भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात भारतातील कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे देशभरातील कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भारतातील कुस्तीगिरांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले असून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. न्यायालयाने कुस्तीगिरांची याचिका दाखल करून घेतली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी घेतली जात आहे. हे प्रकरण दाखल करून घेताना ब्रिजभूषण यांच्याविरोधातील आरोप गंभीर असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ब्रिजभूषण शरण सिंह कोण आहेत? त्यांच्यावर काय आरोप आहेत? त्यांचे कुस्ती खेळ आणि या खेळाशी संबंधित असलेल्या भारतीय कुस्तीगीर महासंघावर किती वर्चस्व आहे? हे जाणून घेऊ या.

कुस्तीगिरांचा ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून लैंगिक छळ?

भारतीय कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी, अशी मागणी दिल्ली पोलिसांकडे केली होती. मात्र दिल्ली पोलिसांनी या मागणीकडे दुर्लक्ष करीत गुन्हा दाखल केला नाही. परिणामी कुस्तीगिरांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच कुस्ती या खेळात मोलाची कामगिरी केलेल्या विनेश फोगाट, साक्षी मलिक आदी कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीमधील जंतरमंतरवर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले. धरणे आंदोलनाला बसल्यानंतर कुस्तीगिरांच्या बाजूने विनेश फोगाटने भूमिका मांडली आहे. “महिला कुस्तीगिरांचा राष्ट्रीय कॅम्पमध्ये प्रशिक्षक तसेच भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून लैंगिक छळ करण्यात आला आहे,” असे विनेश फोगाट म्हणाली आहे.

mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
Efforts underway to reduce human-wildlife conflict says Vivek Khandekar
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू – खांडेकर
take action against municipal officials for supporting illegal buildings in dombivli demand by ub shiv sena consumer cell chief demand to cm
डोंबिवलीतील बेकायदा इमारतींना आशीर्वाद देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुखाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हेही वाचा >> विश्लेषण : भारतीय कुस्तीगिरांना पुन्हा रस्त्यावर का उतरावे लागले?

…तर मला फासावर द्याव- ब्रिजभूषण सिंह

या वर्षाच्या सुरुवातीला ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तेव्हापासूनच ब्रिजभूषण सिंह हे सर्व आरोप फेटाळत आहेत. “कुस्तीगिरांचे भारतीय कुस्तीगीर महासंघाकडून लैंगिक शोषण झालेले आहे, असा दावा कोणीही करीत नाहीये. हा आरोप फक्त विनेश फोगाट यांच्याकडूनच केला जात आहे. आतापर्यंत कोणी प्रत्यक्ष समोर येऊन माझ्यावर लैंगिक शोषण झालेले आहे, असा आरोप केलेला आहे का? एका जरी कुस्तीगिराने समोर येऊन असा आरोप केल्यास, मी शिक्षा भोगायला तयार आहे. ज्या दिवशी एखादा कुस्तीगीर माझ्यावर आरोप करील, त्याच दिवशी मला फासावर द्यावे,” अशी भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतलेली आहे.

ब्रिजभूषण सिंह कोण आहेत?

ब्रिजभूषण सिंह यांचे उत्तर प्रदेशमध्ये मोठे राजकीय प्रस्थ आहे. ते आतापर्यंत सहा वेळा खासदार राहिलेले आहेत. यामध्ये ते पाच वेळा भाजपा तर २००९ साली समाजवादी पार्टीचे खासदार होते. अगोदर त्यांनी गोंडा आणि बलरामपूर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. सध्या ते कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांचे बंधू प्रतीक भूषण हेदेखील गोंडा सादार विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. ब्रिजभूषण सिंह हे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे नेते आहेत. रामजन्मभूमी आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. तर बाबरी मशीद खटल्यातही त्यांचे नाव होते. २००९ सालच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी तसे नमूद केले होते.

हेही वाचा >> विश्लेषण : नितीशबाबूंचा विरोधी ऐक्यासाठी पुढाकार; देशव्यापी एकास-एक लढतीचे प्रयत्न यशस्वी होतील?

ब्रिजभूषण सिंह यांचे समाजवादी पक्षात मन रमले नाही…

२००९ साली त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही. लवकरच ते भाजपामध्ये परतले. “ब्रिजभूषण सिंह हे समाजवादी विचारांचे नाहीत. तसेच त्यांना समाजवादी विचारधारेतून प्रेरणा मिळालेली नाही. याच कारणामुळे ते भारतीय जनता पार्टीमध्ये परतले,” असे ब्रिजभूषण सिंह यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने सांगितले.

