राखी चव्हाण

चित्त्यांच्या मृत्यूसाठी रेडिओ कॉलरला कारणीभूत ठरवण्यात आल्यानंतर सहा चित्त्यांच्या गळय़ातील रेडिओ कॉलर काढण्यात आलीसुद्धा! ‘रेडिओ कॉलर’बाबत तज्ज्ञांचे म्हणणे असे की, कधी कधी प्राण्यांच्या गळय़ावर ती घट्ट बांधल्या गेल्यानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात. पण सर्व चित्त्यांचा मृत्यू याच कारणाने झाला का? याची शहानिशा बाकी असताना, चित्ता प्रकल्पाची धुरा असणाऱ्या कुनो राष्ट्रीय उद्यानातील एका अधिकाऱ्याकडून जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.

pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?

तज्ज्ञांच्या ‘टास्क फोर्स’चे म्हणणे काय?

मध्य प्रदेशातील जंगलात मृतावस्थेत सापडलेल्या ‘सूरज’ या तीन वर्षांच्या चित्त्याचा रेडिओ कॉलरमुळे त्वचेला घट्ट बसल्याने रक्तदोष होऊन मृत्यू झाला होता, असे चित्ता टास्क फोर्सच्या अध्यक्षांचे म्हणणे होते. रेडिओ कॉलर त्वचेसाठी अनुकूल असाव्यात, मात्र रेडिओ कॉलरमुळे त्वचेवर ओरखडा आला. ओल्या आणि दमट हवामानामुळे त्याची परिस्थिती आणखीच बिकट झाली. त्यामुळे त्याच्या शरीरात मोठय़ा प्रमाणात संसर्ग पसरला. मार्जार कुळातील प्राण्यांमध्ये हा रक्तदोष दुर्मीळ आहे, असे चित्ता टास्क फोर्सचे अध्यक्ष राजेश गोपाल यांचे म्हणणे आहे. आता टास्क फोर्स सेप्टिक संसर्गास कारणीभूत असलेल्या ओरखडय़ांमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

रेडिओ कॉलर कशी असते?

‘रेडिओ कॉलर’ हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते प्राण्याच्या गळय़ात बांधले जाते. यात एक लहान ट्रान्समीटर बसवले जाते. त्यातील रेडिओ लहरींद्वारे प्राण्याच्या ठावठिकाण्याचे सिग्नल मिळतात. ट्रान्समीटर चालवण्यासाठी ऊर्जा देणारी बॅटरीदेखील या कॉलरमध्येच असते. ट्रान्समीटरमधून आलेले सिग्नल इतर उपकरणे किंवा अँटेनापर्यंत पोहोचतात आणि त्यामार्फत त्या वन्यप्राण्यांची हालचाल, त्यांचे ठिकाण कळते. काही रेडिओ कॉलर प्राण्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी जीपीएस (ग्लोबल पोझिशिनग सिस्टम) तंत्रज्ञानदेखील वापरतात. ही कॉलर सहसा नायलॉन किंवा चामडय़ाची बनलेली असते, ज्यामुळे प्राण्याच्या मानेला इजा होण्याची शक्यता नसते.

‘रेडिओ कॉलर’चा प्राण्यांना धोका किती?

रेडिओ कॉलरमुळे प्राण्यांच्या आरोग्यावर काही अंशी परिणाम होऊ शकतो. प्राण्यांच्या काही प्रजातींमध्ये रेडिओ कॉलर बांधल्यामुळे अत्यंत मानसिक ताण, जखम आणि आरोग्याशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. रेडिओ कॉलर प्राण्याच्या मानेला बांधल्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलानुसार ते बरेचदा मानेला घट्ट बसते. त्यामुळे रेडिओ कॉलर योग्य पद्धतीने बांधणे खूप महत्त्वाचे आहे. रेडिओ कॉलरचा प्रभाव बॅटरीच्या कालावधीवर अवलंबून असतो. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य आणि देखभालीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

‘रेडिओ कॉलर’चे प्रकार कोणते?

व्हीएचएफ (अति उच्च कंप्रता) कॉलर प्रामुख्याने प्राण्यांसाठी उपयुक्त आहेत. हे कॉलर व्हीएचएफ रेडिओ लहरींद्वारे सिग्नल प्रसारित करतात. या कॉलरची श्रेणी सामान्यपणे काही किलोमीटपर्यंत असते. जीपीएस (ग्लोबल पोझिशिनग सिस्टम) कॉलर प्राण्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी वापरतात. जीपीएस कॉलर उपग्रहांशी जोडतात आणि प्राण्यांचा ठावठिकाणा दर्शवू शकतात. अशा कॉलरच्या मदतीने, प्राण्यांच्या हालचाली, स्थान आणि वर्तनाचा अंदाज लावता येतो. सॅटेलाइट कॉलर हा कॉलर्सचा सर्वात प्रगत आणि महागडा प्रकार आहे. हे कॉलर उपग्रहाला जोडतात आणि प्राण्याचा ठावठिकाणा तसेच त्याचे अंतर ठरवता येते. विशेष महत्त्वाच्या संवर्धन मोहिमांमध्ये सॅटेलाइट कॉलरचा वापर केला जातो.

‘रेडिओ कॉलर’चे फायदे काय आहेत?

रेडिओ कॉलर वापरून या माध्यमातून प्राण्यांचा वेग, स्थान आणि वर्तनाचा अभ्यास शक्य होतो. प्राण्यांची स्थिती जाणून घेतल्यास त्यांच्या संरक्षणासाठी योग्य ती कारवाई करणे सहज शक्य होते. रेडिओ कॉलर हे वैज्ञानिक संशोधनाचे महत्त्वाचे साधन आहे. याद्वारे प्राण्यांची वागणूक, इतर क्षेत्रातील त्याचा वावर समजू शकतो. हे संशोधकांना प्राण्यांच्या मदतीने नवीन ज्ञान मिळविण्यास मदत करते. रेडिओ कॉलरच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठीही हातभार लावता येतो. नाहीशा होत चाललेल्या प्रजातींचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांचे अस्तित्व वाढवण्यासाठी योग्य कारवाई करण्यास मदत होते.