बदलते राहणीमान हे अनेक आजारांचे मूळ बनले आहे. मानवाला वेगवेगळे आजार होण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. मागील काही दिवसांपासून मधुमेहाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुणांपासून वयोवृद्धांनादेखील हा आजार जडत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीयांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण तसेच त्याची कारणे स्पष्ट करणारा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात नेमके काय आहे? हे जाणून घेऊ या…

भारतात एकूण ११ टक्के लोकांना मधुमेह

मागील काही वर्षांपासून देशात मधुमेहाची समस्या वाढत आहे. अनेक डॉक्टर्स, संशोधक याबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत आहेत. मात्र तरीदेखील मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. असे असतानाच ‘द लॅन्सेट डायबेटीज ॲण्ड एन्डोक्रीनॉलॉजी’ या जर्नलमध्ये मधुमेहाची देशातील सद्यःस्थिती दर्शवणारा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येपैकी ११ टक्के लोकांना मधुमेह हा आजार जडलेला आहे. ‘मद्रास डायबेटीज रिसर्च फाऊंडेशन’ (एमडीआरएफ) या संस्थेने ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (आयसीएमआर) या संस्थेच्या मदतीने याबाबतचा अभ्यास केला आहे.

committee has been formed under chairmanship of sub-divisional officer of Daryapur to investigate after Kirit Somaiyas allegations
किरिट सोमय्यांच्‍या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ating eggs with cholesterol
दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो? बॅड कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात होते वाढ? वाचा डॉक्टर काय सांगतात
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?
Image of Indian economy graphics or related visuals
भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता : सरकारचा अंदाज
rabit fever
माणसांमध्ये वेगाने पसरतोय ‘रॅबिट फिव्हर’; काय आहे हा विचित्र आजार? त्याची लक्षणे काय?
Cold increases the risk of heart disease and respiratory problems Pune news
थंडीमुळे हृदयविकारासह श्वसनविकाराच्या धोक्यात वाढ; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…

हेही वाचा >>> विश्लेषण : राज्यातील शासकीय वसतिगृहांची एकूणच अवस्था गंभीर का?

एकूण ५ टप्प्यांत केला अभ्यास

हा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांनी भारतातील लोकांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, लठ्ठपणा, शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण याचा अभ्यास केला. २००८ ते २०२० या सालात एकूण पाच टप्प्यांत हा अभ्यास करण्यात आला. प्रत्येक टप्प्यांत पाच राज्यांमध्ये तर एका टप्प्यात ईशान्येकडील सात राज्यांत संशोधकांनी अभ्यास केला. या अभ्यासकांनी २० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले.

१ लाख १३ हजार लोकांचा केला अभ्यास

चेन्नई येथील ‘मद्रास डायबेटीज रिसर्च फाऊंडेशन’ (एमडीआरएफ) संस्थेतील मधुमेह संशोधनप्रमुख आणि या अभ्यासाचे प्रमुख संशोधक डॉ. व्ही. मोहन यांनी या अभ्यासाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. “याआधी कोणत्याही देशाने अशा प्रकारचा अभ्यास केलेला नाही. सर्व राज्यांना सामावून घेणारा आणि त्यावर अभ्यास करणारा हा पहिलाच उपक्रम आहे. याआधी चीनमध्ये सर्वांत मोठे संशोधन झालेले आहे. हे संशोधन करताना चीनमधील सहा ते सात जागांना भेट देऊन फक्त ४० हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला होता. आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन साधारण १ लाख १३ हजार लोकांचा अभ्यास केला आहे. विशेष म्हणजे साधारण १.४ दशलक्ष लोकांचा समावेश असलेल्या देशातील सर्व राज्यांमधील लोकांवर हा अभ्यास करण्यात आलेला आहे,” असे डॉ. व्ही. मोहन यांनी सांगितले.

हेही वाचा >>> शाळेत ‘अबाया’ परिधान करण्यास मज्जाव केल्याने वाद, जम्मू काश्मीरमध्ये नेमकं काय घडतंय? जाणून घ्या…

या अभ्यासातून काय समोर आले?

या अभ्यासानुसार देशात सध्या १०१ दशलक्ष (१०.१ कोटी) लोकांना मधुमेह आहे. २०१९ साली हाच आकडा ७० दशलक्ष एवढा होता. या अभ्यासानुसार गोव्यामध्ये साधारण २०.६ टक्के लोकांना मधुमेहाचा त्रास असून इतर राज्यांच्या तुलनेत या राज्यात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. गोव्यानंतर पुदुच्चेरीमध्ये २६.३ टक्के, केरळमध्ये २५.५ टक्के लोकांना मधुमेह हा आजार आहे. तामिळनाडू राज्यात १४.४ टक्के लोकांना मधुमेह हा आजार जडलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मधुमेहाचे प्रमाण ४.८ टक्के म्हणजेच सर्वांत कमी आहे. सध्या जरी उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मधुमेहग्रस्तांचे प्रमाण कमी असले तरी आगामी काळात उत्तर प्रदेशसह मध्य प्रदेश, बिहार या राज्यांत मधुमेहाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसे भाकीत या अभ्यासाच्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहे.

मधुमेह हा फक्त श्रीमंत लोकांचाच आजार नाही

‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार शहरी भागात मधुमेहग्रस्तांचे प्रमाण जास्त आहे. शहरात १६.४ टक्के तर ग्रामीण भागात ८.९ टक्के लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. मात्र बीबीसीच्या म्हणण्यानुसार सध्या जरी शहरी भागात मधुमेहींचे प्रमाण जास्त असले तरी ग्रामीण भागातील लोकांनादेखील हा आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा आजार फक्त श्रीमंत लोकांनाच होतो, हा गैरसमज आता दूर होत चालला आहे. “माझ्याकडे अनेक छोट्या गावातील लोकदेखील मधुमेहावरील उपचारासाठी येत आहेत,” असे बॉम्बे हॉस्पिटलचे मधुमेहावर उपचार करणारे राहुल बक्सी यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे अनेक तरुणांनादेखील आता मधुमेह हा आजार जडतो आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. “माझ्याकडे असे काही तरुण रुग्ण आहेत, ज्यांनी त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण सहज म्हणून तपासले होते. मात्र सहज केलेल्या चाचणीमध्ये या तरुणांना त्यांच्या शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे,” असे बक्सी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पोक्सो कायद्यानुसार अश्लीलता आणि लैंगिकता म्हणजे काय? केरळ कोर्टाने दिलेल्या निर्णयाची चर्चा; जाणून घ्या…

मधुमेहाचे रुग्ण वाढण्याचे कारण काय आहे?

आहारविषयक तज्ज्ञ तसेच डॉक्टरांनी मधुमेह आजार जडण्याची अनेक कारणं सांगितली आहेत. “बदलते राहणीमान, शहराकडे होत असलेले स्थलांतर, कामांच्या तासांमधील अनियमितता, एका जागेवर बसून काम करणे, जेवणाच्या सवयीमध्ये बदल, फास्ट फूड अशा काही कारणांमुळे मधुमेहाचे प्रमाण वाढलेय,” असे बक्सी यांनी सांगितले.

प्री- डायबिटीजचे प्रमाणही वाढले?

‘द टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार देशात साधारण १३६ दशलक्ष (१३.६ कोटी) लोकांना मधुमेह – पूर्व स्थिती (प्री-डायबिटीज) आहे. ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार शहरातील साधारण १५.४ टक्के तर ग्रामीण भागातील १५.२ टक्के लोकांना प्री-डायबिटीजची लक्षणे आहेत. हे सरासरी प्रमाण १५.३ टक्के आहे. याबाबत बक्सी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या देशात प्री-डायबिटीजचे प्रमाण बरेच आहे. अनेक वेळा प्री-डायबिटीजचे निदान होण्यास उशीर होतो. त्यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढते, असे बक्सी यांनी सांगितले. मायो क्लिनिकच्या संकेतस्थळानुसार सामान्य व्यक्तीच्या तुलनेत प्री-डायबिटीज असलेल्या व्यक्तीच्या शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे प्री-डायबिटीज असलेल्या रुग्णाला दुसऱ्या क्रमांकाचा मधुमेह (टाइप-२ डायबिटीज) होण्याची शक्यता जास्त असते.

हेही वाचा >>> विश्लेषण : बलात्काराची प्रकरणे का वाढत आहेत? बलात्काराची मानसिकता आणि ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय ? 

प्री-डायबिटीजबद्दल डॉ. व्ही. मोहन यांनी अधिक माहिती दिली आहे. “प्री-डायबिटीज असलेल्या प्रत्येकालाच मधुमेह होत नाही. मात्र भारत आणि दक्षिण आशियामध्ये प्री-डायबिटीजमुळे मधुमेह होण्याचे प्रमाणही बरेच आहे. प्री-डायबिटीज असलेल्या साधारण एकतृतीयांश लोकांना मधुमेह होण्याची शक्यता असते. एकतृतीयांश लोकांमध्ये प्री-डायबिटीज स्थिती कायम राहू शकते. तर उर्वरित लोकांची योग्य आहार, योग्य जीवनपद्धती, व्यायाम यामुळे प्री-डायबिटीजमधून सुटका होऊ शकते,” असे मोहन यांनी सांगितले.

‘तर औषधांचीही गरज भासणार नाही’

डॉ. मोहन डायबिटीज स्पेशॅलिटी सेंटरच्या प्रमुख डॉ. आर. एम. अंजना यांनी प्री-डायबिटीजविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार “गोवा, केरळ, तामिळनाडू, चंदीगड या राज्यांत मधुमेहाच्या तुलनेत प्री-डायबिटीज असलेल्या लोकांचे प्रमाण कमी आहे. दिल्ली आणि पुदुच्चेरीमध्ये हे प्रमाण जवळजवळ सारखेच आहे. योग्य आहार, व्यायाम, वजन कमी करणे, पुरेशी झोप या बाबींचे पालन केल्यास प्री-डायबिटीजवर मात करता येऊ शकते. या गोष्टींचे पालन केल्यास औषधांचीही गरज पडणार नाही,” असे अंजना यांनी सांगितले.

Story img Loader