गेल्या काही महिन्यांपूर्वी गुजरातमधील सूरत डायमंड बोर्सचं नाव चर्चेत आलं होतं. परंतु सूरत डायमंड बोर्सला अपेक्षेप्रमाणे हिरे व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र निर्माण झालं आहं. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सूरत डायमंड बोर्स(SDB)च्या नव्या व्यवस्थापन मंडळाने सूरतच्या मध्यभागी असलेल्या महिधरपुरा येथील पारंपरिक हिरे व्यापाऱ्यांना खजोद येथून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या सूरत डायमंड बोर्समध्ये स्थलांतरित करण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील भारत डायमंड बोर्सच्या माध्यमातूनच ही मोहीम राबवली जात असून, बाजारातील नव्या व्यावसायिकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे त्यांचे उद्दिष्टआहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गुजरातमधील सूरत डायमंड बोर्स अपेक्षित यश न मिळाल्यानं जगातल्या सगळ्यात मोठ्या कार्यालयाची स्थिती भूत बंगल्यासारखी झाली आहे. त्यामुळेच आता भारत डायमंड बोर्सनं आपली विस्तार योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार आणि सूरतचे प्रमुख हिरे व्यापारी असलेल्या गोविंद ढोलकिया यांनी काही दिवसांपूर्वीच सूरत डायमंड बोर्सचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्यानंतर त्यांच्या टीमने महिधरपुरा येथील हिरे व्यापाऱ्यांशीही संपर्क साधला. त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी नव्या बाजाराकडे स्थलांतरित होण्याचं महत्त्वही पटवून दिले. ढोलकिया यांच्याबरोबर सूरत डायमंड बोर्सचे उपाध्यक्ष नागजी साकारियासुद्धा होते. खरं तर त्यांनी नियुक्ती झाल्यानंतर पाच आठवड्यांच्या आत SDB अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते पद ढोलकिया यांच्याकडे आले. उपाध्यक्ष लालजीभाई पटेल, कोअर कमिटी सदस्य माथुर सवानी, नवे अध्यक्ष अरविंद शहा आणि आशेष दोषी हे ४ एप्रिल रोजी पारंपरिक हिरे बाजाराला भेट देणाऱ्या सूरत डायमंड बोर्सच्या टीमचा भाग होते.
महिधरपुरा हिरे बाजार हा जुन्या सूरतमधील एका अरुंद गजबजलेल्या रस्त्यावर स्थित आहे. तिथे हिऱ्यांचा व्यापार अन् दलाली मोठ्या प्रमाणात केली जाते. सूरत डायमंड बोर्सच्या सदस्यांनी महिधरपुरा भागातील डायमंड व्हिलेज इमारतीच्या पार्किंग परिसरात व्यापारी आणि काही दलालांची भेट घेतली. सूरत डायमंड बोर्सचे उपाध्यक्ष लालजीभाई पटेल यांनी २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोनोग्राम केलेला सूट ५ कोटी रुपयांना विकत घेतला, असंही त्यांनी तिथल्या व्यापाऱ्यांना सांगितले. आम्ही महिधरपुरा येथील व्यापाऱ्यांकडून त्यांचे उद्योग सूरत डायमंड बोर्समध्ये सुरू करण्यासाठी समर्थन मागत आहोत, असंही एसबीडीच्या टीमने सांगितले.
