मुख्य प्रवाह आणि किफायतशीर वाहन म्हणून पेट्रोलवर चालणाऱ्या कार/एसयूव्हींना बाजारात मागणी आहेच, शिवाय या पसंतीच्या पटावर गेल्या वर्षभरात डिझेलवरील वाहनांच्या वाढत्या मागणीने वाहननिर्मिती कंपन्यांचे चित्त वेधले आहे. डिझेल ‘स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेइकल’ अर्थात ‘एसयूव्ही’ अधिक मूल्यांसहित बाजारात पसंतीस उतरली आहे.

डिझेल वाहन निर्मितीतील आव्हान काय होते?

२०२०मध्ये भारतीय वाहन उद्योगात बीएस-६ नुसार उत्सर्जनाविषयीचे कठोर निकष लागू झाले. तेव्हापासून आजवर वाहननिर्मिती कंपन्यांनी पेट्रोल, मिश्र अर्थात पेट्रोल आणि वीज आणि सीएनजीवर धावणाऱ्या कार एसयूव्हींवर भर दिला. १ एप्रिल २०२३ पासून बीएस-६ पी-२ हा निकष डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांसाठी अधिकच आव्हानात्मक ठरला. कार/एसयूव्हींसाठी लागणारे सुटे भाग तयार करणाऱ्या (ओईएम) कंपन्यांना डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांचा नाद सोडावा लागला. ठराविक नफ्याचे गणित जुळत नसल्याचे कारण या कंपन्यांनी पुढे केले. म्हणजे बीएस-६ पी-२च्या कठोर निकषानुसार तयार करावे लागणारे इंजिन हे सध्याच्या उत्पादन खर्चात निर्माण होणार नाही, असा या कंपन्यांचा होरा होता.

onion export duty issues, onion prices, farmers
विश्लेषण : शेतकरी निराश, ग्राहकही हताश… कांदा खरेदी-विक्रीत मग नक्की कोणाचा फायदा?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Gisele Pelicot
पत्नीवर १० वर्षे ५० हून अधिक लोकांकडून बलात्कार, पती आढळला दोषी; फ्रान्सला हादरवणारे सामूहिक बलात्कार प्रकरण काय?
Virat Kohli and Anushka Sharma Will Leave India and Shift To London Soon Says His Childhood Coach Rajkumar Sharma
Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती
ajit pawar on kalyan society scuffle viral video news
Video: “तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला…”, कल्याण मारहाण प्रकरणी अजित पवारांनी विधानसभेत मांडली भूमिका!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आला तर..”, रहिवाश्यांचा संताप, वैयक्तिक वाद विकोपाला!
China is building world largest artificial island
जगातील सर्वांत मोठ्या विमानतळासाठी ‘हा’ देश समुद्रामध्ये तयार करणार कृत्रिम बेट; याची वैशिष्ट्ये काय?
Assembly elections vidhan sabha Kunbi Maratha Number of Maratha MLA
विधानसभेत मराठा वर्चस्वाला शह; ओबीसींना बळ

हे ही वाचा… विश्लेषण : शेतकरी निराश, ग्राहकही हताश… कांदा खरेदी-विक्रीत मग नक्की कोणाचा फायदा?

डिझेल एसयूव्हींना वाढती पसंतीचे कशामुळे?

पणन संशोधन अर्थात बाजाराच्या स्थितीविषयीच्या माहितीचे सूक्ष्म पातळीवर विश्लेषण करणाऱ्या जेटो डायनॅमिक्स संस्थेच्या मते, पेट्रोल आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांची चलती असतानाही ग्राहकांचा ओढा डिझेलवर धावणाऱ्या एसयूव्हींकडे अधिक राहिला आहे. डिझेल एसयूव्हीच्या मागणीतील वाढीमागचे कारण म्हणजे डिझेलवर धावणाऱ्या इंजिनातील ‘टोर्क’ स्वरूप अर्थात चक्रगती. दमदार चक्रगती क्षमता तितके शक्तिशाली इंजिन, असे हे सूत्र आहे. शिवाय डिझेल ‘एसयूव्ही’ची दणकट बांधणी हे एक प्रमुख कारण आहे. शक्तिशाली इंजिनामुळे इंधनाची बचत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अन्य इंधनावर धावणाऱ्या इंजिनापेक्षा डिझेल वाहनाचे आयुर्मान अधिक असते.

एसयूव्हीचा दमदारपणाच आकर्षण केंद्र का?

सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या १० वाहनांमधील नऊ वाहने ही ‘एसयूव्ही’ आहेत. ही मागणी अत्यावश्यक वाढीत प्रतिबिंबित झाली आहे. म्हणजे डिसेंबर २०२४च्या पूर्वार्धात डिझेलवरील ‘एसयूव्ही’चा भारतीय बाजारातील हिस्सा हा १८ टक्के इतका राहिला आहे. २०२३ मध्ये तो १७.८ टक्के इतका होता. हा वाढीचा दर पाहिल्यास २०२३ मधील डिझेल ‘एसयूव्ही’चा बाजारातील ४८.४ टक्के इतका वाटा २०२४च्या पहिल्या सहामाहीत ५५ टक्क्यांवर गेला. आकड्यांतच सांगायचे झाल्यास २०२३ या संपू्र्ण वर्षात डिझेल वाहनांची विक्री ७ लाख ३८ हजार इतकी होती. ही विक्री २०२४ मध्ये ७ लाख ७४ हजारांवर गेली. अर्थात डिझेल ‘एसयूव्ही’ची लोकप्रियता या वाढीला पूरक ठरली, असे म्हणता येईल. ग्राहकांना स्वतःच्या उत्पादनाकडे खेचून घेण्यासाठी काही कंपन्यांनी कार/एसयूव्हीमधील फीचर्समध्ये वाढ केली. काही कंपन्यांनी कार/एसयूव्हीमधील सुरक्षेकडे अधिक लक्ष केंद्रित केले. तरीही प्रमुख कंपन्यांना २०२४मध्ये वार्षिक आणि मासिक वाहनविक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागले. अशा काळात डिझेल एसयूव्ही खपाची चढण दिलासादायक ठरली आहे. एसयूव्हीचे आकारमान आणि वाहनाचा दमदारपणा या दोन्ही गोष्टींमुळे ग्राहकांचा खरेदीकडे कल ठरला.

हे ही वाचा… जगातील सर्वांत मोठ्या विमानतळासाठी ‘हा’ देश समुद्रामध्ये तयार करणार कृत्रिम बेट; याची वैशिष्ट्ये काय?

डिझेल वाहन मागणीतील घट नाहीच?

२०११ नंतर डिझेल वाहन विक्री वाढीचा कल नोंदवला गेल्याची ही दुसरी वेळ आहे. २०२२ मध्ये डिझेल वाहन विक्रीचा १९ टक्के इतका स्वप्नवत आकडा वाहनउद्योगाला गाठता आला. २०२१मध्ये तो १३ टक्क्यांवर रेंगाळत होता. याचा अर्थ स्वयंचलित वाहनांमधील प्राधान्याचे इंधन म्हणून डिझेलला मागणी आहे, त्यात घट झाली असे म्हणता येणार नाही.

महागडी वाहने डिझेलवरच

प्रीमियम वाहनांमध्ये प्रामुख्याने मध्यम आणि मोठ्या आकाराच्या डिझेल ‘एसयूव्ही’ला ग्राहकांची मोठी पसंती आहे. पेट्रोल, पेट्रोल-वीज आणि पेट्रोल – सीएनजी या मुख्य प्रवाहातील आणि किफायतशीर प्रकारांतील वाहनांना ग्राहकांची मोठी पसंती आहेच, परंतु डिझेलवरील एसयूव्ही हा या क्षितिजावरचा उगवता तारा म्हणावा लागेल. उदाहरण म्हणून महिंद्रा ऑटोचा उल्लेख इथे करता येईल. वर्षभरापूर्वी या कंपनीचे वाहनविक्रीचे योगदान ८१.१ टक्के इतके होते. आज डिझेलवरील वाहनांची विक्री ८३.४ टक्के इतकी आहे.

कंपन्यांसाठीही आकर्षण?

स्कोडा ऑटो व्होक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसारख्या ओईएम, अर्थात अस्सल उपकरण निर्मिती कंपनी पेट्रोल आणि पेट्रोल इलेक्ट्रिक वाहननिर्मितीकडे वळली असताना वर्षाअखेरीस डिझेलवरील वाहननिर्मितीचा विचार करीत आहे. स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पेत्र जानेबा यांनी ब्रँडचा मानस नुकताच बोलून दाखवला. भविष्यात ऑक्टविया, सुपर्ब आणि कोडिॲक या तिन्ही प्रकारांतील कार डिझेल इंजिनच्या असतील. या साऱ्यामध्ये वरील सर्व कारणांचा विचार केला गेला असावा.

Story img Loader