दशकभरापासून कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्षपद

ब्रिजभूषण सिंह यांचे राजकारणात मोठे प्रस्थ असले तरी कुस्ती खेळ त्यांच्यासाठी कायम जिव्हाळ्याचा विषय ठरलेला आहे. भाजपामध्ये त्यांना ‘शक्तिशाली नेता’ म्हटले जाते. ब्रिजभूषण सिंह हे साधारण दशकभरापासून भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या अध्यक्षपदी आहेत. यासह त्यांच्याकडे युनायटेड वर्ल्ड रेस्टलिंग-आशिया संघटनेचे उपाध्यक्षपदही आहे.

हेही वाचा >> मध्य प्रदेशात लग्नाच्या आधी वधूची गर्भधारणा चाचणी का करण्यात आली?

सामना सुरू असताना पंचांना देतात सूचना!

भारतीय कुस्तीगीर महासंघावर ब्रिजभूषण सिंह यांची चांगलीच पकड आहे. या संघटनेतील अंतिम निर्णय ब्रिजभूषण सिंह हेच घेतात असे म्हटले जाते. ब्रिजभूषण सिंह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक अशा सर्वच सामन्यांना उपस्थित राहतात. कुस्तीचा सामना सुरू असताना ते अनेक वेळा मायक्रोफोन घेऊन उभे असतात. मायक्रोफोनच्या मदतीने ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे सामन्याला थांबवतात. विशेष म्हणजे सामना सुरू असताना ते पंचांनादेखील सल्ला आणि सूचना देतात. त्यांनी अनेक वेळा पंचांकडे नियमावली फेकल्याचेही म्हटले जाते.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून सामन्यांवर लक्ष

ब्रिजभूषण सामना सुरू असताना जेव्हा प्रत्यक्ष उपस्थित नसतात तेव्हा आभासी माध्यमातून मैदानात नेमके काय सुरू आहे, यावर ते लक्ष ठेवून असतात. २०२१ साली आग्रा येथे वुमन्स नॅशनल चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. या वेळी त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बातचीत केली होती. या वेळी बोलताना “२०२० साली हिमाचल प्रदेशमध्ये नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मी उपस्थित राहू शकलो नव्हतो. मात्र तेव्हा आम्ही सगळीकडे सीसीटीव्ही लावले होते. या सीसीटीव्हींच्या माध्यमातून स्पर्धेदरम्यान काय सुरू आहे, हे मी दिल्लीत बसून पाहू शकत होतो,” असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले होते.

हेही वाचा >> रशियाचा वॅगनार ग्रुप सुदानमध्ये काय करतोय? पुतिन आपली खासगी फौज आफ्रिकेत का घुसवत आहेत?

माझ्यापेक्षा कोणी शक्तिशाली आहे का?

ब्रिजभूषण सिंह यांचे कुस्ती विश्वात मोठे प्रस्थ आहे. या क्षेत्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सामना सुरू होण्याआधी कुस्तीगीर त्यांचा आशीर्वाद घेतात. एखाद्या अटीतटीच्या सामन्यात कुस्तीगिराला काही आक्षेप असल्यास तो थेट पंचांकडे जाण्याऐवजी ब्रिजभूषण सिंह यांच्याकडे जातो. कुस्ती या खेळावरील आपल्या वर्चस्वावर बोलताना २०२१ च्या एका मुलाखतीत ब्रिजभूषण सिंह यांनी एक विधान केले होते. “सर्वच महिला आणि पुरुष कुस्तीगीर खूप शक्तिशाली असतात. त्यामुळे अशा शक्तिशाली कुस्तीगिरांवर नियंत्रण ठेवायचे असेल, तर अशीच मजूबत आणि शक्तिशाली व्यक्ती हवी. त्यामुळे या क्षेत्रात माझ्यापेक्षा शक्तिशाली कोणी आहे का?” असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले होते.

हेही वाचा >> तामिळनाडूत गुंतवणूक वाढवण्यासाठी कायद्यात सुधारणा, १२ तासांची होणार शिफ्ट; कामगारांविषयीच्या नव्या कायद्याला विरोध का?

ब्रिजभूषण सिंह यांना त्यांच्या कामामध्ये कोणीही दखल घेतलेली सहन होत नाही. भारत सरकारने ‘टॉप्स’ म्हणजे लक्ष्य ऑलिम्पिक मिशन योजनेंतर्गत थेट कुस्तीगिरांशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ब्रिजभूषण सिंह यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यांनी थेट भारत सरकारवर टीका केली होती. सरकार थेट कुस्तीगिरांशी संपर्क साधत असले तरी भारतीय कुस्तीगीर महासंघदेखील याकडे लक्ष ठेवणार आहे, अशी भूमिका तेव्हा ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली होती. पुढे डिसेंबर २०२१ मध्ये केंद्र सरकारच्या मिशन ऑलिम्पिक सेल समितीत ब्रिजभूषण यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली होती. ऑलिम्पिकची तयारी करण्याची जबाबदारी ऑलिम्पिक सेल समितीकडे सोपवण्यात आली होती.

Story img Loader