आम्ही SDB मध्ये एक चांगले ऑफिस अन् कॉम्प्लेक्स विकसित केले आहे, जी जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत आहे. SDB एका व्यक्तीने तयार केलेला नसून तो ४२०० लोकांच्या समूहाने निर्माण झाला आहे. त्यामुळे सूरत डायमंड बोर्स लवकरात लवकर कार्यान्वित करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही व्यापारी, दलालांसह SDB मध्ये येणाऱ्या सगळ्यांना सर्व सुविधा पुरवणार आहोत. जून २०२४ पर्यंत SDB मधील ५०० हून अधिक कार्यालये सुरू व्हावीत, अशी आमची इच्छा असल्याचंही एसबीडीच्या टीममधील एका व्यक्तीने सांगितले. १३० हून अधिक कार्यालये कार्यान्वित असलेल्या इमारतीत केवळ तीन महिन्यांत कार्यान्वित असलेल्या कार्यालयांची संख्या तीनवर आली आहे. गेल्या वर्षी उद्घाटन समारंभात १३० हून अधिक कार्यालये उघडण्यात आली आणि केवळ तीन महिन्यांत ही कार्यालये बंद पडू लागली. सध्या एसडीबीमध्ये फक्त तीन कार्यालये सुरू आहेत. बँका आणि इतर कार्यालये (डायमंड नसलेली कार्यालये) उघडी आहेत, परंतु तेदेखील त्यांना परवडत नसल्याचे एका व्यापाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
महिधरपुरा हिरे व्यापाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर SDB समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी कटरगामच्या भागात हिरे व्यापारी आणि उत्पादक यांच्याबरोबर आणखी एक बैठक घेतली. या बैठकीला हिरे व्यापारी आणि कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसडीबी येथे कार्यालये सुरू करण्याचे आवाहन समिती सदस्यांकडून करण्यात आले. SDB समितीचे सदस्य १८ एप्रिल रोजी मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांशी अशाच बैठका घेणार आहेत. तसेच ज्यांनी SDB येथे कार्यालये खरेदी केली आहेत, त्यांना लवकरच SDB येथे कार्यालये सुरू करण्याची विनंती केली जाणार आहे. ढोलकिया, लालजी पटेल आणि कोअर कमिटीच्या इतर सदस्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात एसडीबी येथे कार्यालये उघडण्याची योजना आखली आहे. दरम्यान, शुभ दिवशी ७ जुलै रोजी त्यांचे कार्यालय उघडण्याची त्यांची योजना आहे. जवळपास ५०० व्यापारी जुलैमध्ये SDB मधील कार्यालयात त्यांचे व्यवसाय सुरू करतील, अशी अपेक्षा आहे, असंही श्रीराम कृष्ण (SRK) फर्मचे हिरे व्यापारी असलेल्या ढोलकिया यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. महिधरपुरा बाजार परिसरात जेव्हा मुंबईहून खरेदीदार येतात तेव्हा खरेदीदारांना बसून व्यवसाय करायला जागा नसते. SDB ने एक प्रचंड कॉम्प्लेक्स तयार केले आहे, चांगल्या ऑफिस वातावरणात व्यवसाय करता येणार आहे. आम्ही SDB मधील हिरे व्यापारी आणि दलाल यांच्या वाहतूक सुविधांवर देखील काम करीत आहोत, असंही कोअर कमिटीचे सदस्य मथुरभाई सवानी म्हणालेत.
सूरत अन् त्यांचा हिरा व्यवसाय
एका दिग्गज हिरे व्यापाऱ्याच्या माहितीनुसार, हिरे व्यवसाय २० व्या शतकाच्या सुरुवातीस काही जैन व्यावसायिकांनी सूरतमध्ये आणला होता, जे आपला परदेश दौरा करून परतले होते. त्यानंतर पालनपूर आणि उत्तर गुजरातमधील जैन व्यापाऱ्यांनाही या व्यवसायाची माहिती मिळाली. त्यामुळे ते सूरतला आले आणि त्यांनी तो शिकून घेतला, अशा प्रकारे त्यांच्या व्यवसायाचा विस्तार झाला. जुन्या काळात हिऱ्याचे कारखाने फारच कमी असायचे आणि जसजसे व्यापार वाढले तसतसे कारखान्यांची संख्या वाढवण्याची मागणी जोर धरू लागली. जैन हिरे व्यापाऱ्यांनी पाटीदार समाजाला सूरत येथे येण्याचे आणि या कारखान्यांमध्ये काम करण्याचे आमंत्रण दिले,” असंही हिरे उद्योगाचे जाणकार कीर्ती शाह सांगतात.
खरं तर त्या काळात सौराष्ट्र सतत दुष्काळाचा सामना करीत होता. शेतीसाठी सिंचनाचे स्रोत कोरडे पडले होते. त्याच काळात सूरतमधील हिऱ्यांच्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना रोजगार दिला. कृषिप्रधान समाजासाठी ही चालून आलेली आयती संधी होती. त्यानंतर सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमधील अनेक गावांतून तरुण आले आणि प्रशिक्षित होऊन हिऱ्यांच्या कारखान्यात काम करू लागले. त्यानंतर काही तरुणांनी हिरे कारखान्यात चांगला जम बसवून स्वतःचे कारखाने काढले.
