एअर इंडियामध्ये कार्यरत असलेली २५ वर्षीय महिला वैमानिक सृष्टी तुली ही मुंबईतील अंधेरी भागात भाडेतत्वावरील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिने कथितपणे डेटा केबल वापरून गळफास लावून आत्महत्या केली. परंतु, उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे राहणाऱ्या तिच्या कुटुंबीयांनी तिचा प्रियकर आदित्य पंडित याच्यावर तिची हत्या केल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर सृष्टीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आदित्य पंडित (२७) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याची पुष्टीही पोलिसांनी केली आहे. नॉनव्हेज खाल्ल्याने बॉयफ्रेंड आदित्य पंडित तिचा सातत्याने छळ करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पण, नेमकं हे प्रकरण काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

वैमानिकाच्या प्रियकरावर आरोप

सृष्टी तुली आणि आदित्य पंडित यांची दोन वर्षांपूर्वी दिल्लीत व्यावसायिक वैमानिक अभ्यासक्रमादरम्यान भेट झाली आणि त्यांच्यात नात्याची सुरुवात झाली. मात्र, पंडित यांनी तिच्यावर भावनिक अत्याचार आणि अपमान केल्याचा आरोप सृष्टी तुली हिच्या कुटुंबीयांनी केला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना तुलीच्या कुटुंबीयांनी दावा केला की, पंडितने तिच्याशी सार्वजनिकपणे वाईट वर्तन केले आणि तिला मांसाहार करण्यापासूनदेखील रोखले. तिच्या मृत्यूचा सविस्तर तपास करण्याची मागणी कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांना केली आहे. पंडितच्या कथित छळामुळे तुली मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…

हेही वाचा : युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात वाढतोय ‘डार्क टुरिझम’; पर्यटकांना आकर्षित करणारा हा प्रकार नेमका काय आहे?

‘एनडीटीव्ही’नुसार, पवई पोलिस ठाण्यात पंडित याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) कथित गैरवर्तनाच्या अनेक घटनांचा उल्लेख आहे. तुलीचे काका विवेककुमार नरेंद्रकुमार तुली यांच्या म्हणण्यानुसार, पंडितने तिच्या खाण्याच्या सवयी बदलण्यासाठी तिच्यावर दबाव आणला आणि तिला वारंवार वाईट वागणूक दिली. एफआयआरमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमधील एका घटनेचाही उल्लेख केला आहे, जिथे पंडित यानी तुली आणि तिची चुलत बहीण राशीला दिल्लीत खरेदी करण्यासाठी विवेककुमार यांची कार उधार घेतली होती. आउटिंगदरम्यान वाद झाला आणि पंडितने राशीच्या उपस्थितीत तुलीविरुद्ध अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या कारने दुसऱ्या वाहनाला धडक दिली. कारचे नुकसान झाल्याचे तिच्या काकांनी सांगितले. पण, पंडित याच्यावर या घटनेचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही, असेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे राहणाऱ्या तिच्या कुटुंबीयांनी तिचा प्रियकर आदित्य पंडित याच्यावर तिची हत्या केल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. (छायाचित्र-एक्स/Md Alzamar0)

मांसाहार करण्यापासून रोखल्याने वैमानिक तरुणीने आत्महत्या केली का?

या मार्चमध्ये गुरुग्राममध्ये डिनर आउटिंगदरम्यान मांसाहारी जेवणावरून झालेल्या वादादरम्यान पंडितने तिचा अपमान केला. ‘एनडीटीव्ही’नुसार, तुली आणि तिचा प्रियकर राशी आणि तिच्या मैत्रिणींबरोबर जेवत होते, तेव्हा तुली आणि इतरांनी नॉनव्हेज ऑर्डर देण्यास सुचवले, यावरून पंडितने तुलीचा अपमान केल्याचा आरोप आहे. या वादानंतर सर्वांनी शाकाहारी जेवण केले. त्यानंतर तुलीने राशीला फोन केला की, पंडित तिला रस्त्यावर सोडून घरी निघून गेला. या घटनेनंतर, तुलीच्या काकांनी सांगितले की, तिने राशीवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या नात्यातील गुंतागुंतीबद्दल तिला सांगितले. अडथळ्यांनंतरही आदित्यवरील तिच्या प्रेमामुळे ती त्याच्याबरोबर होती. विवेककुमार यांनी आणखी एक प्रसंग सांगितला, जेव्हा पंडितने तुलीवर कौटुंबिक समारंभात जाण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र, तिला त्या दिवशी कामावर जायचे होते. तिने नकार दिल्यावर पंडितने तिचा फोन नंबर १० ते १२ दिवस ब्लॉक केला आणि तिचा मानसिक छळ केला. विवेककुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, पंडित तुलीचा सार्वजनिक ठिकाणी वारंवार अपमान करत असे आणि क्षुल्लक मतभेदांमुळे तिचा फोन नंबर ब्लॉक करत असे.

प्रियकराशी वाद आणि टोकाचे पाऊल?

रविवारी कामावरून परतल्यानंतर सृष्टी तुलीचा तिच्या राहत्या घरी प्रियकराशी वाद झाला. पंडित सोमवारी पहाटे १ च्या सुमारास दिल्लीला रवाना झाला, परंतु तुलीने कथितपणे त्याला फोन केला आणि सांगितले की ती टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार करत आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित तिच्या फ्लॅटमध्ये परतला, पण त्याला दरवाजा आतून बंद दिसला. दरवाजा उघडण्यासाठी त्याने एका कीमेकरला बोलावले आणि ती प्रतिसाद देत नसल्याचे आढळले. तुलीला मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. तत्काळ तिच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना कळवण्यात आले.

पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, तुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पंडित याला भारतीय न्याय संहिता कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, असे सोनवणे यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. “आम्ही तरुणीचा फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये आरोपींबरोबरच्या संभाषणांचे विश्लेषण करण्यासाठी पाठवला आहे. आम्ही लवकरच तिच्या कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र, सहकारी आणि रूममेट्स यांचे जबाब नोंदवू,” असे सोनवणे यांनी मीडिया आउटलेटला सांगितले.

हेही वाचा : इंटरनेटवर धमाल उडवून देणारं ‘Chill Guy’ मीम काय आहे? नेटिझन्समध्ये याची इतकी चर्चा का?

प्रियकर तिच्या खात्यातून पैसे काढायचा?

शवविच्छेदनात आत्महत्येचे सूचक असतानाही पंडितने अंमली पदार्थ पाजून तिची हत्या केली असावी असा तुलीच्या काकांचा आरोप आहे. त्यांनी पंडितवर तुलीच्या बँक खात्यातून पैसे काढल्याचा आणि कदाचित तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोपही केला, असे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिले. “आम्हाला काही व्यवहार सापडले आहेत, आम्ही लवकरच हे तपशील पोलिसांसह सामायिक करू,” असे ते म्हणाले. पोलिसांनी गेल्या महिन्यात तुलीच्या बँक खात्यातून पंडित याच्याकडे ६५,००० रुपये ट्रान्सफर झाल्याची पुष्टी केली, असे ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिले आहे. विवेककुमार यांनी वृत्तपत्राला सांगितले की, तुली ही गोरखपूरची पहिली महिला वैमानिक होती आणि तिला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केले होते. गोरखपूरमध्ये तिच्या अंत्यसंस्कारात शेकडो लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते.