दिल्ली महानगरपालिका निवडणूक २०२२ मध्ये आम आदमी पार्टीने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. मागील १५ वर्षांपासून येथे भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. भाजपाच्या या अभेद्य सत्ताकेंद्राला सुरुंग लावण्याचं काम आम आदमी पार्टीने केलं. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमत मिळवलं असलं तरी महापौर निवडीवरून दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत.

महापौर निवडीवरून भाजपा आणि ‘आप’च्या नगरसेवकांनी एकमेकांना मारहाणही केली आहे. त्यामुळे दिल्ली महापौर पदाच्या निवडणुकीला इतका महत्त्व का आहे? आणि भाजपा आणि ‘आप’ने ही निवडणूक प्रतिष्ठेची का बनवली आहे? याचा सविस्तर आढावा आपण या लेखातून घेणार आहोत.

shiv sena bjp conflict over regularizing construction built by project victims in navi mumbai and panvel
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर नवी मुंबईत महायुतीतच धुसफुस ?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Arvind Kejriwal latest marathi news
विश्लेषण: केजरीवाल यांच्या घोषणेने भाजपची अडचण? मुदतपूर्व निवडणुकीमागे आत्मविश्वास की जुगार?
Amit Shah on article 370
जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शाह यांचं कलम ३७० बाबत मोठं विधान; म्हणाले…
Extension of time to Ravindra Waikar to clarify his position on Amol Kirtikar petition print politics news
कीर्तिकरांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी वायकर यांना मुदतवाढ
Rajendra Gavit, Palghar Assembly Constituency,
राजेंद्र गावित पालघरसाठी आग्रही
readers feedback on loksatta editorial
लोकमानस: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील अगतिकता
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही

दिल्लीत २०२२ च्या एमसीडी निवडणुकीत आम आदमी पार्टीने २५० पैकी १३४ जागांवर विजय संपादन केला. तर भाजपाला १०४ जागा जिंकता आल्या. महापालिका निवडणुकीत ‘आप’ला बहुमत असलं तरी दिल्लीचा महापौर हा आम आदमी पार्टीचाच होईल, असं नाही. येथे भाजपाचाही महापौर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

दिल्ली महापालिकेत महापौर निवडणूक कशी होते?

दिल्लीत महापौर निवडण्यासाठी मतदार थेट मतदान करत नाहीत. दिल्ली एमसीडीच्या सदस्यांच्या मतदानाद्वारे महापौर निवडून दिला जातो. दिल्ली एमसीडीमध्ये एकूण २५० नगरसेवक आहेत. दिल्ली महानगरपालिका अधिनियम, १९५७च्या नियम ३५ नुसार, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या बैठकीत महापौरांची नियुक्ती केली जाते. नियमानुसार बहुमत असणाऱ्या पक्षाकडून महापौरपदासाठी दावा केला जातो. तसेच विरोधी पक्षाने उमेदवार दिल्यास महापौर पदासाठी निवडणूक घेतली जाते.

हेही वाचा- विश्लेषण : मुंबई महानगरपालिकेत राडा का झाला? बीएमसीमधील पक्ष कार्यालयांचं इतकं महत्त्व का?

विशेष म्हणजे महापौर पदाचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असतो. नियमानुसार पहिल्या वर्षी महापौरपदासाठी महिला उमेदवाराची निवड केली जाते, तर तिसऱ्या वर्षी अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवाराची निवड केली जाते. दिल्ली महापौर पदासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांबरोबच दिल्लीतील १४ आमदार, १० लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांकडूनही मतदान करण्यात येते. मात्र, निवडणुकीत नामनिर्देशित सदस्यांना मतदान करता येत नाही.

महापौर निवडणुकीवरुन आप आणि भाजपामध्ये राजकीय वाद

दिल्ली एमसीडीच्या नगरसेवकांच्या शपथविधी समारंभात भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या सदस्यांमध्ये मोठं राजकीय नाट्य घडलं. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सहा सदस्यांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, तत्पूर्वी सभापतींनी नामनिर्देशित खासदारांना आधी शपथ देण्याचा निर्णय घेतला. यावरून आप आदमी पक्षाने आक्षेप घेत घोषणाबाजी सुरू केली.

हेही वाचा- विश्लेषण: आंग सान सू ची यांना म्यानमार न्यायालयाकडून ३३ वर्षांची शिक्षा, नेमके आरोप काय? कोणत्या प्रकरणात किती शिक्षा?

यानंतर सभागृहात भाजपा आणि ‘आप’च्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाली. यामुळे सभापतींनी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू करण्यापूर्वीच एमसीडी सभागृह तहकूब केले. दरम्यान, दोन्ही पक्षातील सदस्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली. या धक्काबुक्कीत अनेक नगरसेवक जखमी झाल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना सभागृहात पाचारण करावं लागलं.