हेही वाचाः विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
आज सूरतमध्ये ४५०० हून अधिक लहान, मध्यम अन् मोठे हिरे कारखाने आहेत, जे सहा लाखांहून अधिक लोकांना रोजगार देत आहेत. पाटीदार समाजातील लोक मुख्यत्वे हिरे उत्पादन आणि व्यापार व्यवसायात गुंतलेले आहेत. तसेच ते वराछा, कपोदरा, कटारगाम भागात स्थायिक आहेत, तर जैन हिरे व्यापारी शहर परिसराजवळील गावांमध्ये स्थायिक झाले अन् स्थानिक सूरतमधल्या लोकांमध्ये मिसळून गेले,” असंही शाह सांगतात.
एसडीबीच्या नेतृत्वाला धक्का
वल्लभभाई लखानी यांना ऑक्टोबर २०२३मध्ये सूरत डायमंड बोर्स कमिटीच्या सदस्यांनी एसडीबीचे अध्यक्ष केले होते. लखानी यांच्या नेतृत्वाखाली किरण जेम्स ही नोव्हेंबर २०२३ मध्ये SDB त स्थलांतरित होणारी पहिली प्रमुख व्यापारी फर्म होती, त्यांच्या कर्मचार्यांसाठी सूरतमध्ये १२०० फ्लॅट बांधण्यात आले होते. SDB च्या मागे असलेल्या लखानींनी त्यांची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पहिल्यांदा पुढाकार घेतला आणि इतरांनाही येथे येण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. परंतु सूरत डायमंड बोर्समधून म्हणावा तसा व्यापाऱ्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे वृत्त आहे. दीड महिन्यातच त्यांचा व्यवसाय रसातळाला गेला. सूरत डायमंड बोर्सच्या सदस्यांशी विचारविनिमय केल्यानंतर ते मुंबईत परतले. तसेच जानेवारीच्या मध्यापर्यंत BDB आणि इतर भागात त्यांची जुनी हिरे व्यापारी कार्यालये त्यांनी पुन्हा उघडली. मुंबईतील इतर हिरे व्यापाऱ्यांना सुरतला स्थलांतरित होण्यासाठी मिळालेला प्रतिसाद अल्प आहे. १३५ हून अधिक कार्यालये सुरू असल्याचा व्यवस्थापन समिती दावा करत असली तरी त्यातील काही कार्यालये बंद असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लखानी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नागजीभाई साकारिया यांनी जानेवारीत SDB अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. SDB पूर्णतः कार्यान्वित होण्यासाठी मुंबईहून सूरतला व्यापाऱ्यांना आणण्याचे आवश्यक होते. परंतु नेतृत्वाच्या अपयशामुळे ते अद्यापही साध्य झालेले नसल्याचं जाणकार सांगतात.
सूरत डायमंड बोर्सचे सदस्यच बदलले
नेतृत्वाच्या अभावापायी SDB कोअर कमिटीच्या सदस्यांनी नंतर एक नवीन व्यवस्थापन समिती तयारी केली आणि सध्याचे राज्यसभेचे खासदार आणि SRK डायमंड्सचे मालक गोविंद ढोलकिया यांना या सर्वोच्च पदावर बसवले. व्यवस्थापन रचनेतील समतोल साधण्यासाठी SDB ने नवीन समितीमध्ये चार जैनांचा समावेश केला. महिधरपुरा बाजारामध्ये व्यवसाय करणाऱ्या अनेक हिरे व्यापाऱ्यांनी एसडीबीमध्ये कार्यालये खरेदी केली आहेत. परंतु नवीन ठिकाणी व्यवसाय स्थलांतरित करण्याचा त्यांच्यातील उत्साह कमी झालेला पाहायला मिळत आहे.
