Dhanteras, National Ayurveda Day 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ ऑक्टोबर रोजी जवळपास १२,८५० कोटी रुपयांच्या आरोग्याशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन केले. हा दिवस नववा आयुर्वेद दिन म्हणून साजरा होत असून याच दिवशी धनत्रयोदशीही असते. राष्ट्रीय आयुर्वेद दिन धन्वंतरी जयंतीला साजरा केला जातो, हा दिवस धन्वंतरी देवाचा जन्मदिन मानला जातॊ. त्याच पार्श्वभूमीवर धन्वंतरी देवाचा जन्मदिन आयुर्वेद दिन म्हणून का साजरा केला जातो याचा घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अधिक वाचा: Vasu Baras 2024:धेनुगळ म्हणजे काय?

आयुर्वेद दिन काय आहे?

आयुर्वेद हे प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र आहे, जे सर्वांगीण आरोग्यावर भर देते. केंद्र सरकारने २०१६ साली आयुर्वेद दिन साजरा करण्यास सुरुवात केली. या दिनाद्वारे आयुर्वेदाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणे हा उद्देश होता. धन्वंतरी यांचा जन्मदिन यासाठी निवडला गेला, कारण धन्वंतरी यांना देवांचे वैद्य मानले जाते. त्यांना भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते. आयुर्वेद म्हणजे ‘जीवनाचे ज्ञान’. भारत सरकार २०१६ पासून दरवर्षी धन्वंतरी जयंतीला (धनतेरसला) आयुर्वेद दिन साजरा करत आहे. आयुर्वेदिक तत्त्वे, औषधी वनस्पती आणि जीवनशैली यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारतात आयुर्वेदाच्या ज्ञानाचे श्रेय धन्वंतरी यांना दिले जाते, त्यांना भगवान ब्रह्मांकडून हे ज्ञान प्राप्त झाले होते आणि त्यानंतर ते देवांचे वैद्य झाले. आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने, धन्वंतरी यांच्या योगदानाचा सन्मान केला जातो, आयुर्वेदाच्या मूलभूत तत्त्वांबद्दल, उपचार पद्धतींबद्दल आणि जीवनशैलीबद्दल जागरूकता वाढवण्याचा उद्देश असतो,असे सरकारी माहिती कार्यालयाच्या (PIB) लेखात म्हटले आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) लोगोमध्येही धन्वंतरी यांचे रंगीत चित्र आहे.

२०२४ साठी आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने ‘Ayurveda Innovation for Global Health’ ही संकल्पना निवडण्यात आली आहे. यात महिलांचे आरोग्य, कामाच्या ठिकाणी आरोग्य, शाळेतील आरोग्य कार्यक्रम आणि अन्न नवकल्पना यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.

धन्वंतरी कोण आहेत आणि त्यांचे धनत्रयोदशीला पूजन का केले जाते?

देव आणि असुरांनी समुद्र मंथन केले त्यावेळी धन्वंतरी हे अमृताचा कलश घेऊन ‘समुद्र मंथना’ दरम्यान प्रकट झाल्याचे मानले जाते. पुराकथाकार देवदत्त पटनाईक यांच्या मते, ब्रह्मदेवांनी देवांना अमृतासाठी क्षीरसागराचे मंथन करण्याचा सल्ला दिला. मंथनासाठी मंदार पर्वत कासव राजा अकूपाराच्या पाठीवर ठेवला गेला, आणि वासुकीचा वापर करून मंथन करण्यात आले. धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाल्यानंतर, भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप घेतले आणि असुरांना फसवून देवांना अमृताचे वाटप केले. धन्वंतरी यांचे त्यांच्या प्रकट दिनी उत्तम आरोग्य आणि पोषक जीवनासाठी पूजन केले जाते. “असे मानले जाते की, प्रथम धन्वंतरी समुद्र मंथनाच्या वेळी प्रकट झाले, आणि संध्याकाळी देवी लक्ष्मी प्रकट झाली. लक्ष्मीने प्रकट झाल्यानंतर भगवान विष्णूशी विवाह केला. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी आणि लक्ष्मी या दोघांचेही पूजन केले जाते. उत्तम आरोग्य, समृद्धी आणि शुभ गोष्टींसाठी हे पूजन केले जाते,” असे गुजरातच्या वापी येथील पराशर ज्योतिषालयाचे संचालक डॉ. दीपकभाई ज्योतिषाचार्य यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले.

अधिक वाचा: History of Ikat: इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये भारतीय कापड; काय सांगते इकतची प्राचीन परंपरा? 

धनत्रयोदशीला कुबेराचेही पूजन केले जाते

कोलोरॅडोमधील आळंदी आयुर्वेद गुरुकुलाच्या संकेतस्थळानुसार, धन्वंतरी यांनी एका अवतारात पृथ्वीवर काशीच्या राजा दिवोदास म्हणून जन्म घेतला. या रूपात त्यांनी भगवान ब्रह्मांकडून शिकलेल्या आयुर्वेदाचे ज्ञान काही ऋषींना दिले, ज्यात महान भारतीय शल्यचिकित्सक सुश्रुत यांचाही समावेश होता.