कडुलिंबाच्या पानांपासून ते बिया, तेल, सालांपर्यंत सर्व गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. मात्र, नवज्योत सिंग सिद्धू यांनी नुकत्याच केलेल्या एका दाव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. सिद्धू यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांबरोबर त्यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांच्या कर्करोगाच्या (कॅन्सर) प्रवासाविषयी सांगितले. त्यांच्या पत्नी स्टेज ४ च्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. जगण्याची केवळ तीन टक्के संधी असूनही त्या कॅन्सरवर मात करू शकल्या आहेत. परंतु, सिद्धू यांनी असा दावा केला आहे की, दररोज कडुलिंबाच्या पानांचे सेवन करण्यासह योग्य आहारामुळे त्यांना या रोगावर मात करण्यास मदत झाली. त्यांच्या या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. पण, सिद्धूने काय दावा केला आहे? याविषयी तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घेऊ.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी काय दावा केला?

‘द ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, नवज्योत कौर यांना स्टेज ४ चा इनव्हेसिव्ह कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर मेटास्टेसिससाठी अतिशय दुर्मीळ अशी शस्त्रक्रिया झाली. “सुमारे १.५ ते दोन वर्षांपूर्वी, नोनी (नवज्योत कौर सिद्धू) कर्करोगाने ग्रस्त होत्या. आम्ही शक्यतो सर्व गोष्टी केल्या; मात्र मला ऑपरेशन झाल्यावरच याची माहिती मिळाली. आज मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, नोनीला वैद्यकीयदृष्ट्या कर्करोगमुक्त घोषित करण्यात आले आहे,” असे सिद्धू यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले आहे. सिद्धू म्हणाले की, डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीकडे जगण्याची फारशी संधी नसल्याचे सांगितले होते. “आमच्या मुलाच्या लग्नानंतर तिला कर्करोग झाला असल्याचे निदान झाले; पण तिने कधीही आशा गमावली नाही आणि कॅन्सरचा धैर्याने सामना केला,” असे सिद्धू यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. सिद्धू म्हणाले की, त्यांची पत्नी योग्य त्या आहाराचे पालन करते; ज्याची तिला मोठ्या प्रमाणात मदत झाली. तिच्या दररोजच्या आहारात लिंबू पाणी, कच्ची हळद, अॅपल सायडर व्हिनेगर, कडुलिंबाची पाने व तुळशीचाही समावेश असतो.

Maharashtra Assembly Election Results 2024 Live
Maharashtra Assembly Election Results 2024 Live Updates: ‘सीएम’चा अर्थ चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन – एकनाथ शिंदे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mahayuti landslide victory in maharashtra vidhan sabha election 2024
महायुतीच्या महाविजयाची पाच कारणे… ‘बटेंगे..’, लाडकी बहीण, पायाभूत सुविधा, संघ आणि फडणवीस!
Amit Thackeray Dadar Mahim Vidhan Sabha Constituency
Amit Thackeray Dadar Mahim Vidhan Sabha Constituency : ‘राज’पुत्राचा दारूण पराभव; उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला जायंट किलर!
japan emerging sex hub
वाढत्या गरिबीमुळे ‘हे’ आशियाई शहर ठरत आहे ‘सेक्स टुरिझम हब’; कारण काय?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
सिद्धू यांनी असा दावा केला आहे की, दररोज कडुलिंबाच्या पानांचे सेवन करण्यासह योग्य आहारामुळे त्यांना या रोगावर मात करण्यास मदत झाली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : वाढत्या गरिबीमुळे ‘हे’ आशियाई शहर ठरत आहे ‘सेक्स टुरिझम हब’; कारण काय?

भोपळा, डाळिंब, आवळा, बीटरूट व अक्रोड यांच्यासह लिंबूवर्गीय फळे आणि रसदेखील तिच्या रोजच्या आहाराचा भाग आहेत. नवज्योतच्या दिवसाची सुरुवात मुख्यतः दालचिनी, लवंग, गूळ व वेलचीयुक्त मसालेदार चहाने व्हायची. सिद्धूने सांगितले की, संध्याकाळी तिच्या जेवणाची वेळ ६.३० वाजता असे आणि दिवसाचे जेवण ती १० ला करायची. तिच्या जेवणात दाहकविरोधी व कर्करोगविरोधी पदार्थांचा समावेश होता आणि ते पदार्थ खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल वापरून तयार करण्यात आले होते. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार सिद्धू यांनी दावा केला आहे, “तुम्ही खाण्यात योग्य अंतर ठेवल्यास, साखर टाळल्यास, कार्बोहायड्रेट काढून टाकल्यास कर्करोगाच्या पेशी मरतात.”