महिधरपुरा डायमंड ब्रोकर असोसिएशनचे अध्यक्ष नंदलालभाई नाकराणी म्हणतात, “५०० हून अधिक हिरे व्यापारी आणि दलाल आहेत, ज्यांनी SDB येथे त्यांची कार्यालयं खरेदी केलेली आहेत. काही कार्यालयांत फर्निचरचे काम सुरू आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास SDB मध्ये फक्त २० ते ५० हिरे व्यापाऱ्यांनी त्यांची कार्यालये उघडणे पुरेसे ठरणार नाही. एकाच वेळी ५०० हून अधिक कार्यालये उघडली तरच इतर हिरे व्यापारी त्यांची कार्यालये उघडण्यास प्रोत्साहित होतील, असंही नंदलालभाई सांगतात. एसडीबीच्या अधिकाऱ्यांनी या भागातील हिरे व्यापारी आणि दलालांना एसडीबीमध्ये नेण्यासाठी महिधरपुरा, वरछा आणि मानगड चौक परिसरातून बससेवा सुरू केली आहे. दर तासाला अशा बसेस धावणार आहेत. दलाल आणि व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र आणि मोफत पार्किंगची सुविधाही तयार करण्यात आली आहे. काही दलाल आणि व्यापारी आहेत, ज्यांनी SDB मध्ये कार्यालये खरेदी केली आहेत. तसेच सूरत डायमंड बोर्स एकदा पूर्णतः सक्रिय झाल्यानंतर ते त्यांची कार्यालये उघडतील, असंही ते म्हणाले आहेत. सर्व व्यापारी, दलाल आणि कारखानदार एकाच ठिकाणी एकत्र येतात, तेव्हाच बाजाराला चालना अन् गती मिळते, असंही ४ एप्रिलच्या बैठकीत ढोलकिया व्यापाऱ्यांना म्हणालेत.
मुंबई अन् हिऱ्याचा बाजार
मुंबई हे हिऱ्यांचे मोठे व्यापार केंद्र आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारत डायमंड बोर्समध्ये बहुसंख्य व्यापारी राहतात, जे मारवाडी आणि जैन समाजातील असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे सूरत हे पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेले डायमंड कटिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखले जाते. जुन्या सूरत डायमंड बोर्स समितीतील बहुतांश समिती सदस्य पाटीदार होते. भारत डायमंड बोर्स ऑक्टोबर २०१० मध्ये मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू करण्यात आले. सुरुवातीला भारत डायमंड बोर्सलाही कमी प्रतिसाद मिळाला होता. कारण त्यावेळी ऑपेरा हाऊस, प्रसाद चेंबर्स आणि पंचरत्न यासह इतर ठिकाणांहून हिरे व्यापारी व्यवसाय चालवत होते. २०११ मध्ये ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर भारत डायमंड बोर्सच्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या सुरक्षा उपायांना अधिक महत्त्व दिले. त्यानंतर बीकेसीत हळूहळू अनेक हिरे व्यापाऱ्यांनी कार्यालये उघडली. सध्या भारत डायमंड बोर्समध्ये ४ हजारांहून अधिक सदस्य असून, ते पॉलिश्ड हिऱ्यांचा व्यापार, निर्यात अन् आयात करतात.
बहुतेक जागतिक डायमंड कंपन्या या भारत डायमंड बोर्समधून कार्यालये चालवतात. तसेच Rapaport आणि IDEX सारख्या कंपन्यांची कार्यालयेही भारत डायमंड बोर्समध्ये आहेत. वर्ल्ड फेडरेशन ऑफ डायमंड बोर्सेस, इंटरनॅशनल डायमंड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, वर्ल्ड डायमंड कौन्सिल आणि किम्बरले प्रोसेस यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये देखील भारत डायमंड बोर्सकडून प्रतिनिधित्व केले जाते. दररोज भारत डायमंड बोर्समध्ये हजारो लोक येतात, ज्यात परदेशी खरेदीदारांचा समावेश असतो. सध्या बाजाराला जागेच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. व्यवसायाची भरभराट होत असताना विस्ताराची गरज निर्माण झाली आहे.
