Air India Pilot Sucide Mumbai एअर इंडियामध्ये कार्यरत असलेली २५ वर्षीय महिला वैमानिक सृष्टी तुली ही मुंबईतील अंधेरी भागात भाडेतत्वावरील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिने कथितपणे डेटा केबल वापरून गळफास लावून आत्महत्या केली. परंतु, उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे राहणाऱ्या तिच्या कुटुंबीयांनी तिचा प्रियकर आदित्य पंडित याच्यावर तिची हत्या केल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर सृष्टीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आदित्य पंडित (२७) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याची पुष्टीही पोलिसांनी केली आहे. नॉनव्हेज खाल्ल्याने बॉयफ्रेंड आदित्य पंडित तिचा सातत्याने छळ करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पण, नेमकं हे प्रकरण काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा