अपवाद ठेवण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्यात गांजाच्या झाडाच्या विविध भागांप्रमाणे त्याला नार्कोटिक ड्रग मानले गेले आहे. यात चरस, गांजा आणि या दोघांचे कोणतेही मिश्रण यांचा समावेश आहे. मात्र, यात गांजाच्या बिया आणि पाने यांचा ड्रग्ज म्हणून समावेश नाही. भांग ही गांजाच्या झाडाच्या पानांपासूनच तयार केली जाते आणि त्याचा एनडीपीएस कायद्यात समावेशच नाही. या कायद्यानुसार विशेष तरतूद म्हणून सरकार गांजाच्या लागवडीला आणि उत्पादनाला सशर्त परवानगी देऊ शकते. या गांजाच्या शेतीतून केवळ पाने आणि बियांचेच उत्पादन घेता येते.

हे ही वाचा… भारत-कॅनडा बिघडलेल्या संबंधांमुळे तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांचे काय होणार?

कधी गुन्हा ठरतो?

एनडीपीएस कायद्याच्या कलम २० प्रमाणे गांजाचे उत्पादन, विक्री, खरेदी, निर्यात, आंतरराज्यीय व्यापार या सर्व कृती शिक्षापात्र गुन्हे ठरतात. किती गांजा सापडतो यानुसार या गुन्ह्यांची शिक्षा ठरते. १०० ग्रॅम चरस किंवा १ किलो गांजा सापडला तर त्यासाठी १ वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि १० हजार रुपयांपर्यंतचा आर्थिक दंड होऊ शकतो. आरोपीकडून १ किलो चरस किंवा २० किलो गांजा अशा व्यावसायिक मात्रेत ड्रग्ज सापडले तर दोषीला १० वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. हा तुरुंगवास २० वर्षांपर्यंत वाढूही शकतो. याशिवाय १-२ लाख रुपये आर्थिक दंडही भरावा लागू शकतो.

बंदी असतानाही काही धार्मिकस्थळी सेवन?

उत्तर कर्नाटकातील काही मंदिरांमध्ये गांजा प्रसाद म्हणून दिला जातो. शरणा, अरुदा, शपथा आणि अवधुता या संप्रदायामध्ये भाविक गांजाचे सेवन करतात. त्यांच्या मते असे करणे म्हणजे ज्ञानप्राप्ती असते. उत्तर कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात टिनथिनी येथे असलेल्या मौनेश्वर मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने जानेवारी महिन्यात वार्षिक संमेलनला भाविक येतात. ते प्रसाद म्हणून गांजा सेवन करतात. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्येही हा प्रकार बघायला मिळतो.