मे महिन्यात नवज्योत यांच्यावर स्तनाच्या कर्करोगाची दुसरी शस्त्रक्रिया झाली. “आहारामुळे कर्करोगाची जीवनरेखा कमी होण्यास मदत झाली. ४५ दिवसांनंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि पीईटी स्कॅनमध्ये कर्करोग आढळून आला नाही,” असे सिद्धू यांनी ‘द ट्रिब्यून’ला सांगितले. “त्यांनी कॅन्सरवर मात केली. हे आमच्याकडे पैसा आहे म्हणून नाही, तर त्यांच्या प्रयत्नांची शिकस्त आणि त्या पाळत असलेली कठोर दिनचर्या यामुळे हे शक्य झाले. कर्करोगावर सरकारी रुग्णालयातही प्रभावीपणे उपचार केले जाऊ शकतात,” असेही सिद्धू म्हणाले. सिद्धू यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना आहाराची माहिती विचारली.

नवज्योत कौर यांना स्टेज ४ चा इनव्हेसिव्ह कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर मेटास्टेसिससाठी अतिशय दुर्मीळ अशी शस्त्रक्रिया झाली. (छायाचित्र-नवज्योत सिंग सिद्धू/एक्स)

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञांनी अशा दाव्यांवर साशंकता व्यक्त केली आहे. फरिदाबाद येथील अमृता हॉस्पिटलमधील वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मेहता यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, ही दावे म्हणजे कोणत्याही पुराव्यावर आधारित नसलेली चुकीची माहिती आहे. “या अशा गोष्टी आहेत; ज्याचा लोक प्रयत्न करतात. कारण- ते घरी सहज उपलब्ध असतात. परंतु, विज्ञान अवघड आहे आणि ते आत्मसात करणे तितके सोपे नाही,” असेही त्यांनी सांगितले. आशा हॉस्पिटल्स ॲण्ड रिसर्च सेंटरचे ज्येष्ठ ऑर्थोऑन्कॉलॉजिस्ट व संस्थापक डॉ. श्रीनाथ पुढे म्हणाले, “बीएमसी कॉम्प्लिमेंटरी ॲण्ड अल्टरनेटिव्ह मेडिसिन (२०१८)मध्ये प्रकाशित झालेल्या प्रयोगशाळेतील अभ्यास असे सूचित करतात की, कडुनिंबाचा अर्क जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह प्रमाण कमी करू शकतो; ज्याचा कर्करोगाशी संबंध आहे. परंतु, कर्करोगावर याच्या थेट परिणामाविषयी क्लिनिकल अभ्यास मर्यादित आहेत.”

हेही वाचा : किम जोंग उनचे सैन्य रशियाच्या मदतीला; याचा काय परिणाम होणार? कोण आहेत सैन्याचे नेतृत्व करणारे जनरल किम योंग बोक?

आयुर्वेद फिजिशियन व आयसीटीआरसी पुणे इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट ॲण्ड रिसर्च सेंटर येथील वरिष्ठ संशोधन फेलो बीएएमएस, एमडी डॉ. सुषमा सुमित यांनी ‘टाइम्स नाऊ’ला सांगितले, “हा स्टेज ४ कॅन्सरचे व्यवस्थापन करण्यासाठी सहायक उपचारांचा एक भाग असू शकतो. परंतु, हर्बल औषध आणि आहार केवळ मेटास्टॅटिक कर्करोगावर नियंत्रण ठेवू शकतो, असे सुचवणारा कोणताही मोठा अभ्यास नाही. या क्षेत्रातील कोणतेही निष्कर्ष सामान्यत: त्याच्या व्यक्तिनिष्ठ परिणामांवर आधारित असतात; जसे की वैयक्तिक अनुभवांवर. “त्याशिवाय, अशा प्रकरणांमध्ये शिफारस करण्यात आलेला विशिष्ट आहार आणि कर्करोगविरोधी, दाहकविरोधी पदार्थ इतर रुग्णांसाठी प्रभावी ठरू शकत नाहीत. कारण- प्रत्येक रुग्णाच्या रोगाची अवस्था, शरीराची रचना, शारीरिक व मानसिक शक्ती आणि इतर घटकांमध्ये फरक असतो,” असेही त्यांनी सांगितले.