भारत डायमंड बोर्सची विस्तार योजना
सूरत डायमंड बोर्स व्यापाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी संघर्ष करत असताना भारत डायमंड बोर्स नव्या एफएसआय (floor space index) सह एकाच ठिकाणी हजारो नवीन कार्यालये तयार करण्याच्या मोठ्या विस्तारासाठी सज्ज आहे. सध्या भारत डायमंड बोर्स ८.१ हेक्टरमध्ये पसरलेले आहे, ज्यामध्ये २५०० हिरे व्यापारी कार्यालये, एक कस्टम हाऊस, बँका आणि इतर महत्त्वाची कार्यालये आहेत. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA)शी संबंधिताच्या मते, जी ब्लॉक येथील वांद्रे कुर्ला संकुलामध्ये भारत डायमंड बोर्ससाठी ४.० चा ग्लोबल फ्लोअर स्पेस इंडेक्स प्रस्तावित आहे. नवीन एफएसआय भारत डायमंड बोर्सला १० लाख चौरस फुटांहून अधिक बिल्ट अप जागा विकसित करण्याची परवानगी देणार आहे. नवीन जागेत हजारो नवीन हिरे व्यापाऱ्यांची कार्यालये येऊ शकणार आहेत.
भारत डायमंड बोर्सचे उपाध्यक्ष मेहुल शाह यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “सध्या भारत डायमंड बोर्स २ एफएसआयसह २० एकर (सुमारे ८.८० लाख चौरस फूट क्षेत्र)वर बांधण्यात आले आहे. नवीन निकषांनुसार, आम्हाला आणखी २ एफएसआय मिळणार असून, आम्हाला बांधकामासाठी आणखी कार्यालये निर्माण करता येणार आहेत. शासनाच्या निकषानुसार जी जमीन मिळेल, त्यावर आम्ही बांधकाम करू. याशिवाय भारत डायमंड बोर्स येथे सुमारे ८ ते १२ लाख चौरस फूट क्षेत्रफळाचा खुला भूखंड असून, त्यावरही आम्ही बांधकाम करण्याचे नियोजन केले आहे. भारत डायमंड बोर्सचा मूळ आराखडा १९९४ मध्ये मांडण्यात आला आणि त्यावेळी एफएसआय २ होता. आज इतक्या वर्षांनंतर उद्योग वाढल्याने आणखीही अनेक मागण्या पुढे आल्या आहेत आणि जागेच्या कमतरतेमुळे व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असंही शाह म्हणालेत.
सूरत डायमंड बोर्सची विस्तार योजना काय?
सूरत डायमंड बोर्सची स्थापना ही मुंबई ते सूरतपर्यंत हिरे व्यापाराचा विस्तार करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. सूरत शहरातील खजोद गावात डायमंड रिसर्च अँड मर्केंटाइल (ड्रीम) सिटीचा भाग म्हणून ३५.५४ एकर जमिनीवर बांधलेली आणि ६७ लाख चौरस फूट मजल्यावरील जागा असलेली ही जगातील सर्वात मोठी निवासी इमारत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते SDB चे उद्घाटन करण्यात आले होते. सूरत डायमंड बोर्समध्ये ३०० स्क्वेअर फुटांपासून ७५०० स्क्वेअर फुटांपर्यंत प्रत्येकी सुमारे ४२०० ऑफिसेसची क्षमता आहे. सूरत डायमंड बोर्समध्ये एकूण नऊ टॉवर्स आहेत, प्रत्येकी ग्राऊंड प्लस १५ मजले आहेत. सूरत डायमंड बोर्समध्ये सुरक्षेच्या बाबींना महत्त्व देण्यात आले आहे. SDB ला आधीच कस्टम हाऊस उघडण्याची परवानगी आहे आणि काही बँकांनीही चांगल्या सुविधा सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या शाखा उघडण्यात स्वारस्य दाखवले आहे. खरं तर गुजरात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बोर्ड (GIDB) चा ग्रीनफिल्ड प्रकल्प हा सूरतच्या बाहेरील खजोद येथे ७०० हेक्टरवर पसरलेला आहे. एकदा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यात SDB ला समर्थन देण्यासाठी शाळा, रुग्णालये, हॉटेल्स, जेवणाची व्यवस्था, मनोरंजन क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान कार्यालये इत्यादी सर्व पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत.