दिल्लीत एकापाठोपाठ एक अमली पदार्थांची (ड्रग्स) रॅकेट्स उद्ध्वस्त केली जात आहेत. पोलिसांनी २ ऑक्टोबरपासून आतापर्यंत केलेल्या कारवाईत आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या जप्तीचा समावेश आहे. पोलिसांनी या कारवाईत सात हजार कोटी किमतीचे ७५० किलोपेक्षा जास्त कोकेन या कारवाईत जप्त केले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आता शुक्रवारी दिल्लीत अमली पदार्थ जप्तीमध्ये मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने दिल्ली, मुंबई, गुरुग्राम व इतर काही शहरांमध्ये शोध घेतला असल्याचेही अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे आणि सध्या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी जप्तीची इतकी मोठी कारवाई कशी केली? इतक्या मोठ्या प्रमाणात कोकेन आले कुठून? जाणून घेऊ.

पोलिसांनी जप्तीची कारवाई कशी केली?

गुरुवारी पोलिसांनी पश्चिम दिल्लीतील एका भाड्याच्या दुकानातून २,०८० कोटी रुपये किमतीचे २०८ किलोग्राम कोकेन जप्त केले, असे अनेक माध्यमांनी सांगितले. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, तपकिरी कार्डबोर्ड बॉक्समधून या कोकेनची डिलिव्हरी केली जात होती आणि नंतर ते ‘टेस्टी ट्रीट’ पॅकेटमध्ये साठवले जात होते. “एक महिना दुकान बंद होते. ते कोणाचे आहे याची पडताळणी सुरू आहे. कोकेनच्या वितरणासाठी वेगवेगळी गोदामे निवडण्यात आली,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. २ ऑक्टोबर रोजी दक्षिण दिल्लीतील महिपालपूर भागातील एका गोदामातून दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने ५६० किलोग्राम कोकेन आणि ४० किलोग्राम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला; ज्याची किंमत अंदाजे ५,६२० कोटी रुपये आहे. अमली पदार्थांच्या तस्करीमागे दुबईस्थित कार्टेलचा हात असल्याचे सांगितले जात आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
गुरुवारी पोलिसांनी पश्चिम दिल्लीतील एका भाड्याच्या दुकानातून २,०८० कोटी रुपये किमतीचे २०८ किलोग्राम कोकेन जप्त केले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : गुरपतवंत सिंग पन्नूने भारताला दिली बाल्कनायझेशनची धमकी; याचा अर्थ काय?

आतापर्यंत एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिकाऱ्यांना भुलवण्याच्या प्रयत्नात हा गट उच्च तंत्रज्ञानाच्या पद्धती वापरत असल्याचे मानले जाते. ‘एनडीटीव्ही’नुसार, यामध्ये फाटलेल्या नोटांचा वापर करणे समाविष्ट आहे. बॉलीवूड चित्रपटांमध्ये दाखवले जाते; ज्यामध्ये दोन्ही पक्षांकडून ओळख पटवण्यासाठी एकाच नोटेचे वेगवेगळे तुकडे कोड म्हणून वापरले जातात. ‘न्यूज१८’नुसार, पोलिसांनी नुकतेच देश सोडलेले भारतीय वंशाचे ब्रिटन येथील नागरिक सविंदर सिंग आणि दुबईस्थित व्यापारी वीरेंद्र बसोया याच्यासह सहा जणांसाठी लुक-आउट परिपत्रके (एलओसी) जारी केली आहेत. सिंह, तुषार गोयल व जितेंदर गिल याच्या मदतीने बसोया याने सिंडिकेट चालविल्याचा दावा केला जात आहे.

‘एनडीटीव्ही’नुसार, बसोया यांनी गोयल यांना प्रतिखेप तीन कोटी रुपये ऑफर केल्याचा आरोप आहे. ते दुबईतस्थित असल्याचे समजते. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार गोयल आणि गिल यांना अटक करण्यात आली आहे. ‘एनडीटीव्ही’नुसार, ब्रिटनला जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या गिलला पंजाबच्या अमृतसर येथील विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. तुषार गोयल याने महिपालपूरचे गोदाम भाड्याने घेतले होते, जेथे कोकेन सापडले होते. तो अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या रडारवर होता. “ऑगस्टमध्ये गुप्तचर संस्थांनी केंद्र सरकारला माहिती दिली की, मध्य पूर्वेशी संबंध असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेलद्वारे कोकेनची मोठी खेप दिल्लीत वितरित केली जाणार होती. मध्य पूर्व ड्रग कार्टेलचा भाग असलेल्या दुबई-आधारित तस्कराशी गोयलचे संभाव्य संबंध असल्याच्या कारणावरून आम्ही गोयलचा शोध घेतला,” असे एका अधिकाऱ्याने वृत्तपत्राला सांगितले. सूत्रांनी ‘आउटलेट’ला सांगितले की, सिंग गेल्या महिन्यात भारतात आला होता.

आतापर्यंत एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (छायाचित्र-पीटीआय)

सिंग हा कोकेनच्या वितरणाची देखरेख करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आला असल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी ‘न्यूज १८’ला सांगितले की, सिंग याने सुमारे एक महिना दिल्लीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी घालवला. ‘एनडीटीव्ही’नुसार, पोलिसांनी जीपीएसद्वारे आरोपीचा माग काढला. परंतु, २ ऑक्टोबर रोजी सिंडिकेटच्या चार सदस्यांना अटक केल्यानंतर सिंग ब्रिटनला पळून जाण्यात यशस्वी ठरला. “आतापर्यंत आम्ही १२ डझन लोकांविरुद्ध एलओसी जारी केले आहेत, त्यापैकी काही परदेशी नागरिक आहेत. त्यापैकी एक व्यक्तीने पश्चिम दिल्लीच्या रमेश नगरमध्ये २०८ किलो कोकेन लपवून ठेवले होते आणि तो ब्रिटनला पळून गेला,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ‘न्यूज १८’नुसार आणखी १२ लोकांचा तपास पोलीस करीत आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील अखलाक आणि तमिळनाडूतील ए सेफी या कार्टेलच्या दोन सदस्यांना ६ ऑक्टोबर व ८ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली.

अखलाकने कथितरीत्या कोकेन दिल्लीत नेले होते. त्याला सफीने मदत केली होती. “आम्ही ५ ऑक्टोबरला सफीला पकडण्यासाठी दिल्लीतील संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले; पण आदल्या दिवशी तो चेन्नईला फरार झाला. ६ ऑक्टोबर रोजी तमिळनाडूमध्ये छापा टाकण्यात आला आणि त्याला दिल्लीत आणण्यात आले,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने वृत्तपत्राला सांगितले. “सफी तमिळनाडूमध्ये सेकंड हॅण्ड कार डीलर म्हणून काम करतो. तो त्याच्या कार डीलरशिप व्यवसायातून ड्रग्ज व्यवसायाच्या संपर्कात आला. अखलाक हा भाजीपाल्याची घाऊक विक्री करायचा आणि दलालीची छोटी-मोठी कामे करायचा. सफी आणि अखलाक यांना केवळ ड्रग्ज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची सूचना देण्यात आली होती,” असे पोलीस अधिकारी पुढे म्हणाले.

हेही वाचा : मृत अविवाहित मुलाचे वीर्य पालकांच्या स्वाधीन करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश; नेमके प्रकरण काय?

ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, फेडरल एजन्सीने दिल्लीतील वसंत एन्क्लेव्ह आणि राजौरी गार्डन या भागांत गोयल आणि त्यांच्या पत्नीसह विविध आरोपी आणि संशयितांच्या जागेवर छापे टाकले. दिल्लीतील प्रेम नगर येथील हिमांशु कुमार आणि मुंबईतील नालासोपारा येथील भरत कुमार यांच्या निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली. दिल्लीतील झंडेवालान भागातील तुषार बुक्स पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि ट्युलिप पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, तसेच गुरुग्राममधील एबीएन बिल्डटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या व्यवसायाच्या जागेवरही छापे टाकण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.